स्तनगाठ…. भीती कॅन्सरची

Written by

मी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासत होते.तितक्यात एक मंजू नावाची रुग्ण माझ्या जवळ आली.खूप घाबरलेली होती.तिचं वय अंदाजे 27 वर्षे असेल.मी तिला पाहिले आणि म्हणाले काय झालं मंजू तू इतकी का घाबरली आहेस.

मंजू :मॅडम माझ्या छातीमध्ये (स्तनामध्ये )गाठ आहे.आणि खूप दुखत आहे. दोन्ही स्तनांमध्ये गाठ आहे. उजव्या मध्ये मोठी आणि डाव्या मध्ये छोटी.दोन्ही खूप दुखत आहेत ठसठस करत आहेत अगदी हात पण लावू देत नाही. कालच आमच्या शेजारच्या काकूंना स्तनाचा कॅन्सर निदान झालं आणि तो तिसऱ्या स्टेजला आहे.

मी: मंजू  तू आधी शांत बस घाबरू नकोस. आपण तूझी गाठ तपासू. म्हणून मी तिला clincally तपासले.आणि निदान केले फाइब्रोअडेनोसीस.

मी :मंजू घाबरण्यासारखे काही कारण नाही.ही गाठ काही कॅन्सर ची गाठ नाही अगदी पन्नास टक्के महिलांना अश्या गाठी असतात. मला तू सांग तूझी पाळीची तारीख काय आहे?

मंजू: येईल दोन ते तीन दिवसात.

मी:त्या मुळेच त्या गाठी दुखत आहेत. या गाठी नॉर्मल असतात त्या पाळीच्या चक्रासोबत वाढतात (हार्मोन असंतुलनामुळे ) आणि कमी देखील होतात. फक्त दुखलं की पेनकिलर घे.कधी कधी अश्या गाठींमधून हिरवा किंवा चॉकलेटी स्त्राव येतो तो सुईने काढून घेतला की आराम पडतो.तूला तशी गरज वाटत नाहीये तूझी गाठ कमी होईल आपोआप.

कॅन्सर ची गाठ अशी नसते.ती एकदम कडक असते. तीच्या bondries कडक असतात. ती गाठ कायमस्वरूपी दुखते. पाळी सोबत कमी जास्त होत नाही.तिच्यासोबत आपले वजनही कमी व्हायला लागते.तसेच पू सारखा स्त्राव ती गाळू शकते. पण काही केल्या मंजूचे समाधान होईना. मग मी तिला मॅमोग्राफी advice केली.  (मॅमोग्राफी/सोनोग्राफी/गाठीतील पाणी तपासणे किंवा गाठीचा तुकडा तपासणे अश्या त्याच्या तपासण्या )

मंजू ची मॅमोग्राफी नॉर्मल आली.आणि ती रिलॅक्स झाली.

तिचं पाहून लागलीच तीच्या बाजूची रुग्ण कीर्ती म्हणायला लागली मला पण गाठ आहे. पण ती मऊ आहे.आणि ती गाठ दुखत नाही मी पुन्हा तपासली आणि म्हणाले fibroadenoma आहे. तूला याचा काही त्रास नाही ना. मग कुठल्याही उपचाराची गरज नाहीये.ती गाठ पकडायला गेलं तर हातात येत नाहीना. त्याला मेडिकल भाषेत ब्रेस्ट mouse असं म्हणतात.

तिला पण same तपासण्या आहेत.

गाठ खूपच मोठी असेल अथवा त्याचा काही त्रास असेल तर ती फक्त ऑपेरेशन करून काढावी लागते.

इतकी माहिती इथे देण्याचा उद्देश इतकाच की तूम्ही स्वतः तुमच्या हाताने ही गाठ तपासू शकता.शंका असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अश्या गाठी 50 ते 60 टक्के स्त्रियांमध्ये आढळतात.जो की कॅन्सर नसतो. घाबरून जाऊ नये.

तूम्ही डॉक्टर कधी गाठावा

1 गाठ एकदम कडक असेल तर, तीच्या boundaries prominant असतील तर. (कधी कधी अश्या गाठी सुरुवातीला दुखत नाहीत.)

2 अश्या गाठीचे दुखणे कमीच होत नसेल तर

3 गाठीचा पाळीच्या चक्राशी काहीच संबंध नसेल तर. म्हणजे पाळी येऊन गेली तरी गाठी ची size आणि दुखणे वाढत असेल तर.

4  आधी तूम्ही डॉक्टरला दाखवले आहे आणि तरीही तुमची गाठ पहिल्यापेक्षा जास्त वाढत असेल तर.

तर सख्यानो मला नक्की खात्री आहे की हा लेख तुमचे बरेचसे टेन्शन दूर करेल.

पस्तिशीनंतर मात्र मॅमोग्राफी स्क्रिनिंग प्रत्येक स्त्री ने करावी.

लेख आवडल्यास like करा. Share करायचे असल्यास नावासहित share करा.

©डॉ सुजाता कुटे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा