स्त्रियांच्या मनातलं..

Written by

असं म्हणतात, की – “स्त्रियांच्या मनात काय चालते हे साक्षात ब्रह्मदेवालाही समजलेले नाही” खरं तर ही अतिशयोक्तीचं नाही का? तुम्हाला एक गोष्ट सांगते….सोहन ची..

ज्याने ब्रह्मदेवाच्याही एक पाऊल पुढे जाऊन ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे…

ज्याचं लग्न झालंय आणि “आई” व “बायको” यांच्यात ज्याचं सॅन्डविच बनलंय अशा एका मुलाची. नवीनच लग्न झालं, सीमा – म्हणजे सोहनची बायको, तिला सोहन ने खरेदी साठी नेलं. सीमा ला एक साडी खूप आवडली, किंमत 8,000/- इतकी महाग साडी, पण तरीही ती सोहन ला म्हटली की मला हीच साडी घ्यायची आहे. पण सोहन फार हुशार बरं का !, त्याला स्त्रियांच्या मनातलं अचूक समजत होतं. तो म्हणाला “घे की”, सीमा ला हे अपेक्षित नव्हतंच, कारण महाग साडी घ्यायला सोहन का-कु करेल, मग ती रुसून बसेल, मग सोहन पुढे हट्ट करेल असं तिने गृहीत धरलेल. सोहन म्हणाला “महाग तर महाग, तूझा सुखा पुढे 8,000/- काहीच नाही.” बस्स सीमा ला हेच ऐकायच होत, तिने ती साडी बाजूला ठेवली आणि 1000/- ची दुसरी साडी घेतली. सोहनने एका वाक्यात बरीच बचत केली होती.

निष्कर्ष : हट्ट करण्या मागे केवळ ‘उधळपट्टी’ करणे असा स्त्रियांचा हेतू नसतो, तर आपला नवरा आपल्या सुखाला, हट्टाला किती किंमत देतो यांची तपासणी स्त्री करत असते.

सीमा मॉडर्न होती, त्यामुळे लग्नानंरही तिने जीन्स घालायला सुरुवात केलेली. सोहन च्या आईला ते आवडले नाही, तिने सोहनकडे तक्रार केली आईचेही ऐकायचे आणि बायकोलाही सांभाळायचे, कसे करणार?

सोहन ने सीमा ला सांगितले, “हे बघ सीमा, आईला तू जीन्स घातलेला आवडतं नाही. माझी काहीही हरकत नाही जीन्स घालायला पण आईच्या समाधाना साठी आपल्याला एक नाटक करावे लागेल, मी आईसमोर तुला “खोटं खोटं” रागवेल, तू “खोटं खोटं समजून काहिही बोलायचं नाही”. सीमा ने विचार केला, कटकट घालण्यापेक्षा हे बरंय.

मग एके दिवशी सोहन, त्याची आई आणि सीमा समोरासमोर असतांना सोहन बोलला, “सीमा, हे काय चाललंय तुझं ? घरात जीन्स घातलेली चालणार नाही, आईला आवडत नाही.”

सोहनच्या आईला जाम आनंद झाला, पोरगा बायकोच्या हातात गेला नाही आणि ठामपणे तिला बोलला म्हणून.

पुढे तो बोलला, “नेहमी नाही घालायची जीन्स, कधीतरी घालत जा, रोज रोज चालणार नाही.”

सीमा ला आतल्या आत हसू येत होतं. कारण हे सगळं खोटं खोटं आहे म्हणून आणि असंही रोज जीन्स घालायला मला कंफर्टेबल ही नाही.

सोहन जे पुढे बोलला त्यांचं आईला काहीच वाटलं नाही, कारण सोहन बायकोला रागावला आणि ताब्यात ठेवलं यातच तिला आनंद झालेला काही वाक्यातच सोहनने आईच समाधान, बायकोला स्वातंत्र्य आणि स्वतःला सुरक्षितपणे सोडवून घेतलं.

निष्कर्ष: बायकोला विश्वासात घेऊन काही गोष्टी घडवून आणल्या तर गोष्टी ताब्यात राहतात.

सोहनने झुंम्बा करावं अशी त्याच्या बायकोची ईच्छा आणि सोहनने रोज 50 सूर्यनमस्कार घालावे अशी त्याच्या आईची ईच्छा. सोहनने सरळ जीम लावली. दोघीनाही वाईट वाटले नाही.

निष्कर्ष: पुरुष आपलं ऐकतोय की नाही यापेक्षा दुसरीचं ऐकत नाही याचं समाधान खूप वेगळं असत.

एक दिवस सीमा नाराज दिसत होती. काय झालंय काही कळेना. मग सोहनला कळलं की अपूर्वा-सीमाची मैत्रीण तिला भेटून गेली. त्यांच्यात काय बोलणं झालं हे सोहनला माहीत नव्हतं. पण तरीही त्याने अचूक हेरलं. अपूर्वा तिच्या नवऱ्यासोबत एका फ्लॅट मध्ये राहायची, राजा-राणीचा संसार मग त्या बाईने दोघांच्या प्रेमाचे किस्से सांगितले असणार, मग बायकोला हेवा वाटला असणार आणि मला प्रायवसी नाही म्हणून नाराज असणार.

सीमा काही सांगायच्या आत सोहन म्हणाला..

“छे बुवा ! आपल्याला काही प्रायव्हसीच नाही, आपण एक काम करू, आपण दोघं वेगळं राहू, मस्त राजा-राणी सारखं.”

अर्थात सोहन ला असलं काही करायचं नव्हतं. मुद्दाम सोहनने हा बॉम्ब टाकला.

तशी सीमा म्हणाली, “असं काय करताय, वेगळं राहणं आपली संस्कृती नाही आणि आई बाबांना असं एकटं सोडून कसं जायचं?”

निष्कर्ष : पुरुषाने थोडा बालिशपणा दाखवावा, स्त्रियांना समजूतदारपणाची शर्यत जिंकायला आवडते.

सोहनच्या आईने “मला रोज संध्याकाळी मंदिरात घेऊन जायचं !” असं फर्मान काढलं, आता सीमाला याचा हेवा वाटणार, कारण तिला सोहन फार कमी बाहेर नेत असायचा. मंदिरात न्यायचा कार्यक्रम सुरु होण्या एक दिवस आधी सोहन सीमा ला म्हणाला, “आपण Goa ला जाऊया का फिरायला ? विमानाने जाऊ, ६ महीन्या नंतरचं बुकिंग केलं तर स्वस्त पडेल” सीमा खुश, पुढच्या 6 महीन्याची वाट ती पाहू लागली आणि मधल्या काळात गोव्याची स्वप्न रंगवू लागली, तेवढ्या काळात सोहनची मंदिर वारी सुरु राहीली आणि मुलाची मातृभक्ती पाहून आईसुद्धा भरून पावली.

निष्कर्ष: बायकोने काही मागायच्या आधीच तिला आश्वासन दिलं तर पुढील धोका टळतो.

बरोबर आहे ना ???

स्त्रियांच्या मनातलं ओळखायला सुद्धा सोहन सारखं वाघाचं काळीज लागतं ?

नाही का?

लेख आवडल्यास लाईक, कंमेंट करायला विसरू नका…

 

असेच सुंदर लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला लाईक करा

https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
विनोदी

प्रतिक्रिया व्यक्त करा