“स्त्री” ©दिप्ती अजमीरे.

Written by

जगावेगळी नसेलही तुझी कथा,
तरीही शब्द कमी पडतात,
मांडतांना तुझी व्यथा…

मुलगी, बहीण, बायको वा आई
तुझ्या भावनांची जाण ,
कोणालाच नाही…

ना घर तुझे ना उंबरठा,
पदरात जरी असेल तुझ्या,
मायेचा साठा…

या मायेच्या झऱ्याला
आटविता येत नाही,
अश्रूंच्या धारेला थांबविता येत नाही…

आसुसलेल्या जीवाला हवी असते
आपुलकी आणि प्रेम,
प्रत्येकवेळी मात्र तुझ्यावरच धरला जातो नेम..

जन्म घर,कर्म घर करता-करता
दोन घरांत जीव अडकतो,
कितीही सहन केले तरी माये साठी जीव तुटतो…

सहनशक्ती वाढवून,
आपण च कुठेतरी चुकलो
म्हणून परत अश्रूंना वाट देतो…

 

—दिप्ती

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा