स्पर्धा परिक्षा -एक वास्तव

Written by

   अनुज एका छोट्या खेडेगावात राहणारा मुलगा…तसे त्यांचे गाव खूप काही सुधारलेले नव्हते..रस्ते,पाणी ह्या गरजेच्या सोयी देखील अपुऱ्या होत्या. गावात एक जिल्हा परिषदेची शाळा होती.. पुढे कॉलेज करायचे म्हणजे पाच सात किलोमीटर लांब कॉलेज होते.
त्यात तिथे जाण्यासाठी वाहनांची जास्त सोय नसल्याने पायी जाणे हाच पर्याय उपलब्ध होता.  त्यामुळे मुलींना   कोणीही जास्त शिकवण्याचा  प्रश्न नव्हता.  मुलांनी पण आग्रह केलाच तर त्यांना मुभा असे..नाहीतर शेतातील काम आणि घर एवढाच पर्याय होता.अनुज ला तसे अभ्यासाची आवड होती.. त्याने दहावीला देखील चांगले मार्क मिळवले.. पुढे त्याने अकरावी बारावी आर्टस् मधून करण्याचा निर्णय घेतला..                                                            मग अनुज चे कॉलेज सुरु झाले.. तसेच त्याने पार्ट टाइम एका कंपनीत नोकरी सुरु केली..अश्या प्रकारे त्याचे शिक्षण नोकरी असे  दोन्हीही सुरु होते..आता अनुज थोडे का होईना कमवत होता… तेव्हा त्याने ठरवले  स्वतःसाठी फोन घ्यावा. गावात आता अनेक टॉवर्स ची रेंज असल्याने  आता त्याच्या हातात फोन च्या रुपात दुनिया येणार होती.. अनुज खप खुश होता..येता  जाता वेळ मिळेल तस तो फोन वापरत ..आता यूट्यूब, व्हाट्स अप सर्व तो शिकला आणि सतत काहिना काही नवीन माहितीच्या शोधात तो असे .. असेच एकदा। सर्च करता करता त्याला त्याला यू ट्यूब वर स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी झालेल्या मुलांचे भाषण सापडले त्याने ते ऐकले.. मग काय तो रोज वेगवेगळे भाषण ऐकू लागला आणि स्वतःला त्यांच्या जागी बघू लागला.. अश्या प्रकारे त्याच्या डोक्यात आता फक्त त्यांच्या सारखं होणं  आणि अधिकारी होऊन भाषण करणे एवढेच.. परंतु त्त्यांनी त्या मागे किती कष्ट घेतले असतील ह्या विचारा पर्यंत तो पोचला नाही ..आता अनुज बारावी पूर्णं झाला.. आता पुढे काय असे विचारताच त्याने घरी सरळ सांगितले  की मी पुण्याला अभ्यासासाठी जाणार आणि अधिकारी होणार..
सुरवातीला घरून बराच  विरोध झाला बरेच समजवण्यात आले.. ऐकेल तो अनुज कसला, आता त्याने खूणगाठच  बांधली होती.  करेल तर स्पर्धा  परीक्षेचा च अभ्यास.. त्याचा निर्धार बघून शेवटी घरच्यांनी देखील होकार दिला ..आता स्वारी खुप खुश होती ..मग काय काहीं दिवसात अनुज पुण्यात दाखल झाला.. पुणे म्हणजे विद्येच। माहेरघर आणि स्पर्धा परिक्षेचे  मुख्य केंद्र..प्रत्येक गल्लीत आपल्याला तेथे छोट्या  खोलीत राहणारे लांबून आलेले विद्यार्थी दिसणार..  आणि तिथे असलेला क्लासेस चा बाजार.. बाहेर लांबून आलेले विद्यार्थी ज्यांना ह्या क्षेत्रातील काही माहिती नसते त्यांना क्लास शिवाय पर्याय वाटत नाही आणि मग ते विद्यार्थी पैश्यांची अडचण काढून क्लास ला ऍडमिशन घेतात.. पण त्यांना हे माहिती नसते कि त्यांना त्याचा नक्की किती फायदा होणार…असो..”तर अनुज पुण्यात आला..पहिल्यांदा च तो मोठ्या शहरात आला होता आल्या आल्या मात्र तो गडबडला.. त्याच्यासाठी ते सर्व नवीन होते त्यामुळे तो गोंधळून गेला. मग काही मुलांची मदत घेऊन त्याने राहण्याची जेवणाची सोय केली.तसेच त्याने माहिती काढत काढत काही क्लासेस शोधले..त्याने तिथे जाऊन बरीच चौकशी केली..  प्रत्येक। क्लास ची फी भरमसाठ होती व त्याला तिथे बरेच काही संमजवण्यात येऊन विश्वास दिला गेला ..शेवटी त्याने एका क्लास ची निवड केली पण फी ऐकून त्याला थोडे टेन्शन आले.. त्याने पूर्वी जॉब करून काही पैसे साठवले होते  आणि त्याला थोडी फार मदत दार महिन्याला घरून मिळणार होती  अशा प्रकारे त्याने पैसे जमवून क्लास ला ऍडमिशन घेतले.
अनुज ची सर्वात मोठी चूक हीच झाली की त्याने बारावी नंतर उच्च शिक्षण,चांगली डिग्री न घेता बारावी नंतर स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला .तसे ते काही पूर्णतः चुकीचे नव्हते परंतु आता ह्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने आपला प्लॅन बी असावा असे वाटते कारण पुढे जाऊन अपयश आले तर विद्यार्थी नैराश्येत न जाता त्यांच्याकडे दुसरा जॉब करण्याचा पर्याय उपलब्ध असतात..  अनुज ने देखील प्लॅन बी चा विचार न करता पदवी बाहेरून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला ..
आता हळू हळू अनुज तिथे रुळत चालला होता ..क्लास,लायब्ररी रूम, मेस असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. पण झाले असे अनुज गावातून आलेला असल्याने,त्याच्यासाठी हे वातावरण नवीन होते.. त्यात त्याने कॉलेज लाइफ अनुभवले नसल्याने त्याचा आता अभ्सासा  व्यतिरिक्त बराच वेळ वाया जाऊ लागला .मित्र ,ग्रुप ह्या मध्ये तो रमत होता.तसेच त्याचा अभ्यास पण हळू हळू सुरु। होता.तेथे त्याला बोलणारे कोणी नव्हते त्याला कोणाचा धाक नसल्याने तो मनाला वाटेल तसे वागत होता .वाटेल तेव्हा अभ्यास करणे मित्रांसोबत फिरायला जाणे रूम वर पार्टी करणे  आणि तसेच त्याचे एका मुली सोबत सुत जुळले असल्याने  त्याचा इकडे जास्त वेळ जाऊ लागला .त्याच्या घरी मात्र असे वाटत होते आपला मुलगा अभ्यास करून अधिकारी होणार.ह्या आशेवर ते पोटाला चिंमटा मारून त्याला पैसे पुरवत होते.. इथे मात्र अनुज रुळला असल्याने त्याला घरच्या परिस्थिती ची जाणीव राहिली नव्हती. तो अतिशय आत्मविश्वासात वावरत होत की मी बराच अभ्यास केला असून मी येणाऱ्या परीक्षेत psi कींवा sti होणार. पण स्पर्धा परीक्षा हि अशी असते ज्यामध्ये कोणीच काहीच अंदाज करू शकत नाही .. ती परीक्षा माणसाला प्रतिष्ठा ,अधिकार ,यश पण  देते नाहीतर नैराश्येच्या गर्तेत पण टाकू शकते ..इथे आपले काम एकच पूर्णपने झोकून अभ्यास करणे आणि येणाऱ्या परीक्षेला व्यवस्थित रित्या सामोरे जाने.. मात्र हे सांगणारे अनुज ला कोणी भेटले नाही. अनुज आता कशी बशी पदवी पास झाला..तो येणाऱ्या पूर्व परिक्षेला बसण्यासाठी पात्र झाला ..परंतु ऐन परीक्षेची वेळ आणि त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. तो एका मुलीच्या आंधळ्या प्रेमात असल्याने काही वेळ अभ्यास आणि बाकी वेळ मुलीसोबत घालवणे असा त्याचा दिनक्रम असे.°कधी फिरायला जाणे ,कधी  चित्रपट बघणे,  बाहेर जेवणे या मध्ये त्याचा पैसा खर्च होऊ लागला. आता मात्र त्याला पैश्याची चणचण भासू लागली.. घरून देखील सारखी विचारणा होऊ लागली.. तो मात्र त्याच्या बोलण्याने ,मोठ्या बातांनी घरच्यांना समजावून वेळ मारून नेत असे. अनुज चे काही हितचिंतक मित्र देखील त्याला समजावू लागले परंतु अति आत्मविश्वासू वृत्ती मुळे त्याने कोणाचे ऐकले नाही..
असेच दिवस मागून दिवस जात होते. त्याला आता पैसे कमी पडू लागले  आणि घरून देखील मदत कमी झाली ..पैसे कमी झाल्याने त्याची मैत्रीन आता त्याला पूर्णपणे टाळू लागली काही दिवसात तिने त्याच्याशी सर्व संपर्क बंद केला त्यामुळे तो आता नैराश्येत जाऊ लागला एकीकडे परीक्षा जवळ येत होती  पण त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते कसे बसे त्याने येणारी परीक्षा दिली आणि नंतर आलेल्या अंदाजे मार्क्स वरून त्याला त्याची लायकी समजली व त्याचा स्वतःवर चा विश्वास कमी झाला एकीकडे मैत्रीण  सोडून गेल्याचे आणि व अनेक वर्षे  परिक्षे ची तयारी करून आलेले अपयश  यामुळे तो दुःखी झाला आणि दुसरीकडे त्याला घरून  अभ्यासाब्दद्दल  सारखी विचारणा होत होती त्यामुळे तो मानसिक रित्या खचला होता .. इकडे यश मिळणार नाही याची त्याला खात्री  पटली कारण नंतर च्या देखील परीक्षेत तो काहीच सिद्ध करू शकला नाही.. त्यामुळे घरी कोणत्या तोंडाने सांगावे हा प्रश्न त्याला पडला
त्याला त्याच्या वागण्याचा आता अतिशय पश्चाताप होत होता  व घरातील लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवल्याने त्याला खुप त्रास झाला..  आता त्याला यातून बाहेर कसे पडावे हे सुचत नव्हते  कारण त्याला आता अभ्यासात अडकून पूढील वेळ वाया न घालवता घरच्यांसाठी काहीतरी जॉब करून कमावून आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करायचे होते .. त्याआधी त्याला त्याच्या मित्रांनी समजावून सांगितले होते की स्पर्धा परीक्षा म्हणजेच सर्व आयुष्य नाही..त्यामुळे त्याने मार्ग बदलायचा निर्णय घेतला.                   “मित्र मंडळींच्या मदतीने त्याने अगदी छोटे असे चहा नाश्ता सेंटर टाकले..त्याचा फायदा तेथील अनेक अभ्यासू विद्यार्थ्यांना झाला.. काहीच दिवसात त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला  असे करता करता  थोड्या दिवसांनी त्याने त्याचे रूपांतर एका खानावळीत केले  व त्यातून तो खूप चांगली कमाई करू लागला ..काहीच दिवसात त्याने आई वडिलांना आणले..तेव्हा त्यांना मुलाची प्रगती बघून अतिशय आनंद झाला .त्यांना अधिकारी पेक्षा आपला मुलगा चुकीतून काहीतरी छान शिकून एवढ काही करू शकला हे बघून गर्व वाटला..त्याच्या खानावळीचा फायदा अनेक अभ्यासासाठी आलेल्या  गावाकडील मुलांना होत होता..तसेच जर ते मूले काही चुकत तर अनुज वेळोवेळी त्याचे कान टोचून त्यांना सावध करत असे.
अशा प्रकारे  अनुज जरी त्याच्या चुकांतून शिकून मोठं काही करू शकला असला तरी सर्वच मुलाना असे जमतेच असे नाही त्यामुळे ती मुले नैराश्येच्या गर्तेत जाऊन काहीही पावलं उचलतात..त्यामुळे स्पर्धा परीक्षेत पडन्या आधी स्वतःकडे चांगली डिग्री असावी जेणेकरून अपयश आल्यास त्या डिग्री चा भविष्यात नक्की फायदा होईल आणि या क्षेत्रात येण्या आधी आपल्याला जमेल का आवड आहे का याचा विचार करून च यावे …

कथा बरीच काल्पनिक असून काही गोष्टी अनुभव आणि ऐकलेल्या प्रसंगावरून मांडण्याचा प्रयत्न आहे कारण मी देखील ह्या क्षेत्रात असून अनेक प्रसंग ऐकिवात असतात व बघितलेले आहे..त्यामुळे सत्यता समजावी एवढाच उद्देश🙏🙏🙏

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत