स्पर्धेचं चक्रव्यूव्ह….

Written by

 

स्पर्धेचं चक्रव्युव्ह…..
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
©जयश्री कन्हेरे -सातपुते
आज लेकीच्या शाळेत गेले होते.. पालक सभा आणि युनिट टेस्ट चा रिझल्ट देखील होता…
सर्व पालक आपापल्या मुलांचे मार्क बघून विचारात दिसलें… आणि टीचर ला विचारत होते.. सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहे . तस बघितलं तर पहिला, दुसरा नंबर नसायलाच हवा पण इंग्रजी शाळेचे नवीन फंडे… त्यानुसार बोर्ड वर टॉप फाईव्ह चे नाव लिहितात.. तसें लिहिलेले होते..
ते बघून आपल्या मुलांना कमी मार्क का पडले.?( ज्यांच्या मुलांना कमी होते त्यांच सांगतेय.. ) हाच विचार पालक करत होते. 🤔🤔🤔
मुलांना ट्युशन आहे, घरी देखील आम्ही अभ्यास घेतो, जास्त वेळ TV नाही बघू देत नाही,  जास्त वेळ बाहेर खेळत नाही. तरीही रिझल्ट इतका कमी.. आणि हे पाच मूल.. मुली समोर कसे नेहमी. 🤔🤔🤔
काहीजणी म्हणतं होत्या.. “आम्हीतर मोबाईल पण देत नाही.. खूपच हट्ट केला तर फक्त अर्ध्या तासासाठी देतो मोबाईल.. आणि पुन्हा अभ्यासाला बसवतो..  सगळं कस शिस्तबद्ध व टाईमटेबल नुसार असत तरी पण मार्क का बर कमी पडतात???? कधीच आमच्या मुलांची नावे अशी बोर्डवर लिहिल्या जातच नाही… असं का?? “🤔🤔
टीचर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन वैतागली होती खरी पण तिने ते चेहऱ्यावर दिसू दिल नाही.
या सर्व गोष्टी ऐकून असा राग आला मला  पालकांचा.. मला इतकंच वाटत.. तुमच्या मुलाला किती मार्क पडले यापेक्षा त्याला त्या विषयातलं किती समजल ?
त्याला सगळे प्रश्न नीट कळले का?
त्याचा अर्थ समजून त्याने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला का?
आपल्या मुलाच /मुलीच पेपर सोडवताना कुठे चुकत..? त्यांचे मार्क कुठे कटले.. त्यांच्या चुका लक्षात घेऊन त्यावर काय करता येईल याचा विचार का नाही करत पालक..???? 🤔🤔🤔
अरे असं सारखं तुलना करता मुलांनमधे.. “तुला जास्त किंवा पैकीच्या पैकी का नाही मिळाले? ” हा प्रश्न व त्यानिमित्ताने मुलांच्या कोवळ्या मनावर स्पर्धा देखील लादत नाही का आपण पालक?
आता काहीजण म्हणतील “स्पर्धेचं जग आहे..मुलांना मागे कस ठेवावं ”
हो मानते मी स्पर्धेच युग आहे.. आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात.. नोकरीची, पैसा मिळवण्याची, सुखवस्तू जीवन जगण्याची यासाठी काहीही करण्याची तयारी लोकांची असते…  आणि अशाच प्रकारची स्पर्धा आपण मुलांना शालेय जीवनात शिकवतो.
या स्पर्धेसाठी आपण मुलांचं बालपण हिरावून घेतो.. त्यासाठी त्यांना ट्युशन लावतो.. काय गरज आहे किमान 4th पर्यंत मुलांना ट्युशन लावायची.
पालक कमीत कमी ग्रॅजुएशन झालेले असतात.. ते नाही शिकवू शकत का मुलांना? या प्रश्नावर तर पालकांच एक उत्तर ठरलेलं असत.. “मूल घरी आमचं ऐकत नाही ” त्यामुळे मुलांच्या शाळेतील टीचर कडेच ट्युशन लावली जाते.  अरे पण शाळेतच का नाही शिकवत ते टीचर चांगल?  याचा विचार करत का कुणी 🤔🤔🤔
नाही..
मी तर एक नवीनच कारण ऐकलं ट्युशन लावण्याच.  शहरात मूल एकमेकांन सोबत जास्त खेळत नाही.. सिंगल चाईल्ड असतात.. आई. वडील घराच्या बाहेर कुणाकडे खेळायला जाऊ देत नाही.. यासाठी “दोन.. तीन तास ट्युशन ला गेला की अडकून राहतो म्हणून ट्युशन लावली आम्ही मुलाची ” असं म्हणतात पालक.
याला काही अर्थ आहे का… तुम्हीच सांगा.
शाळेचा वेळ, घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण करून जरा टीव्ही बघायला बसले की पालक ओरडतात “चल होमवर्क घे करायला मग ट्युशनची वेळ होते.
प्रायव्हेट इंग्रजी शाळेतील शिक्षकांचे पगार फार कमी असतात..  त्यामुळे ते क्लास मधे विचारतात.. “ज्यांना ट्युशन लावायची आहे. त्यांनी आपल्याला आई -बाबांना माझा नंबर देऊन कॉल करायला लावा ”
आणि पालक वर्ग लगेच ट्युशन लावतात..
का तर मुलाला जास्तीत जास्त अभ्यासात गुंतवण्यासाठी..
मला नाही पटत हे.. माझी मुलगी (4th)चौथी ला आहे. मी तिची आज पर्यंत ट्युशन लावली नाही. ती माझ व तिच्या बाबांचं देखील ऐकते. भरपूर खेळते,  TV पण बघते.. मोबाईल वरुन काही अभ्यासाविषयी शिकते तर काही वेळ ड्रॉईंग करते..आणि बरेच गेम देखील खेळते.   तिलाही खेळायला कुणीच नाही सोबत.. सिंगल चाईल्ड आहे आणि बाहेर मुलं जास्त खेळत नाहीच. आम्ही जमेल तसा वेळ देऊन तिच्याशी खेळतो..
माझ्या मते .. ट्युशन कोणाला लावायची असते?  ” तर जो अभ्यासात कमजोर आहे, त्यांना जास्तीच्या शिकवणी लावणे म्हणजे ट्युशन ”
मात्र आजकाल तर ट्युशन लावणे म्हणजे फॅशन झाली आहे..
सकाळी 7am to 1.00pm स्कूल,
दुपारी 3.00pm to 5.00pm ट्युशन. मग वेळच किती असतो मुलांन जवळ?
उरलेल्या वेळात, शाळेचा होमवर्क… ट्युशनचा वेगळाच, यातून वेळ राहिला तर किती वेळ मूल TV वर कार्टून बघत असतील बर?? 🤔🤔 आणि बघत असेलही तर रात्री उशिरा पर्यंत जागरण करत असतील.. आजकाल सगळेच पालक म्हणतात. “आमचा मुलगा /मुलगी रात्री झोपतच नाही लवकर.”
कसा झोपेल. शारीरिक थकवा येईल असं काही खेळतच नाही आजकालची मुलं.. मग बेडवर गेल्यागेल्या झोप कशी येईल??
राहीली गोष्ट मोबाईलची तर त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे बरेच पालक मोबाईल मुलांना देत नाही..
पण स्वतः मात्र मुलांसमोर मोबाईल घेऊन बसतात. आणि मुलांना “ये चल अभ्यास कर ” असं म्हणतात.. पण स्वतः त्यांचा अभ्यास घेत नाही.. त्या मोबाईलला दूर ठेऊन..
आणि मग रिझल्टच्या वेळी किंवा पालक सभेच्या वेळी.. अशा पालकांना जाग येते टिचरला बोलण्याची.. “आमच्या मुलाला /मुलीला मार्क कमी कशे? ” (मी सगळेच पालक म्हणतं नाही त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका )
स्वतः लक्ष द्या मुलांकडे.. आणि ट्युशनच्या कुबड्या दिल्या पेक्षा सेल्फ स्टडी ची सवय लावा मुलांना..
तुझा नंबर का नाही आला?  असा प्रश्न केल्यापेक्षा त्याच्या चुका झालेल्या चुका शोधून त्या दुरुस्त करा.. कधीच दुसऱ्यांच्या मुलांन बरोबर आपल्या मुलांची तुलना करू नका.. तुम्ही दिलेला वेळ जास्त महत्वाचा आहे मुलांसाठी…
आजकालची सर्वच मूल हुशार आहेत.. फक्त त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.. %टक्केवारी महत्वाची असली तरी ती आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्वाची नक्कीच नाही. तुलना करणं थांबवायला हवं पालकांनी.
आपल्या मुलांची कुवत बघून त्याच्याकडून तितक्या मार्क ची अपेक्षा ठेवा.  अवाजवी अपेक्षा लादू नका.. सेल्फ स्टडी ची सवय लावा.. लागेल तिथे मदत करा मुलांना.. खरंच गरज असेल तरच ट्युशन च्या कुबड्या द्या मुलांच्या हातात.. अन्यथा मुलांना त्याचं बालपण जगू द्या.
लहान खांद्यावर ओझ देउ नका..
बुद्धीला झेपणार नाही इतका अभ्यास घेऊ नका…
मूल आहेत आपली.. रेस चे घोडे बनवू नका..
स्पर्धेत सहभागी करा जिंकण्याचा अट्टाहास करू नका…
इवल्याशा जीवाची तुलना करू नका..
बालपण हिरावू नका.. मुलांचं बालपण हिरावू नका…
✍️जयश्री कन्हेरे – सातपुते

मी फक्त माझ मत मांडलं.. मी माझ्या मुलीला सेल्फ स्टडी ची सवय लावली आहे.. त्यामुळे ती तिचा अभ्यास पूर्ण करते.. आणि अडचण आली की आम्हाला विचारते.. आणि हो एक राहिले होते सांगायचे.. रिझल्ट च्या वेळी बोर्डवर असलेल्या पाच नावांमध्ये माझ्या मुलीच नाव पहिल्या नंबर वर होत.. मी तिला कधीच स्पर्धेत ढकलत नाही.. तर ती स्वतः त्यात भाग घेते.
माझ म्हणणं एकच असत.. स्पर्धेत सहभागी होणं गरजेचे आहे.. जिंकण नाही.
आणि अभ्यास करताना आपल्याला किती समजलं यावर जास्त लक्ष द्यायचं.. जे समजलं नाही ते समजावून घ्यायच.. घोकंपट्टी करून मार्क मिळवायचे नाही.. आजकालच्या मुलांना घोकंपट्टी (पाठांतर ) जास्त करता येते.. बाकी व्यावहारिक नॉलेज फार कमी असते..
त्यामुळे.. मुलाची तुलना न करता. त्याच्या चुका समजून घ्या.. व दुरुस्त करा..
समाप्त… ©®जयश्री कन्हेरे सातपुते..
वरील विचार माझे वयक्तिक मत आहे ज्या नुसार मी वागते माझ्या मुलीशी.. माझा कुणालाही आग्रह नाही असेच वागा म्हणून.. तुमची मूल आहेत.. तुमचा निर्णय त्यांना कस घडवायचं.. मला माझ्या पालकत्व प्रवासात आलेला हा अनुभव मी सांगितला.. सगळ्या मुलांची बुद्धी सारखी नसते.. जसे आपली पाच बोट सारखी नाहीत. त्यामुळे मुलांची तुलना करणं बंद करा.. आपल्या मुलाची कॅपेसिटी ओळखून त्याला स्पर्धेच्या चक्रव्युव्हात   पाठवा…
आवडल्यास like, कमेंट करा.. शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. धन्यवाद 🙏🙏©जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल
माझे लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा.. धन्यवाद 🙏🙏

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा