स्पाईक

Written by

स्पाईक
© देवश्री देशमुख
आमचे बाळराजे वय वर्षे ३ हल्ली मुक्काम अमेरिका. प्री स्कूल मुळे अमेरिकन, आफ्रिकन , एशियन सगळेच दोस्त मंडळी. घरात आम्ही त्याच्याशी मराठीत बोलतो तर शाळेत इंग्रजी आणि स्पॅनिश. मग काय, बोलताना एका वाक्यात सगळ्या भाषांची खिचडी😄. तो मात्र हे सगळं मस्त एन्जॉय करतो. सगळं बिनधास्त… स्पॅनिश पोईम म्हणण्याचा जेवढा उत्साह तेव्हढीच एकाग्रता लाडक्या बाप्पा समोर शुभम करोति म्हणताना असते. असो.
तर एके दिवशी बळराजेनी शाळेतून घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या फतवा जाहीर केला… “माझ्या मितलांसालक मला पन पैक हवं” न मी ही सवयी प्रमाणे आपण बाबांना सांगू हा म्हणून वेळ मारून नेली. यात अंदरकी बात म्हणजे अर्ध्या अधिक वेळा बाबा ऑफिसातून घरी येई पर्यंत आमच्या लाडोबाला आपल्या मागणीचा विसर पडलेला असतो😝 . पण त्यादिवशी मात्र त्याने पैक पैक चा जप चालवला होता. वाटलं विसरेल सकाळ पर्यंत पण पुढचे दोन दिवस परिस्थिती जैसे थे.
शेवटी रविवारी बाईक ( छोट्या मुलांची सायकल) घेण्याचे ठरले. दुकानात गेल्यावर बाइक बघुन लाडोबा खूष अन् त्याला बघून आम्ही पण😊🤗. दुकानातून निघाल्यावर हूशशश…. सुटलो बुवा म्हणून निःश्वास टाकणार तोच त्याचा अचानक प्रश्न ,” आई बाबा पैक कधी करायची ? ” तो प्रश्न ऐकून आमची दांडी गुल. आम्हाला काही कळेना आता तर बाइक घेतली आता पुन्हा पैक ? 🤔 शेवटी त्याला विचारलं तर त्यानी एका छोट्या मुलाकडे बोट दाखवलं आणि आम्ही डोक्यावर हात मारला…. कारण त्याला पैक म्हणजे केसांचा स्पाईक कट करून हवा होता.😝😆. कधी कधी लहान मुलांचा शब्दकोष समजणे अवघड असते हेच खरं.
आता नवीन बाइक सोबत न्यू ब्रँड स्पाईक कट पण झाला हे वेगळं सांगायला नकोच.

फोटो गुगल वरून साभार ….

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.