“स्रीजन्मा… ओंजळीत आले निखारे”(भाग-१)

Written by

शहरात अगदीच नवीन होते…

म्हटलं थोडा आसपासचा area बघून येऊ… भाजी, दूध, प्रेसवाला, main म्हणजे पाणीपुरी😋 आसपास कुठे चांगली मिळते हे बघून यावं म्हणून निघाले… सोबत पाण्याची बॉटल घेतली…

Area फिरून आले… छान वाटलं… आजूबाजूचा परिसर ही छान च होता… मेडिकल इमर्जन्सी मध्ये माहिती असावं म्हणून मेडिकलकडे निघाली च होती, तर करकचून ब्रेक लागून गाडी थांबायचा आवाज आला… मागे वळून बघितलं तर एक कार च्या मध्ये येता येता चिमुकली वाचली होती…

ती रडत होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या side ला बोट दाखवत काहीतरी बोलत होती… मात्र तिचं कोणी ऐकायलाच तयार नव्हतं… जो तो बोल-सुनावणी देऊन, हिडीस-निडीस करत निघून जात होतं…

मेडिकलमध्ये जाऊन आसपासच्या डॉक्टर ची थोडी माहिती घेऊन मी निघाले… डोळे मात्र राहून राहून त्या छोट्या मुलीकडे वळत होतें…

शेवटी न राहवून गेलेच तिच्याजवळ… तिच्या अंगावर ड्रेस बऱ्यापैकी च होता… गोरीपानसी बोलके डोळे, ती छोटीसी माझ्याकडे बघून जास्तच रडायला लागली… आपल्या बोबड्या भाषेत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती… तिच्या बाजूला तिची आई अंग चोरून बसली होती…

भिकारी असणार असं वाटत नव्हतं…
खूप weakness असल्यामुळे बहुदा डोळे उघडु शकत नव्हती…

तशीच हातातली पाण्याची बॉटल दिली… बाजूच्या दुकानातून नाश्ता दिला दोघींना ही… आणि घरी निघाली…

पण डोक्यातून तिचा विचार काही केल्या जाईना… मग सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता… मरगळलेल्या अवस्थेंत बसलेली ती… तिलाच बिलगून बसलेलं ते कोकरू… गालांवर अश्रूंचे ओरघळे… तरी होठांवर उसनं आणलेलं हसू… मायलेकीच बिलगून बसलेलं चित्र काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हते…

आतातर तिचा चेहरा एवढा समोर येत होता की ती थोडी ओळखीची च वाटत होती…

“पण अशी रस्त्यावर का आली असणार?? काय झालं असणार त्या दोघींसोबत??? कोणी सोडलं त्यांना अश्या अवस्थेत???”  एक ना अनेक प्रश्नांनीं माझ्या डोक्याचा भुगा केला…

घरी पोहोचले होते पण फक्त शरीराने…  मन मात्र त्यांच्या विचारांत च गुंतलेले होते…

मग विचारा विचारातच गॅलरी मध्ये गेली… मोबाईल मध्ये facebook ओपन करून friend list चाळू लागली…

तेवढ्यात माझी नजर खाली गेली… त्या दोघी gate मध्ये उभ्या होत्या… त्यांना आवाज देऊन, आंत यायला सांगून, मी खाली गेले…

तर त्या निघून गेल्या होत्या… आल्याच नाही… त्यांच्या मागे गेली तर दिसेनाशा झाल्या होत्या… कुठे गेली असणार याच विचारांत परत येताना गाडीच्या आवाजाने मी भानावर आली…

हे ऑफिस मधून आले… ह्यांनी विचारलं…

“अग, काय कुठे धावतेयस?? कोण आलं होतं??”

अहो… मला… तर ….
बोलायला शब्द फुटेना…

मग आम्ही दोघंही घरांत येऊन बसलो आणि मग यांना मी सगळी हकीकत सांगितली…

तर ह्यांनी मलाच हसण्यावारी घेतलं…

“तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे… परिस्थिती बघून ती भिकारी नाही… पण काहीतरी घडलं म्हणून अशी भटकतेय अशी शंका आली म्हणे….” आणि खी खी दात काढत आंत फ्रेश व्हायला गेले…

मात्र माझी शंका दुसऱ्या शंकेत बदलली…

बहुतेक तिने मला कुठेतरी बघितलं आहे किंवा ती ओळखीची तरी आहे याची आता खात्री पटत होती…

तशीच मोबाईल घेऊन अक्ख friendlist facebook वर बघितलं पण मनासारखे काहीच भेटले नाही…

स्वयंपाक केला आणि जेवायला बसलो… पण राहून राहून त्या दोघींचाच विचार येत होता…
जेवण आटपून आवरायला घेतलं…

“त्या दोघींना पण भूक लागली असणार ना!! इथेच असेल आसपास… देऊया का जेवण नेऊन?? कुठे असणार?? कशी काढतील रात्र?? कुठे झोपणार आणि नजरांचा मारा तर होतंच असेल…”  जीव धडपडला माझा लगेच…

टिफिन भरला… ह्यांना पण सोबत चला म्हटलं म्हणून हे शर्ट घालायला आंत गेले आणि मी दार उघडलं आणि….

…आणि जोरात ओरडले…. त्या दोघी… धापा टाकत, उभ्या होत्या….

छोटं लेकरू दोन्ही हातात आडवं घेऊन ती उभी होती… काळ्याशार मोकळ्या केसांत, तिचे आग ओकणारे डोळे, रक्ताळलेले हात…

मी घाबरून किंचाळली… माझी किंचाळी ऐकून हे पण बाहेर आले… तशी ती आत आली आणि म्हणाली “मी… मी  सुरभी… बहुतेक तुम्ही मला ओळखता… हो ना!!!” ती एव्हढच बोलून बेशुद्ध पडली….

मी… माझ्या कानांत काही शब्द च जात नव्हते आणि तिच्या या अवस्थेकडे बघून मी अजूनच घाबरले… काय करावे काहीच सुचत नव्हते…

तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले… तिला आवाज दिले… पण ती काही उठेना… बहुतेक आपलं कोकरू सुरक्षित जागी पोहोचलं अस वाटून ती बिनधास्त झोपली असावी…

आम्ही दोघांनी तिला तसच guest room मध्ये बेड वर ठेवलं… सोबत तिचं कोकरू सुद्धा… आणि आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो…

आम्ही सुद्धा घाबरलोच होतो… काहीच सुचत नव्हते… एकतर नवीन घर, एरिया नवीन, शहर नवीन, त्यात ही अशी situation…

बरं पोलिसांना कळवावे तर…. ही शुद्धीवर नाही 😢…. काय सांगणार त्यांनातरी?? आपणच नको त्या चौकशीला सामोरं जा…!! आणि नाही कळवलं अन् काही कमी जास्त झालं तर आपल्याच अंगावर यायचं प्रकरण…!!
अशा नको त्या विचारांनी आमच्या डोक्यात थैमान घातले होते….

थोडयाच वेळांत ती चिमुकली उठून भुभु करत रडायला लागली… तिचा आवाज ऐकून ही सुरभी सुद्धा दचकून उठून, तिला पोटाशी कवटाळून बसली… दोघीही खूप घाबरलेल्या वाटत होत्या…

आम्हीही दोघे त्यांच्याकडे अशाच अस्वस्थेने बघत होतो…
आता प्रश्नांची सरबत्ती होणार, हे सुरभीला ठाऊक होते… पण मी च म्हटलं, “तू बोलू नकोस जास्त… सकाळी बोलू… आराम कर आणि बिनधास्त राहा…”

आम्हाला मात्र झोप लागेना… आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो परत…

…… क्रमश: …..

कोण असेल ही सुरभी आणि ती मुलगी काय झालं असणार ??? जाणून घेऊ पुढच्या भागात… लवकरच.. तो पर्यंत वाचत राहा… हसत राहा…

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात…. तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल… कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…😂)

—दिप्ती अजमीरे.

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.