स्वतःसाठी जगा… एकदा प्रयत्न करून तर बघा

Written by

स्वतः साठी जगा.. एकदा प्रयत्न तर करून बघा

✍️©®जयश्री कन्हेरे -सातपुते
आज बऱ्याच दिवसांनी ज्योतीला कॉल केला…..
तशी चॅटिंग सुरु असायची.. पण आजकाल कॉल करून बोलणं सगळ्यांनी बंदच केल आहे..
आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ती वर्किंग वूमेन आहे  आणि मी गृहिणी…
आज मुद्दाम तिला कॉल करून विचारलं कशी आहेस? मजेतच असशील..?  नोकरीवाल्या तुम्ही, तुमचे पाचही बोट तुपात असतात… नाही का?,, ????असं गमतीशीर बोलण्याची सुरुवात केली मी.

ती म्हणाली “कसलं तूप आणि कसली बोट ग. सगळी तारेवरची कसरत ग… माझी. तू सांग तू कशी आहेस? “

मी.. अगदी मजेत आनंदात. आयुष्य भरभरून जगतेय. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतेय.. पण तू का तारेवरची कसरत करतेयस?

काय सांगायचे तुला आणि काय लपवायचे ग. नोकरीं घर, मुलगा आणि नवरा सगळंच सांभाळावं लागत.. माझ्या नवऱ्याला तर ऑफिसात जातात.. रुमालापासून वस्तू हातात द्याव्या लागतात. मुलगा देखील बापावर गेलाय.. तोही जरा मदत करत नाही कामात.

का ग… कामवाली बाई नाही लावलीस का?  दोघेही नोकरीवर म्हंटल तर आजकाल स्वयंपाक वाल्या बाया सुद्धा मिळतात.. पैशाची तर अडचण नाहीच तुम्हाला..

कसल्या बाया लावतेस.. आमच्याकडे असं म्हणतात सगळेच की घरच्या सुनेने सर्व करायच मग ती नोकरीकरणारी असली तरी… त्यामुळे घरकामालाच बाई नाही लावली… आणि तू स्वयंपाकाला बाईची गोष्ट करतेस…

अरे असं का?  तू ही बाहेर जातेस थकतेस. मग काय हरकत आहे, बाई लावायला आणि तसंही तू स्वतः पैसे मिळवतेस मग तुला त्या घरात इतकाही अधिकार नाही का?  मनाजोग करण्याचा…

नाही ग.. नाही न अधिकार.. बांधल्या गेलेय मी या नोकरीं आणि संसाराने… जराही मनासारखं करता येत नाही.. मन मारून जगाव लागत आणि पगार घरच्यांना द्यावा लागतो.. कपडे, दागदागिने मोठ घर, चारचाकी गाडी हे सगळं असलं की मानसिक समाधान असत असं नाही ग. माझा आनंद माझी खुशी कशात आहे..हे कुणी कधी बघतच नाही.. मलाच सगळ्यांची मन सांभाळावी लागतात… आणि त्यांच्या आनंदात आनंद मानावा लागतो..

 किती दुःखी मन ग तुझं. मग “तुझ्या आनंदाची सुरुवात कुणापासून “?  कोण बघेल तुझा आनंद..,? 

सांगितलं न घरच्यांच्या आनंदात मी आनंद मानते..

अग वेडे.. आनंद मानणे वेगळे आणि आपण आनंदी असणे वेगळे आहे ग ज्योती…

हो.. सगळं कळत मला पण वळत नाही ग.. घरच्यांची साथ देखील नाही न त्यात.. सगळं मलाच करावं लागत..मी काय माझ रडगाणं घेऊन बसलेय तू सांग तुझं कस काय चाललंय?

मी मजेत आहे ग. आणि खरंच आनंदी आहे..कारण मी स्वतःवर प्रेम करते, स्वतः साठी जगते… याचा अर्थ असा नाही की मी एकटी राहते… मला पूर्ण कुटुंब आहे..नवरा, मुलगा, सासू-सासरे, दीर आणि नणंद जिचं लग्न झालेलं आहे.. मी सगळ्यांचं करते पण माझ ठरलेलं आहे…स्वतःसाठी जगायचं. नवरा किंवा मुलगा कुणीच कुणाच होत नाही..मग आपल अनमोल जीवन फक्त यांचं करण्यात का घालवायच?  स्वतःसाठी जगायचं.. म्हणून लग्नापासूनच मी सगळ्यांना हातात वस्तू देणारी नाही हे समजावून दिल.
ज्याला जे हवं ते घ्या.. पण मी तुम्हांला सगळं टिपिकल बायकोसारखं हातात सर्व वस्तू देणार नाही. चहा, जेवण ठीक आहे पण अंघोळीच्या कपड्यापासून ते रुमालापर्यंत माझ्यानी देण होणार नाही. मी घरी असते म्हणून सर्व काम मीच केली पाहिजे कुणी असा नियम केलाय का?  नाही न… म्हणून मी कपडे, भांड्याला बाई लावलीय.. स्वयंपाक करते मी… बाकी सगळी कामे करण्यासाठी घरातील सदस्यांची मदत घेते.
कारण मला जगायचं आहे ग हसत -खेळत.. मन मारून नाही.

वा.. ग.. माझी झाशीची राणी.. गृहिणी आहेस तरी सुखाने जीवन जगत आहेस आणि एक मी आहे आणि बऱ्याच नोकरीवाल्या ग ज्या मन मारून जगतात. आमचा आनंद कशात आहे हे आम्हालाच माहिती..
असच जगावं लागेल आणि एक दिवस असच मरावं लागेल.

काही तरी काय बोलतेस ज्योती…. अग आनंद, खुशी कुणी आपल्याला देईल याची वाट का बघायची.. आपल्या आनंदाची सुरुवात आपल्यापासूनच करायची. तुला एक कविता सांगू माझी..

सांग ग.. बरेच दिवस झाले ऐकली नाही तुझ्या तोंडून सांग.
ऐक तर मग माझी कविता..

सांगतेय न स्वतःसाठी जगा,
एकदा प्रयत्न करून तर बघा…

विसरा सर्व संसाराचा व्याप,
मोकळा श्वास घेऊन तर बघा…

नवरा-मुलं, करू द्या की त्यांच त्यांना,
स्वतःला आरशात नीट निरखून तर बघा...

एकदाच मिळतो मानवी जन्म,
त्याला आनंदाने स्वीकारून तर बघा….

घर-घर, नोकरी-नोकरी नेहमीचीच की,
त्यातून बाहेर पडून हे जग अनुभवून तर बघा…

व्हाट्स-अप,फेसबुक त्यासाठीच तर आहे,
अनोळखी मैत्रिणी जोडून,मन मोकळे करून तर बघा….

वेळ काय कुणालाच नसतो,वेळ काय कुणालाच नसतो,
वेळात वेळ काढून या अनमोल क्षणाचा आनंद घेऊन तर बघा…

म्हणून म्हणते,एकदा प्रयत्न करून तर बघा,
एकदाच फक्त एकदाच स्वतःसाठी जगून तर बघा…
आपल्या आनंदाची सुरुवात स्वतःपासून करून तर बघा...
कशी वाटली कविता..

खुप छान.  असं वाटलं माझ्यावरच केलीस की काय? ?

अगदी बरोबर ओळखलस.. तुझ्या वरच केली.. आता तरी स्वतःसाठी जग.. आणि आनंदाची सुरुवात स्वतापासून कर.. माझ्या आनंदाची सुरुवात मी माझ्यापासून केली आहे..असच वागून, आणि स्वतःवर प्रेम करून..

बघते ग  प्रयत्न करून… पण मला जमेल असं वाटत नाही..

नक्की कर प्रयत्न.. जमेल हळू हळू… “आनंदाची सुरुवात माझ्यापासून“इतकं लक्षात ठेवल की समोरच आपोआप करता येत.
समाप्त… ✍️जयश्री कन्हेरे -सातपुते
स्त्रिया संसारात इतक्या गुंतून जातात की स्वतःसाठी त्यांना वेळच नसतो मग ती नोकरीं करणारी असो अथवा गृहिणी. पहिले घरच्यांचा आनंद.  आणि त्यातच स्वतःचा आनंद मानतात स्त्रिया… त्यांना एकच सांगायचे आहे की.. एकदा स्वतःसाठी जगून बघा… संसार करायचाच आहे..पण एकदा स्वतःवर प्रेम तर करून बघा.
कसा वाटला लेख नक्की सांगा.. आवडल्यास like कमेंट करा आणि शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. धन्यवाद ✍️©®जयश्री कन्हेरे- सातपुते ?फोटो साभार गुगल

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत