स्वप्नातला राजकुमार ?(भाग दोन)

Written by

*पहिली भेट?

लग्न ठल्यानंतर त्या सहा महिन्यात आम्ही भेटलो सुध्दा ! कधी घरी सांगून तर कधी घरी ना सांगता..? पहिल्यांदा आम्ही अमरावती म्हणजे माझ्या सासरीच भेटलो होतो..

अमरावतीमध्ये माझी मावस बहीण शिक्षणासाठी रूम करून राहायची..तिच्याकडे २ दिवस राहून मी, माझी ताई आणि मावस बहीण ,मावशीकडे जाणार होतो..

माझ्या डोक्यात भेटण्याचा विचार सुद्धा आला नव्हता..

पण माझ्या मावस बहिणीने भेटण्यासाठी सुचवलं ! दुपारी अमरावतीला पोहचलो.. तसाच माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला, म्हणाला तुझ्या बहिणींना आपलं लग्न जमल्याची पार्टी द्यायची आहे..??

पण वेळेवर काम निघाल्यामुळे त्याचं येणं जमलंच नाही..??

संध्याकाळी परत फोन आला, न येण्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली ! आणि आताच तुमच्यासाठी जेवणाचे पार्सल घेऊन येतोय म्हणून सांगितलं !

मला खूप आनंद झाला..लग्न ठरल्या नंतर आम्ही पहिल्यांदा भेटणार होतो..??

तो ठरल्या वेळेत पार्सल घेऊन आला..फक्त ५ मिनिट थांबून निघून सुध्दा गेला…?पण त्या पाच मिनिटात मी ,आनंदाचे पंख लेऊन आकाशात एक गिरकी मारून आले..

शब्दात व्यक्त न करता येणारी ती पहिली भेट!! आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, माझं हक्काचं कुणीतरी आहे..माझी काळजी करणारा ,प्रोटेक्ट करणारा, माझ्यावर भरभरून प्रेम करणारा माझा स्वप्नातला राजकुमार आयुष्यात आला होता…?”

प्रत्येक दिवस आनंदात जाईल

तू भेटलास तर …

मी स्वतः ला सुध्दा विसरेल

तू हसलास तर…

माझे स्वप्न पूर्ण होतील

तू आयुष्यात आलास तर..

सदैव माझ्या पाठीशी उभा रहा

तू फक्त माझासाठी एवढंच कर..

तो गेल्या नंतर माझी मावस बहीण म्हणाली मला,” तुझाबद्दलच प्रेम त्यांचा डोळ्यात दिसत”..मला तर नाही दिसलं प्रेम! असं म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं..?

त्यावर ती लागलीच म्हणाली, तू त्यांच्याकडे बघतच कुठे होती? तू बोलतं नव्हती म्हणूनच ते माझ्याशी बोलत होते ना? पण माझ्याशी बोलताना मात्र ते तुझाकडेच बघत होते?

हे ऐकल्यावर मात्र मलाच वाईट वाटलं,मी बोलायला हवं होत..पण मला तेव्हा काही सुचलच नाही! आनंद तर खूप झाला की त्यांच्या मनातल प्रेम डोळ्यात दिसतं?मी मनातून मोहरले होते..प्रेमात न्हाऊन निघत होते…?

दुसऱ्या दिवशी माझ्या जाऊचा वाढदिवस होता..मी अमरावतीला आलीय हे मी सासरी सांगितलच नव्हतं..मी फक्त wish करायला फोन केला तर बोलण्या बोलण्यात निघून गेलं की अमरावतीला आलीय म्हणून..

मग काय? घरून invitation आलं..आपल्याकडे पद्धत आहे, लग्ना आधी सासरी जायचं नसतं..का जायचं नाही ? मला नाही माहित..?मी मात्र सासरच्यांचा मान रहावा म्हणून माझ्या बहिणींसोबत गेले …आणि…

क्रमशः

४/७/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत