स्वादिष्ट पौष्टिक धिरडी.#recipe

Written by

© सुनीता मधुकर पाटील.

#स्वादिष्ट_पौष्टिक_धिरडी.

आज आपण पाहुयात छान स्वादिष्ट पौष्टिक धिरडी कशी करायची. हे पोटभरीचे अन्न असल्यामुळे तुम्ही न्याहरी किंवा अगदी रात्रीच्या जेवणात देखील बनवू शकता. यात ज्वारीचे पीठ वापरल्यामुळे याचे पोषणमूल्य नक्कीच वाढते.

साहित्य – एक वाटी ज्वारीचे पीठ,
एक वाटी बाजरीचे पीठ,
एक वाटी बेसन,
एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर किंवा मेथी,
सहा ते सात लसुन पाकळ्या,
4 – 5 हिरव्या मिरच्या,
छोटा तुकडा ओलं खोबरं
एक चमचा जिरे, एक चमचा धने आणि एक
चमचा ओवा यांची भरड,
अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ
2 चमचे तेल,
आवश्यकते नुसार पाणी.

कृती – प्रथम ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ आणि बेसन छान चाळून घ्यावे. बाजरी आरोग्यासाठी उत्तम धान्य आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करते, तसेच कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. नंतर चाळलेल्या पिठात हळद, चवीपुरते मीठ, जिरे, धने आणि ओवा यांची भरड मिसळावी. लसूण, हिरवी मिर्ची आणि ओल्या खोबऱ्याच वाटण बनवून ते देखील त्यात मिसळावे. एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर मिसळावी. गरजेनुसार पाणी ओतून पीठ कालवून घ्यावे, पीठ जास्त पातळ ही नको आणि जास्त घट्ट ही नको.
तुम्ही यात बारीक चिरलेली मेथी किंवा किसलेला बटाटा ही आवडीप्रमाणे घालू शकता.
गरम तव्यावर थोडे तेल सोडून पीठ चांगले ढवळून डोस्याप्रमाणे पसरून घ्यावे. 2 ते 3 मिनिटे एका बाजूने झाकण ठेवून छान भाजून घ्यावे.
नंतर झाकण काढून धिरडे पलटुन दुसऱ्या बाजूने ही छान भाजून घ्यावे.
दही किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करावे.

© सुनीता मधुकर पाटील.

©copyright.

Comments are closed.