हक्क – पैसा आणि नाती सांभाळतांनाhi

Written by

निलाचा दरवेळेस प्रमाणे आजपण मुड खराब होता. तिच्या पगाराचा दिवस असला की, तिच्या घरात महाभारत घडत असे.एकाच गावात सासर आणि माहेर असल्यामुळे ती पगाराच्या दिवशीच आईकडे जाऊन स्वतःच्या कामापुरती रक्कम काढून बाकीचे सर्व पैसे आईकडे जमा करत असे. परंतु, पुढे काही दिवसांपासून तिच्या पगारावरुन त्यांच्या घरात सतत भांडणे होत असत. स्वतःच्याच पैशावरवरचा तिचा हक्क काढुन घेतला जात होता. संसाराचा या चक्रव्यूहात ती पुरती अडकली होती. एकीकडे नवरा आणि सासूसासरे तर दुसरीकडे विधवा आई आणि लहान भाऊ. निलाशिवाय त्यांना कोणताच आधार नव्हता.
यावेळेस तर कहर झाला होता. संजयला अचानक आठ दिवसांसाठी आँफीस टूरला गेला त्यावेळी तिच्या नंणदेनी आणि सासुबाईंनी आई आणि भावावरून नकोनको ते बोलून गेल्या. शिवाय हात उचलण्यापर्यंत मजल गेली. तिने संजय घरी आल्यावर त्याच्या कानावर ही बाब लक्षात आणून दिली. पण, तोही नात्यांच्या बंधनात गोंधळून गेला, काय करावे हे त्याला समजेना, त्याने निलाची आणि आई -वडील व बहिणीची तात्पुरती समज घातली.व सर्वांना शांत केले.
निला मात्र पैसा आणि नाती या भोवर्‍यात सापडली होती. अतिशय खस्ता खाऊन तिने निलाला आणि तिच्या भावाला लहानाचे मोठं केलं. म्हणून नीला आज एका इंग्रजी शाळेवर उत्तम शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि तिच्या भावाने निलेशने बारावीची परीक्षा उत्तीर्ण करुन नीट च्या परीक्षेची तयारी करत होता.
निलाच्या आईने उत्तम प्रकारे निलाचे लग्न सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात करून दिले. निलाचाही संसार सुखाचा सुरु झाला .पण, ती तिच्या माहेरी करत असलेली मदत कुणालाच रूचत नव्हती आणि वर्षे दीड वर्षातच तिच्या पगारावरून वाद सुरु झाला होता.
पैसा आणि नात्यांचा समतोल साभांळणे तिला कठीण जात होते. कष्ट करून आपल्याला उत्तम शिक्षण देणाऱ्या आईचे उपकार ती जन्मभर विसरु शकणार नव्हती.
त्यामुळे जेव्हा संजयच्या घरचे तिला बघण्यासाठी आले तेव्हाच तिने सर्वांना कल्पना दिली कि, माझ्या शिवाय माझे घर अपुर्ण आहे. माझ्या भावाला नोकरीला लागे पर्यंतचा त्याच्या शिक्षणाचा खर्च मी करणार. तेव्हा सर्वांनीच तिच्या कल्पनेला होकार दिला. आणि मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले.
परंतु, दोन्ही नाते सांभाळण्यासाठी तडजोड करावीच लागते. स्वतःच्या स्वप्नांना, आशा ,अपेक्षांना मुरड घालावी लागते.याचा विचार तिने कधी केलाच नाही. सर्वजण आपलीच माणस आहेत या गैरसमजुतीतुन वादाला तोंड फुटले होते.
पैसा आणि नाती या दोन गोष्टी उजेड आणि अंधार यांसारख्या असतात. प्रखर प्रकाशात अंधार जसा उजळुन निघतो. त्याचप्रमाणे पैशाच्या खणखणाटात नात्यांचा उथळपणा दिसून येतो.
त्यातल्या त्यात सुनेविषयी जर बाब असेल तर नणंद, मावशी, आत्या सर्व जण तिला गृहीत धरतात. मग ते तिच्या सासरचे असो किंवा माहेरचे.
परंतु, निलाच्या घरात हे सर्व घडणार याची कल्पना तिच्या आईला होतीच. लग्नानंतर मुलीवर आणि तिच्या कमाईवर माहेरचा हक्क कमी होते हे ती जाणुन होती आणि कोणत्याही वादाला तोंड फुटू नये, कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी निलाच्या आईने घेतली होती.
लग्नानंतर पहिल्यांदाच निला आईकडे पैसे द्यायला आली आणि पगार देऊन निघुन गेली, त्याच्या दुसर्‍याच दिवशी निलाची आई कोणालाही न सांगता संजयला भेटायला त्याच्या आँफीस मध्ये गेली आणि निलाने दिलेला संपूर्ण पगार संजयच्या हातात दिला व
म्हणाली, जावईबापू, यावर आता तुमचाच हक्क आहे. मला यातील एक रुपया देखील नको आहे. मी कमावत असलेल्या पगारात आम्हा मायलेकाचे उत्तम दिवस जातील .मी दर महिन्याला तुम्हाला निलाने दिलेला पगार सुपूर्त करीत जाईल. आपल्या मधील हा संवाद आपल्यातच राहिल याची काळजी घ्या. जेणेकरून नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण व्हायला नको. या पैशांच्या आणि नात्यांच्या गोंधळात निलाची फरफट व्हायला नको. बाकी तुम्ही समजुतदार आहातच.
संजय बोलला, अहो, आई जितका माझा निलावर हक्क आहे त्यापेक्षा अधिक तुमचा नाकावर, त्यामुळे मला हे पैसे नकोत, तुम्ही निलाजवळच द्या.
हे बघा संजय, आई बोलली, माझी मुलगी स्वाभिमानी आहे त्यामुळे ती या गोष्टीसाठी तयार होणार नाही. आता मी निघते, असे सांगून त्या निघून सुध्दा गेल्या.
संजयच्या घरी मात्र या विषयीची चर्चा परत सुरूच होती, परत एकदा आई आणि त्याच्या बहिणीने निलावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी संजय नेमका घरी आला. तेव्हा त्याने जी गोष्ट निलाला देखील समजु द्यायची नव्हती, ति त्याला सर्वांसमोर सांगावी लागली. तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले.
निलातर काहीच बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. इतक्या दिवसांपासून संजयने आणि आईने हि गोष्ट का लपवून ठेवली. याचे मात्र तिला आश्चर्य वाटत होते. पैशामुळे आपल्या आणि निलाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला नाही याचेच त्याला समाधान वाटत होते.
नात्याच्या या प्रवासात भांडणाचा शेवट मात्र गोडीगुलाबीने झाला. परत एकदा घरातील वातावरण आनंदी झाले.

लेख आवडल्यास Like, Comment आणि Follow करायला विसरू नका!

#माझेलेखन #टॉपब्लॉग्ज

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा