हवा छोटासा ब्रेक नात्यातही

Written by

राकेश आणि निताचं लग्न झालं आणि त्यांच्या संसाराला सुरुवात झाली..नवनवीन लग्न म्हणजे कसं अगदी छान दिवस असतात ना.. त्यालाच आपण हनिमून काळ असं म्हणतो.. एकमेकांना समझून घेत, एकमेकांचा आदर करत, एकमेकांच्या आवडी निवडी जपत प्रेमात आकंठ बुडालेले होते..दोघांच्या दैनंदिन routine ला सुरुवात झाली.. दोघेही सकाळी लवकर कामावर जायचे आणि संध्याकाळी 7-8 वाजायचे घरी यायला… प्रत्येक लग्नात होतं तसं त्यांचं हनिमून काळ संपल्या नंतरचा तोच तोचपणा आला… आणि तू तू मै मै प्रकार चालू झाला .

दोघेही एकमेकांना ग्राह्य धरू लागले आणि मग त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले… ते खटके इतके वाढले की त्यांच्यात अबोला चालू झाला…निताला सगळं नकोस व्हायला लागलं.. राकेश ही घरी लवकर येणं टाळू लागला… एक दिवस असच त्यांच्यात खूप मोठा वाद झाला… आणि दोघेही कामावर गेले… निता ऑफिस मधल्या कॅन्टीन मध्ये बसून रडत होती तेव्हड्यात तीची मैत्रीण रमा आली आणि काय झालं विचारू लागली… नीताने तिला सगळी हकीकत सांगितली तेव्हा रमा बोलली की एक काम कर.. तुला ब्रेकची खूप गरज आहे.. तू बॅग पॅक करून 2 दिवसासाठी माझ्या घरी राहायला ये… निता काही तयार नव्हती पण रमा म्हणाली तुला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर यावंच लागेल… निता तयार झाली आणि राकेशला काहीच न सांगता रमाकडे आली…. जाताना हॉल मध्ये टेबलावर एका चिट्ठी ठेवून गेली..इकडे राकेश आल्या आल्या बेल वाजवला पण दरवाजा कोणी नाही उघडला तेव्हा स्वतःकडच्या चावीने उघडून आत आला.. आल्या आल्या चिट्टी वाचली तेव्हा त्याला कळालं की निता घर सोडून गेली आहे…

 

जेवण ऑर्डर केलं त्याने आणि झोपून गेला लगेच… सकाळी निता नसल्यामुळे उठायला उशीर झाला आणि गडबडीने कसतरी करून ऑफिस ला जायला निघाला… आज टिफिन देणारं, गरमा गरम नास्ता आणि चहा देणारं कोणी नव्हतं… त्याला धड सॉक्स आणि रुमालही सापडत नव्हता… ऑफिस मध्येही त्याच लक्ष लागेना… दररोज निताच्या कॉलला वैतागलेला तो आज त्याच कॉल ला मिस करू लागला… दुपारी न चुकता आपण जेवलो की नाही ह्याची चौकशी करणारी ती आज कुठेच नव्हती… बैचेन मनःस्थितीतच घरी आला तर घराचा अवतार बघण्यासारखा होता… निता होती तेव्हा कसं सगळ्या वस्तू जागच्या जागी असायच्या ह्याची त्याला जाणीव झाली.. इकडे निताचीही अवस्था काही वेगळी नव्हती… सकाळी उठताना अजून 2 मिनिट झोप ना म्हणणार कोणी नव्हतं… गरम गरम चहा बनव… दोघेही टीव्ही बघत पिऊया म्हणायला राकेश नव्हता आज… ऑफिसला उशीर झालं म्हणून चिडचिडणारा आणि तरीही तिला ना चुकता ऑफिस पर्यंत सोडणारा त्याची खूप उणीव जाणवत होती.. कितीही भांडण झालं तरीही झोपल्यावर हळूच चादर घालणाऱ्या त्याची तिला आठवण येत होती… ती दमलेली असताना हळूच जेवायची ऑर्डर देणारा तो आठवत होता… निता रमाकडे गेली आणि रडत म्हणायला लागली… रमा मला राकेशकडे जायचं आहे… माझ खूप प्रेम आहे ग त्याच्यावर… खूप काही करतो तो माझ्यासाठी नकळतपणे… मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय…


रमा म्हणाली ठीक आहे वेडू उद्या जा.. आज एका दिवस रहा इथेच…

तेव्हड्यात दारावरची बेल वाजली आणि दरवाजा उघडला तर समोर राकेश.. त्याला बघता क्षणी निताने पळत जाऊन मिठी मारली… रमाने दोघांना आत बोलावलं आणि दोघांना हॉल मध्ये बसायला सांगून आत गेली… राकेश नीताला म्हणाला.. मला माहीत होतं तू इथेच आली असणार… तुझ्याशिवाय त्या घराला घरपण नाही आणि मी तर अपूर्णच आहे.. तू चल घरी… माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर… मी नाही राहू शकणार.. माफ कर मला… निता हे ऐकून रडायला लागली आणि म्हणाली.. नाही माझंच चुकलं… माफ करा.. तुम्हाला मी समझू नाही शकले.. दोघेही आपल्या घरी जायला निघतात.. इकडे रमा खुश होते कारण तिचा प्लॅन यशस्वी झालेला असतो..

 

असाच होतं ना आपल्याही बाबदीत…

जेव्हा लग्नानंतर सुरुवातीचे दिवस असतात तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींना सोडून देत असतो… एकमेकाना वेळ देतो.. आवडी निवडी जपतो पण कालांतराने ह्याच छोट्या छोट्या गोष्टी मोठया वाटायला लागतात आणि संसाराची गोडी कमी व्हायला लागते… कधी कधी तर नको हे नातं..संपवून टाकावं इथेपर्यंत आपली मजल जाते..हे असं का होतं तर लग्नानंतर आपण एकमेकांना गृहीत धरायला लागतो…ती/तो कुठे जाणार mala सोडून असं म्हणून रुसवा फुगवा काढायचं सोडून देतो.. त्यासाठी हे होऊ नये म्हणून आपल्याला आपल्याच जोडीदाराला द्यावा लागेल एका छोटासा ब्रेक.. कारण आपल्याला दररोज दररोज डाळ खाल्यावर कसं कंटाळा येतो तसंच दररोज दररोज एकाच पॅटर्न च्या जीवनाने ही कंटाळा येतो.. ह्यासाठी निरस होतं चाललेल्या नात्यात रस भरण्यासाठी हा ब्रेक खरंच गरजेचा आहे… हा ब्रेक एकमेकांवरचा प्रेम दृढ व्हायला मदत करतो… हा ब्रेक घेतल्याने एकमेकाना कळत की ती व्यक्ती नकळतपणे आपल्यासाठी काय काय करते ज्याची आपल्याला जाणीवही नसते… हा ब्रेक तुम्हाला विचार करायला भाग पाडतो की ह्या नात्याने तुम्हाला काय काय दिलंय.. एकमेकांशिवाय तुमचं आयुष्य किती निरस आहे… तुमचं काय चुकतंय, तुम्ही कुठे सुधारू शकता, आपलं म्हणणं भांडण न करताही कसं त्याच्यापर्यंत पोहचवू शकतो…प्रवास करताना रस्त्यांवर स्पीड ब्रेकर असतात, ते छोटेसेच असतात. पण पुढचा प्रवास त्यामुळेचतर सुरळीत होतो. असे छोटे छोटे ब्रेक नात्यामधे घेतले तर पुढचा संसाररुपी प्रवास सुरळीत होइल.ह्या ब्रेक मध्ये आपण जोडीदार कडे तटस्थ पणे पहायला लागतो. जोडीदार पेक्षा आपण एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे असलेले गुण दोष पाहायला लागतो तेव्हा कळते की प्रत्येक व्यक्ती त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. चला तर मग सुखी संसारासाठी आपण ही जोडीदाराला थोडा छोटासा ब्रेक देऊन आपल्याबद्दल विचार करायला भाग पाडूया… हा ब्रेक तुम्ही माहेरी जाऊनही देऊ शकता, आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत फिरायला जाऊनही देऊ शकता… किंवा स्वतःला आवडत असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवून ही देऊ शकता… पण नक्की काळजी घ्या की हा ब्रेक छोटासाच असू दे… कसा वाटला हा लेख मला नक्की कंमेंट करून सांगा.. धन्यवाद.. 🙂

 

 

असेच छान छान ब्लॉग्स वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचे पेज लाईक करा..😊

 

https://www.facebook.com/irablogs

Comments are closed.