हाहाकार…!!!

Written by

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि एकच हाहाकार माजला.मुसळधार पावसाने धरण फुटल्यामुळे जिवीत व वित्त हानी झाली.पुराच्या पाण्याने गुरे ढोरे व घरे वाहुन गेली. अनेक माणसे मृत्यूमुखी पडली, गावागावातुन पाणी शिरले .सार्यांचे संसार उद्ध्वस्त झाले .असा प्रसंग येतो तेंव्हा आयुष्य म्हणजे काय हे कळत….विदीर्ण मनाचे हृदयातून विव्हळण ऐकू येते त्यावेळी मानवाने मानवासाठी केलेल्या चुका भोगाव्या लागतात .दुर्घटनेत अशा निष्पाप लोकांचे बळी जातात तेंव्हा त्यांच्या अंतःकरणातील वेदना लेखणीने टिपण्याचा केलेला काव्यमय प्रयत्न ……..!!

🔵

तिवरे धरणफुटी : अंतरीच्या वेदना…!!

धरणातील पाण्याने येतो मानवी जीवनाला बहर

त्याच पाण्याने केला जीवनाचा कहर

स्वप्ने पाहिली रात्री राहून – राहुन

धरणाच्या पाण्याने गेली ती वाहून

संसार मोठ्या डामडौलाने थाटला

त्याच संसारावर काळाने घाला घातला

घरदार नाही शोधतो निवारा

आत्ता हवा फक्त माणुसकीचा सहारा

उज्वल भारताचा मनात बांधला होता चंग

वाटल नव्हतं धरणाच्या पाण्याने होईल याचा भंग

ईथुनपुढे तरी धरणाचे.काम नेकीने करा

व्यथा आमची ऐकून काळजाळा पडेल चरा

✍

नामदेव पाटील .

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत