हिमा दास : वेगावर मात करणारी सुवर्णकन्या …!!

Written by

? हिमा दास : वेगावर मात करणारी सुवर्णकन्या…!!

हिमा दास…
थक्क करणारा तुझा प्रवास..
प्रचंड तुझी आस
अजब तुझा ध्यास
निरंतर धावण तुझा श्वास
दृढनिश्चयी तुझा आत्मविश्वास
तुझ्या यशाचा दरवळतो सुवास
आम्ही भारतीय अभिनंदन करतो खास

— तमाम भारतवासियांकडून हृदयपुर्वक शुभेच्छा ….!!

स्री ही विजयी पताका झळकण्यात अग्रेसर होत आहे हे भारत देशाचे भाग्य उजळण्याचे नवे संकेत आहेत.स्रीयांनी आपल्या प्रगल्भ बुद्धीकौशल्याने प्रत्येक क्षेत्रांत नेत्रदिपक यश मिळवले आहे.मुलांना सुसंस्कार देण्यापासुन ते अंतराळात झेपावण्यापर्यंत मजल मारली आहे. प्रेम , जिद्द , चिकाटी , त्याग , कष्ट , ध्येर्य , प्रामाणिकपणा , सहनशीलता अशा तेजोमय गुणामुळे स्रीने मानवी जीवनाला जगण्याचे वलय प्राप्त करुन दिले आहे. क्रिडा प्रकारात स्रीयांनी मारलेली मुसंडी लक्षवेधक आहे.
जुलै महिन्यात देशातील क्रिडा माध्यमांचे व सार्यांचे लक्ष प्रामुख्याने भारतीय क्रिकेट संघाकडे लागले असताना हिमा दास ह्या आसामच्या ॲथलीटने युरोपातील कांही स्पर्धामध्ये सुवर्ण पदके जिंकण्याचा धडाकाच लावला होता.हिमा दासने महिन्याला पाच सुवर्ण पदके जिंकली पण माध्यमांनी तीची म्हणावी तितकी दखल घेतली नाही.केवळ क्रिकेटचा उदो उदो करणाऱ्या माध्यमांना हिमा दासची सुवर्ण कमाई दिसली नाही.२०० मिटर व ४०० मीटर स्पर्धामध्ये हिमाने आत्तापर्यंत कांही विक्रम प्रस्थापित केले असुन भविष्यात या १९ वर्षीय युवतीकडून अॉलींपिक एशियाड , राष्ट्रकुल अशा बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांची आशा बाळगता येईल .४०० मीटर धावण्याचा स्पर्धेतला राष्ट्रीय विक्रम तीच्या नावावर आहे.ॲथलीटक्समध्ये हिमाच्या रुपाने वायु वेगाने धावणारी सुवर्णकन्या भारताला गवसली आहे.ॲथलीटक्सची खाण म्हणून संबोधले जाणारे प्रदेश म्हणजे प्रामुख्याने पंजाब , हरियाना , केरळ व कांही प्रमाणात महाराष्ट्र , पण आसामसारख्या फारशी क्रिडा पाश्वभूमी नसलेल्या राज्यात हिमा सारखे रत्न उदयास आले हे कौतुकास्पद आहे.आसामच्या नागाव जिल्ह्यातील काधुंलिमारी गावात हिमाचा जन्म झाला .शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या हिमाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो .गावाकडील भाताच्या खाचरात एका शिक्षकांने हिमाला फुटबॉल खेळताना पाहिले .त्या वयातील तीची ऊर्जा पाहून ते थक्क झाले.त्यांनी तीला ताबडतोब ॲथलीटक्समध्ये येण्याचा सल्ला दिला.नंतर तीची भेट निपोनदास या प्रशिक्षकांशी झाली.वार्याच्या वेगाने धावणार्या, दास यांनी तिच्यातील क्षमता हेरली आणि तिला गुहाहाटीला येण्याचा आग्रह केला.घरापासुन दुर मोठ्या शहरात पालक सोडण्यास तयार नव्हते मात्र प्रशिक्षकांनी समजुत घातली आणी तिचा नविन प्रवास सुरु झाला.आज चर्चा आहे तिच्या धाडसाची….ही मुलगी कांहीही करु शकते असा सर्वदूर तिचा लौकिक पसरला आहे.तिच्या अलौकिक धाडसामुळे एकटीने स्वतःच्या व आसपासच्या गावातील दारुबंदी केली आहे.हिमा फार हट्टी व दृढनिश्चयी आहे.या स्वभावामुळेच ती यशाच्या शिखरावर पोहचली आहे. हिमाने मिळविलेली सुवर्णपदके ज्यादा तर २०० मिटर प्रकारातील आहेत.यापुढे हिमाला अनेक खडतर स्पर्धामध्ये भाग घेउन यश मिळवावे लागेल त्यासाठी तिला चागले प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे या सर्वावर मात करुन हिमा नक्कीच भारतिय तिरंगा सगळीकडे फडकवेल….
हिमाच्या या जिद्दीला व थक्क करणार्या आदर्श प्रवासाला सलाम….!! व यापुढेही असेच यश पादाक्रांत करण्यासाठी तमाम भारतवासियांकडून लाख लाख शुभेच्छा …..!!
b
—✍नामदेव पाटील.

Article Categories:
नारीवादी

Comments

  • खूपच छान !!

    Annsaheb Desai 30th जुलै 2019 5:14 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत