हिमा दास

Written by

कथा १००शब्दात..!

©नेहा खेडकर

हिमा दास

आज हिमाला पदक घेताना तो १८ वर्षाचा काळ सर्रकन तिच्या डोळ्यासमोर आला. सुवर्ण पदक स्वीकारुन झाल्यावर भारताचे राष्ट्रगीत चालू असतांना हिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

आसाम मधल्या ढिंग गावातली ,एकाच महिन्यात सलग ५सुवर्ण पदक घेणारी हिमा दास ,एका भात पिकवणाऱ्या सर्वसामान्य, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेली… हिमाचा प्रवास किती खडतर होता हे शब्दात सांगणं अवघडच…!एक वेळ अशीही होती जेव्हा हिमाला धावपटू म्हणून साधे बूट घेण्यासाठी पैसे नव्हते…

जेव्हा देश गाढ झोपेत होता तेव्हा ह्याच हिमाने
एकटीने, जिद्दीने कष्टाची पराकाष्टा करत देशाला सुवर्ण पदक मिळवून “नावात काय ठेवलंय हो… ते मिळवून उमजत..” हे तिच्या अश्रूमधून सगळ्यांना दृष्टीस आणून दिले…!

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत