हिरोईन दि थंडर बर्ड (भाग ११)#कादंबरी

Written by

हिरोईन दि थंडर बर्ड ( भाग ११)

©®स्वामिनी चौगुले

हिरोईन दि थंडर बर्ड (भाग१०) खालील लिंकवर

https://irablogging.com/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7%e0%a5%a6-2/

विद्यश्रीने धनश्रीला सगळ्या लोकांच्या मध्ये फरपटत आणले.विद्यश्रीने धनश्रीचा हात करकचून धरला होता.ती विद्यश्रीला बोलू लागली.

धनश्री,“दि you are hurting me stop it!” असं म्हणून तिने तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पण विद्यश्रीने तिचा हात अजून दाबून धरला.

विद्यश्री,“o really! Are you hurting! एवढी नाजूक झालीस विनिश बरोबर लग्न केले की विसरलीस याच तुझ्या नाजूक हाताने o oh sorry काळ्या हाताने तू माझी काम करत होतीस! You bitch आणि आता भलतीच नाजूक झालीस की ग काळे!” असं म्हणून ती हसू लागली.

तेव्हढ्यात विनिश तेथे आला आणि त्याने धनश्रीचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला व तो बोलू लागला.

विनिश,“ mind your language विद्यश्री! धनश्री माझी बायको आहे so behave your self!” तो रागाने बोलला.

विद्यश्री,“Is she your wife? Really! What a jock! तीन वर्षां पूर्वी तू मला प्रपोज केलं होतं. मी तुला नाही म्हणाले म्हणून मला हिणवण्यासाठी तू हिच्याशी लग्न केलेस! You deserve better than her and look at you! You are handsome boy!” ती विनिशला हात लावत म्हणाली.
विनिशने तिचा हात झटकला आणि तो बोलू लागला.

विनिश,“हो मी तुला प्रपोज केलं होतं विद्यश्री पण ती माझी चूक होती. मी आकर्षणाला प्रेम समजत होतो पण thanks तू माझे डोळे उघडले आणि धनश्री मला भेटली. She is worlds beautiful woman for me! माणूस तनाने नाही तर मनाने सुंदर हवा आणि धनश्री खूप सुंदर आहे तुझ्या पेक्षा! I haven’t seen ugly woman like you in my life! झाला तेवढा तमाशा पुरे झाला तू निघ इथून I said get out you worthless woman” तो रागाने बोलत होता.

विद्यश्री,“ How dare you call me worthless you stupid man ही( धनश्रीकडे इशारा करून) तुला सुंदर वाटते. अरे वेडा झालास का तू? Look at her डोळे तपासून घे तुझे डॉक्टर होणार आहेस ना ! तुला beauty and ugly मधला फरक कळत नाही आणि ही काळी माझ्या नखाच्या बरोबर पण नाही. तुझ्या बरोबर तिला पाहून लोक नाव ठेवतील ना तुला; मग देशील सोडून !हिला” ती धनश्रीकडे तुच्छतेने पाहत बोलत होती.
धनश्री मात्र शांतपणे तिचं ऐकून घेत होती. तो पर्यंत सरिताबाईनी मनोहररावांना फोन करून विद्यश्रीला घेऊन जा असे सांगितले.

विनिश,“बास! झालं आता तुझं निघ इथून तुझ्या या सुंदरतेचा तुला खूप माज आहे ना! तो लवकरच उतरेल! ही सुंदरता अशीच राहणार नाही. ती काळाबरोबर कमी होत जाऊन एक दिवस नष्ट होईल. तुझा हा सौंदर्याचा माज मात्र मी उतरवेन! माझ्या धनश्रीचा अपमान केलास ना तू I will become a worlds best plastic surgeon & I will make her beautiful woman आणि हे सिद्ध करेन की beauty ही मिळवता येऊ शकते पण beautiful soul कधीच मिळवता येत नाही जे तुझ्याकडे नाही” तो विद्यश्रीकडे हीनपणे पाहत म्हणाला.

विद्यश्री,“ हो का बनव हो हिला सुंदर मी पण पाहीन किती सुंदर बनवू शकतो तू हिला! आणि हो धने तू देखणा नवरा केला आहेस पण हा तुला झेपेल असं वाटत नाही! तो माझ्यावर आधी भाळला मी नाही म्हणाले म्हणून मग मला हिणवण्यासाठी तुझ्याशी लग्न केले पण सांभाळून हो हा अजून कोणावर तरी भाळायचा आणि तुला सोडून द्यायचा!” ती धनश्रीला पाहत म्हणाली.

इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारी धनश्री आता बोलू लागली.

धनश्री,“ तू कोण समजतेस स्वतःला तू खूप सुंदर आहेस तुझ्या पेक्षा छप्पन सुंदर मुली आहेत की विनिशच्या अवती- भवती पण त्याने मला निवडले आणि तुला प्रपोज करायचे म्हणशील तर केलं असेल त्याने तुला प्रपोज पण तू त्याला नाकारलं मूर्ख आहेस तू सुख तुझ्यापुढे उभं होत पण तू त्याला डावलले! आणि विनिशवर विश्वास आहे माझा तुझ्यापेक्षा सुंदर छप्पन मुली उद्या त्याच्या कर्तृत्वावर व त्याच्या देखणेपणावर भाळून त्याच्या मागे लागल्या तरी त्यांच्याकडे तो डुंकून ही पाहणार नाही.” ती विद्यश्रीकडे पाहत म्हणाली.

विनिश,“मला इथे अजून तमाशा नको आहे निघ इथून पप्पा पोलिसांना फोन करा! सुक्युरिटी कुठे आहे इथली! या नीच बाईला घेऊन जा म्हणावं” तो तावातावाने बोलत होता.
हे ऐकून विद्यश्री विनिशला मारण्यासाठी त्याच्या अंगावर गेली. धनश्रीमध्ये आली आणि तिने विद्यश्रीच्या कनाखाली एक ठेवून दिली व ती बोलू लागली.

धनश्री,“ तुझी हिम्मत कशी झाली ग विनिशवर हात उचलण्याची! Stay away from my husband & family! get out!” ती त्वेषाने म्हणाली.

विद्यश्री अजूनच चिडली व ती धनश्रीच्या अंगावर धावली. तो पर्यंत मनोहरराव आले आणि त्यांनी विद्यश्रीला फरफटत नेले. धनश्रीला विनिशने पाणी दिले. सरिताबाईनी विनिशच्या आई-बाबांसमोर हात जोडले विनिशच्या आईने तुमची यात काही चूक नाही असे म्हणून मिठी मारली.
विनिशने सगळ्या पाहुण्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली व पार्टि पुन्हा सुरू झाली. विनिशच्या बाबांनी हा तमाशा मीडियामध्ये जाणार नाही याची काळजी घेतली.
पण शेवटी विद्यश्रीमुळे विनिश आणि धनश्रीच्या रिसेप्शनला गालबोट लागले.
काही माणसे शरीराने खूप सुंदर दिसतात पण मनाने ती खूप कुरूप असतात त्यांना स्वतः पुढे कोणाचे ही सुख पाहवत नाही त्यातलीच एक विद्यश्री होती.
◆◆◆
पण विद्यश्रीने केलेल्या तमाशामध्ये विनिशने तिला प्रपोज केल्याचा उल्लेख केला होता आणि ही गोष्ट विनिशने धनश्रीला सांगितली नव्हती. विद्यश्री समोर तिने विनिशची बाजू घेतली होती खरी! पण विनिशला धनश्री त्याच्या बद्दल गैरसमज तर करून घेतला नसेल याची चिंता लागून राहिली होती. एवढेच काय पण त्याच्या कुटुंबातला ही या गोष्टीची कल्पना नव्हती.

रिसेप्शन उरकून सगळे घरी गेले. सगळे हॉलमध्ये बसले होते. धनश्री मात्र तिचे डोक दुखतंय म्हणून बेड रूममध्ये निघून गेली.शैलेशराव(विनिशचे वडील) मात्र विनिशवर चिडले होते. ते बोलू लागले.

शैलेशराव,“ विनिश एवढी मोठी गोष्ट तू आम्हांला सांगितली नाहीस की तू विद्यश्रीला प्रपोज केलं होतेस आणि तिने तुला नकार दिला! मला वाटतं धनश्रीला ही गोष्ट आजच कळली आहे तुझ्या लक्षात येतय का? याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होईल. तू तिच्यापासून ही गोष्ट लपवलीस! हे मला पटलेलं नाही! आता तू धनश्रीला कसा सामोरा जाणार आहेस!” ते चिडून आणि काळजीने बोलत होते.

विनिश,“ पप्पा मी घरात व धनश्रीला ही गोष्ट लपवून ठेवायची म्हणून सांगितली नाही असं नाही पण मला पुन्हा तोच विषय नको होता. It was my past. माझा वेडेपणा होता विद्यश्रीला प्रपोज करणे आणि तिने नकार दिला त्यामुळे ही गोष्ट सांगण्यात काही अर्थ नाही असे मला वाटले.” तो अपराधीपणे बोलत होता.

रिया,“ आता धनुची समजूत कशी काढायची ते तू बघ कारण अशा गोष्टी खूप नाजूक असतात एकदा जर तू तिचा विश्वास गमावलास तर पुन्हा ती तुझ्यावर विश्वास ठेवेल का? खरं तर ही गोष्ट तू तिला लग्नाआधी सांगायला हवी होती. तू चुकलास विनू!” ती त्याला समजावत म्हणाली.

विनिश,“ मी समजावेन धनुला आणि माफी ही मागेन!” असं म्हणून तो रूममध्ये गेला

त्याची रूम पूर्ण निशिगंधाच्या फुलांनी आणि सुगंधी कँडल्सने सजवली होती. सगळीकडे पांढऱ्या शुभ्र निशिगंधाचा सुगंध दरवळत होता.धनश्री तिथे एका खुर्चीवर डोळे झाकून बसली होती. विनिशची चाहुल लागताच तिने डोळे उघडले. विनिश तिच्या जवळ जाऊन बसला व बोलू लागला.

विनिश,“ आज जे काय झालं. विद्यश्री माझ्याबद्दल जे काही बोलली म्हणजे मी तिला प्रपोज केले होते वगैरे; हे मी तुझ्यापासून मुद्दाम लपवले असे खरच नाही प्लिज तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस धनु! तो भूतकाळ होता माझा आणि त्यात काही सांगण्यासारखे नव्हते म्हणून मी नाही सांगितले तुला आणि विद्यश्री बद्दल मला त्या वयात आकर्षण वाटल होते म्हणून माझ्याकडून चूक झाली ती! I am sorry! मला माहित आहे मी तुला हे सांगायला हवं होतं पण नाही सांगितले प्लिज बोल काही तरी!” तो आवंढा गिळत म्हणाला.

धनश्री,“ sorry कशासाठी विनिश उलट मीच तुला sorry म्हणाले पाहिजे आज विद्यश्री जे काय वागली तुझ्याशी त्याबद्दल; कारण ती माझी बहीण आहे. मी तिला ही चांगलं ओळखते आणि तुला ही! तू तिला प्रपोज केले होते हे मला आपली मैत्री होण्याआधी पासून माहीत होते!” ती शांतपणे म्हणाली.

विनिश,“ काय! तुला कसे कळले हे धनु आणि तू मला इतक्या वर्षात कधीच का विचारले नाहीस! मी तुला प्रपोज केले तेंव्हा सुध्दा नाही विचारावस वाटलं तुला!” तो आश्चर्याने बोलला.

धनश्री,“ नाही विचारावस वाटलं मला! कारण मला तुझ्या जखमेवरची खपली काढून तुला दुखवायचे नव्हते. आधीच विद्यश्रीने तुला खूप दुखावले होते. तिने तुझा तिच्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला तुला नादाला कसे लावले हे सर्व माहीत आहे मला! तुझ्या जागी जर दुसरा मुलगा असता तर तो ही तुझ्यासारखाच वागला असता. ती तुझ्या भावनांशी खेळली आणि तुझी गरज संपली की तुला झिडकारले ती फक्त माणसांचा वापर करते हे माहीत आहे मला! आज ही तिने तुला दुखावलेच आहे माझ्यावरचा राग तिने तुझ्यावर काढला.खरं तर मीच तुला sorry म्हणायला हवे विनू!” तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.
विनिशला धनश्रीचे बोलणे ऐकून खूप मोठे ओझे डोक्यावरून उतरल्या सारखे हलके हलके वाटत होते. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेवले व तो बोलू लागला.

विनिश,“ पण हे सगळे तुला कसे कळले! आणि तू मला sorry काय म्हणतेस खरं तर चूक माझीच आहे!” तो तिला म्हणाला.

धनश्री,“ तू विसरतो आहेस विद्यश्री माझी बहीण आहे आणि आम्ही एकाच घरात राहत होतो. तू प्रपोज केल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला फोनवर बोलताना मी ऐकले होते की तू तिला कसे प्रपोज केले आणि तिने तुला कशा पद्धतीने झिडकारले अगदी खूप मोठा पराक्रम केल्या सारखे मीठ मसाला लावून ते ही मोठ्याने सांगत होती. मी तिच्या रूमपासून जाताना हे सगळे ऐकले होते. खरं तर मला तुझ्याबद्दल तेंव्हा ही वाईट वाटले होते आणि तिचा राग आला होता कारण एखाद्या माणसाच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही” ती शांतपणे त्याच्या केसातून हात फिरवत बोलत होती.

विनिश,“ I am very lucky because I have wife like you ! मी खरं तर खूप घाबरलो होतो!” त्याला बोलता बोलता थांबवून ती बोलू लागली.

धनश्री,“ वेडा आहेस का तू घाबरायला! अरे वेड्या मी तुझ्या रूममध्ये आले दीच्या रूममध्ये न जाता तेंव्हाच तू ओळखायला हवं होतं ना की माझ्या मनात काय आहे ते!” ती हसून म्हणाली.

विनिश,“ अरे मी इतका टेन्शनमध्ये होतो की माझ्या हे लक्षातच नाही आले.” तो तिला पाहत म्हणाला.

धनश्री,“ जा फ्रेश होऊन ये! मी ही चेंज करते तो पर्यंत!” ती म्हणाली.

विनिश फ्रेश होऊन आला तर धनश्री उभारून मागे हात करून तिच्या लाच्याच्या ओढणीला लावलेली सेप्टि पिन काढण्याचा प्रयत्न करत होती पण ती पाठीवर खूप मागे असल्याने धनश्रीचा हात तिथे पोहचत नव्हता. ते विनिशने पाहिले व तिच्या जवळ गेला व त्याने पिन काढली आणि तिला मागून मिठी मारली व तो तिला हळूच कानात म्हणाला.

विनिश,“ I love you धनु!”

धनश्री,“ ते माहीत आहे मला पण ओढणी तर घेऊ दे मला!” ती त्याला लाजत म्हणाली.

विनिश,“आता तुला ती काय करायची आहे” असं म्हणून त्याने तिला हाताला धरून स्वतः कडे वळवले व तिच्या कपाळावर ओठ ठेवले.
धनश्री लाजून विनिशच्या मिठीत शिरली. निशिगंधाचा सुवास सर्व रूम मध्ये दरवळत होता आणि दोन प्रेमात आकंठ बुडलेले जीव एकमेकांमध्ये दरवळत होते. त्या मध्ये आवेग नव्हता तर ओढ होती.

विद्यश्रीच्या आयुष्यात पुढे काय घडणार होते? धनश्री व विनिशचे नाते असेच फुलत जाणार होते का? विनिश प्लास्टिक सर्जन होऊन त्याचा शब्द पाळणार होता का?
क्रमशः

तर कशी वाटतेय कादंबरी जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा पण माझ्या नावा सहित आणि कमेंट करायला विसरू नका😊

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

टीप- ही कादंबरी असल्याने प्रसंगानुरूप भाग लहान मोठे आहेत तरी वाचकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती🙏🙏

 

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.