हिरोईन दि थंडर बर्ड (भाग १२)#कादंबरी

Written by

हिरोईन दि थंडर बर्ड (भाग१२)

©®स्वामिनी चौगुले

हिरोईन दि थंडर बर्ड (भाग ११) खालील लिंकवर

https://irablogging.com/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7%e0%a5%a7-2/

धनश्री आणि विनिशचा संसार सुरू झाला त्याबरोबर त्यांचे शिक्षण ही सुरू होते. धनश्रीला सगळे स्वप्नवत वाटत होते. ज्या सुखाचा तिने विचार ही केला नव्हता. ते सुख ती आज उपभोगत होती. लहानपणापासून धनश्रीने फक्त हेटाळणी पाहीली होती. पण आज प्रेमळ सासू-सासरे आणि विनिश सारखा समंजस,प्रेमळ आणि जीवापाड जपणारा जीवनसाथी मिळाला होता. धनश्री या सगळ्यामुळे भरून पावली होती.

धनश्रीच्या शिक्षणाची जबाबदारी शैलेशरावांनी म्हणजे विनिशच्या बाबांनी घेतली होती. पाहता पाहता धनश्री आणि विनिशचे MBBS ची पाच वर्षे संपली. आता इंटर्शीप नंतर पुढच्या शिक्षणाची चर्चा सुरू झाली. धनश्रीला हार्ट सर्जन बनायचे होते तिला M.S करण्याची इच्छा होती. पण संकोच्यामुळे ती काही बोलत नव्हती. विनिशचे ठरले होते तो M.S करायचे ते प्लास्टिक सर्जरी या क्षेत्रात त्यासाठी त्याला अमेरिकेत जायचे होते. विनिश धनश्रीची इच्छा ओळखून होता. त्याला हे ही माहीत होतं की ती संकोचून तिची इच्छा व्यक्त करणार नाही. म्हणून त्याने शैलेशरावांशी चर्चा केली व अमेरिकेत धनश्री व स्वतःच्या ऍडमिशनची व्यवस्था केली.

शैलेशराव रिटायर्ड झाले होते. त्यामुळे विनिश व धनश्रीच्या फीची व तिकिटांची तिथे राहण्याची सगळी व्यवस्था सहज होऊ शकली. धनश्री नाही होय करत तयार झाली. पण तिने विनिशला अमेरिकेत पार्ट टाईम जॉब करण्याची अट घातली.विनिश व धनश्रीने अमेरिकेला उड्डाण केले पण त्या आधी ते दोघे धनश्रीच्या मम्माला भेटले. अमेरिकेत ते दोघे न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकू लागले. तसेच स्वतःचा खर्च भागावा म्हणून जॉब ही करत होते.

विद्यश्रीला या धनश्रीच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी तिची आई म्हणजे सरिताबाई धनश्रीशी फोनवर बोलत असताना येता-जाता ऐकू येई किंवा मनोहररावांकाडून माहीत होतं होत्या. विद्यश्रीला मात्र धनश्रीची प्रगति खटकत होती कारण ही तसेच होते त्याला म्हणा!

विद्यश्रीच्या करिअरला उतरती कळा लागली होती. या तिच्या अवस्थेला ती स्वतः जबाबदार होती. तिचा स्वभाव जबाबदार होता. रौशन सीरिअल सोडून गेला आणि तीन महिन्यातच विद्यश्रीला प्रोडक्शनने काढून टाकले. तिच्या जागी नवीन चेहरा घेण्यात आला आणि तो चेहरा अपघात आणि त्यातून झालेली प्लास्टिक सर्जरीच्या नावाखाली सीरिअलमध्ये रुजू झाला. अस ही सीरिअलमध्ये खूप काही अविश्वसनीय व कोणते ही लॉजिक नसलेल्या गोष्टी चालतात आणि प्रेक्षक त्या स्वीकारतात. विद्यश्री स्वतः च तिच्या अधोगतीकडे जात होती. रौशन विद्यश्रीला हँडल करत असल्याने तिला प्रोडक्शनने ठेवले होते. पण आता तिचा एटीट्युड ,तिचे नखरे,शुटिंगवर वेळेवर न येणे या गोष्टीना कंटाळून तिला प्रोडक्शनने बाहेरचा रस्ता दाखवला होता. विद्यश्रीचा भ्रम होता की तिचा चेहरा म्हणजेच त्या सीरिअलची ओळख आहे पण सीरिअल नवीन चेहरा येऊन ही चांगली चालू लागली व चांगल्या टी.आर.पी.मुळे टॉपवर राहू लागली. विद्यश्रीचा भ्रम त्यामुळे दूर झाला.

टी. व्ही. इंडस्ट्री असे क्षेत्र आहे जिथे बरेच चेहरे येतात आणि लुप्त होतात. जो पर्यंत एखादा चेहरा टी.व्हीवर झळकत राहतो तो पर्यंत लोक तो लक्षात ठेवतात. तो चेहरा टी.व्ही स्क्रीन पासून लांब गेला की लोक तो विसरतात. इतकी शॉर्ट मेमरी असते लोकांची. त्यामुळे विद्यश्रीच्या असण्याने किंवा नासण्याने या क्षेत्राला काही फरक पडणार नव्हता.

विद्यश्रीला या गोष्टींचे खूप टेन्शन येत होते. त्यामुळे ती अधिकाधिक व्यसनाधीन होत चालली होती. ती दिवस भर वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसच्या पायऱ्या झिजवत असे व रात्री पब मध्ये जाऊन दारू, सिगारेट पित असे. ती रात्र- रात्र घरा बाहेर राहत असे. तिची अप कीर्ति पूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पसरली होती. त्यामुळे तिला कोणी ही सीरिअल मध्ये घेण्यास तयार होत नव्हते.

तिच्या नशिबाने एका नवीन आलेल्या प्रोडक्शन हाऊसने तिचा चेहरा फेमस असल्यामुळे तिला त्यांच्या सिरिअल मध्ये घेतले पण टुकार स्टोरी आणि नवखे कलाकार तसेच टुकार डायरेक्शन यामुळे सीरिअल चालली नाही आणि लवकरच बंद पडली. मग काय विद्यश्री पुन्हा बेरोजगार झाली.

या अपयशानंतर ती अधिकच बेताल झाली. व्यसनासाठी लोकांकडून पैसे घेऊ लागली. त्यातच तिच्या व्यसनी मित्र-मैत्रिणीमुळे तिला ड्रग्जचे ही व्यसन लागले. ती व्यसने कर्ज काढून करू लागली. ती पैसे घेई व मनोहररावांना पैसे देण्यासाठी लोक तगादा लावत.

विद्यश्री आता मनोहररावांना ही पैसे मागू लागली. मानहोरराव पैसे देण्यात असमर्थ होते कारण पेन्शनमध्ये घर व दवाखाना, औषधाचा खर्च भागताना त्यांना नाकी नऊ येत असे. विद्यश्रीला पैसे मिळाले नाहीत की ती त्यांना तोंडाला येईल ते बोलत असे.मनोहरराव तिच्या पुढे हतबल झाले होते.
एक दिवस विद्यश्रीला फोन आला व तिला एका व्हीवर ओरिएंटेड शो मध्ये सहभागी होण्याची ऑफर आली. विद्यश्रीसाठी ही एक सुवर्ण संधी होती. डबघाईला आलेले करिअर पुन्हा रुळावर आणण्याची आणि शिवाय पैसे ही मिळणार होते. ती तयार झाली पण त्या शोमध्ये जाऊन ही तिने गुण उधळलेच तिच्या बरोबर असणाऱ्या स्पर्धकांचा अपमान करणे, कोणाला ही काही ही बोलणे. आधी तिचा स्वभाव फक्त टीव्ही इंडस्ट्रीत माहीत होता पण आता तिचा स्वभाव व ती कशी आहे हे सगळ्या जगाला माहीत झाले. शेवटी व्हायचे ते झाले आणि तिथून ही तिची हकालपट्टी झाली.विद्यश्री अजूनच वेडीपिशी झाली. तिच्यासाठी हा खूप मोठा अपमान होता. ती आणखीन व्यसनाच्या गर्तेत रुतत चालली होती. मनोहरराव मात्र तिच्या काळजीने दिवस-रात्र झुरत होते. त्यांनी तिला व्यसनांमधून बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन ठेवले पण पंधरा दिवसातच विद्यश्री तेथून पळून आली.
आता विद्यश्री इतकी व्यसनाच्या आहारी गेली होती की तिला दारू,सिगारेट आणि ड्रग्ज शिवाय चैन पडत नव्हते . ती त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी काही ही करू शकत होती. तिने अनेक लोकांकडून कर्ज घेतले. पण ते फेडण्यासाठी लोक मनोहररावांनकडे येत व त्यांना पैसे मागत. विद्यश्रीने इतका कर्जाचा डोंगर उभा केला. की मनोहररावांना त्यांचा भर वस्तीतला बंगला विकावा लागला. मनोहररावांनी बंगला विकून विद्यश्रीने केलेले कर्ज फेडले व देणेकऱ्याना निक्षून सांगितले की मी इथून पुढे विद्यश्रीच्या कोणत्याही वागणुकीला आणि कर्जाला जबाबदार नाही. त्यांनी कर्ज फेडून राहिलेल्या पैशात मुंबई बाहेर एक छोटासा फ्लॅट घेतला. विद्यश्री स्वतः बरोबर मनोहररावांच्या ही अधोगतीला कारणीभूत ठरली.

मनोहररावांनी आता हातवर केल्याने विद्यश्रीला कोणी कर्ज ही देत नव्हते. आता विद्यश्री व्यसनसाठी पैसे मिळवण्यासाठी काही ही करायला तयार होती.

एक दिवस असेच विद्यश्रीकडे ड्रग्ज विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. ती ड्रग्जसाठी वेडीपिशी झाली होती. ती ड्रग्ज डीलरच्या ड्रग्जसाठी मागे लागली होती. ड्रग्ज डीलरने याचाच फायदा घेतला. विद्यश्री अशा आता व्यसनाच्या गर्तेत पूर्ण बुडाली होती इतकी की तिचा फायदा आता कोणी ही घेऊ शकत होत. ड्रग्ज डीलर एका पन्नास वर्षांच्या थोराड माणसाला तिच्याकडे घेऊन आला. ड्रग्ज डीलर बोलू लागला.

डीलर,“ हे बघ विद्यश्री हा माणूस तुला माझ्याकडून ड्रग्ज विकत घेऊन देईल पण त्या बदल्यात तुला या माणसाला खुश करावं लागेल.

विद्यश्री दारू आणि ड्रग्जसाठी वेडीपिशी झाली होती. तिला काहीच सूचत नव्हतं. तो डीलर काय म्हणतोय हे ही तिला कळत नव्हते. ती ड्रग्जसाठी काही ही करायला तयार होती. ती तयार झाली त्या माणसाने विद्यश्रीला ड्रग्ज घेऊन दिले. विद्यश्रीने ड्रग्ज अधिरपणे घेतले व ते तिने मनगटावर घेऊन हुंगले व नशेत त्या माणसाच्या गाडीत जाऊन बसली.
त्या माणसाने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तो तिला एका रूममध्ये घेऊन गेला. विद्यश्री नशेतच होती. ती काय करत आहे, तिच्याबरोबर काय घडत आहे हेच तिला कळत नव्हतं. तो माणूस विद्यश्रीवर अधाशीपणे तुटून पडला. विद्यश्री खूप प्रतिकार करू शकली नाही. ती तशीच पडून राहिली. पण त्या हॉटेलवर पोलिसांची रेड पडली आणि विद्यश्री व तो पुरुष नको त्या अवस्थेत रूममध्ये सापडले. विद्यश्रीला तर काय होत आहे हेच कळत नव्हते. मीडिया हॉटेल बाहेरच होती. विद्यश्री ब्रेकिंग न्यूज झाली. तिची नको तितकी बदनामी झाली. हे सर्व मनोहरराव सहन करू शकले नाहीत आणि त्यांना हार्ट अट्याक आला.त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
विद्यश्रीला आता कोण सोडवणार होते?विद्यश्रीची अधोगती अशीच सुरू राहणार होती का?
क्रमशः

तर कशी वाटतेय कादंबरी जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा पण माझ्या नावा सहित आणि कमेंट करायला विसरू नका😊

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

टीप- ही कादंबरी असल्याने प्रसंगानुरूप भाग लहान मोठे आहेत तरी वाचकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती🙏🙏

 

 

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.