हिरोईन दि थंडर बर्ड (भाग १३)#कादंबरी

Written by

हिरोईन दि थंडर बर्ड (भाग १३)

©®स्वामिनी चौगुले

हिरोईन दि थंडर बर्ड (भाग १२) खालील लिंकवर

https://irablogging.com/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7%e0%a5%a8/

त्या होटेलमध्ये असणाऱ्या बऱ्याच लोकांना आणि विद्यश्री व त्या माणसाला ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. तो माणूस मोठा व्यापारी असल्याने लगेच त्याने स्वतःची व विद्यश्रीची सुटका करून घेतली. तो माणूस निघून गेला. पण विद्यश्री पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताच तिला मीडियाने घेरले. तिला नाही- नाही ते प्रश्न विचारले जाऊ लागले. ती तोंड लपवून तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती. आता तिची पूर्ण नशा उतरली होती व तिला तिने काय केले आहे याचा अंदाज आला होता. पण आता काही उपयोग नव्हता कारण तिच्या हातून खूप मोठी चूक झाली होती.त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार होते.

विद्यश्री मीडियाला चुकवण्याचा प्रयत्न करत होती.तेव्हढ्यात एक कार तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यातून एका व्यक्तीने तिला बसण्याचा इशारा केला. विद्यश्री कोणता ही विचार न करता त्या गाडीत जाऊन बसली. कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.विद्यश्री मान खाली घालून त्या माणसाच्या शेजारी बसली.त्या माणसाने एक पैशाची बॅग व त्याचे कार्ड तिला दिले व तिला तिच्या सोसायटीच्या बाहेर सोडले. गरज लागल्यास येऊन भेट असे ही सांगितले तो तोच माणूस होता जो विद्यश्री बरोबर हॉटेलमध्ये पकडला गेला होता. अपार्टमेंटच्या गेट मध्येच सुक्युरिटी गार्डने तिला अडवले कारण तिच्या झालेल्या बदनामी मुळे तिला सोसायटीमध्ये राहू न देण्याचा निर्णय सोसायटी मेंबर्सने घेतला होता.
तिथेच तिला मनोहररावांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचे समजले. ती तडक हॉस्पिटलमध्ये गेली. ती रिसेप्शनला चौकशी करून ती मनोहररावांच्या रूमकडे वळली. ती रूमकडे जात असताना लोक तिला विचित्र नजरेने पाहत होती. तिने तिचा चेहरा लपवला व ती रूमच्या बाहेर पोहचली.
किती मोठी विटंबना होती ना! ज्या सुंदर चेहऱ्याचा विद्यश्रीला गर्व होता. तोच सुंदर चेहरा ती आज लोकांपासून लपवून फिरत होती.ती खाली मान घालून रूममध्ये जाणार तोच तिच्या गालावर एक जोरात थोबाडीत बसली.

आणि त्याच वेळेस विद्यश्री भूतकाळातुन वर्तमान काळात आली. ती बराच वेळ ग्लानीत होती व तिचा भूतकाळ तिच्या डोळ्या समोरुन चित्रपटासारखा जात होता.ती किती वेळ ग्लानीत होती हे तिला ही माहीत नव्हते. हे सगळं आठवून मात्र तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.ती डोळे पुसून उठून बसली व पाणी प्याली. तो पर्यंत नर्स तिच्यसाठी जेवण व औषधे घेऊन आली. नर्स कडून तिला कळले की ती गेल्या बारा तासांपासून बेशुद्ध होती.
पाणी पिल्यामुळे विद्यश्रीला जरा हुशारी आली होती. पण पोटात आगीचा डोंब उसळला होता. तिने घड्याळ पाहीले. त्यात बारा वाजले होते दुपारचे! तिने जेवणाचे ताट घेतले व ती अधाशीपणे जेवणावर तुटून पडली. तिने जेवण केले. पोटात अन्न गेल्याने तिला जरा तरतरी आली. तिने औषधे घेतली नर्सने येऊन ड्रीप तिच्या डाव्या हाताला लावली व ती निघून गेली.
विद्यश्री आता बेडवर पडून होती. पण तिला ड्रग्जचे व्यसन चैन पडू देत नव्हते पण ती हतबल होती. कारण ती इतकी अशक्त झाली होती की ती चार पावले ही धड चालू शकत नव्हती. तिने प्रयत्न पुर्वक ड्रग्जचा विचार झटकला व ती आता जागेपणी भूतकाळात रमली.

ती मनोहररावांना पहायला जेंव्हा हॉस्पिटलमध्ये गेली पण रूममध्ये जाण्याच्या आधीच तिला तिच्या आईने म्हणजे सरिताबाईनी एक थोबाडीत दिली होती. तिला बाजूला घेउन जात सरिताबाई बोलल्या.

सरिताबाई,“विद्यश्री निघ इथून आता काय आमचा जीव घेणार आहेस का? आमची अब्रु तू चव्हाट्यावर आणलीस सगळ्या मीडियात तुझी क्लिप फिरते आहे. घरोघरी आमच्या अब्रुची लक्तर टांगून तुझं समाधान नाही झालं का? तुझ्यामुळे तुझ्या पप्पांना हार्ट अटॅक आलाय तुझे तोंड ही पाहण्याची इच्छा नाही आमची चलती हो इथून!” त्या तावातावाने बोलत होत्या.

विद्यश्री खाली मान घालून ऐकून घेतले.ती आता बोलू लागली.
विद्यश्री,“मम्मा माझं ऐकून तर घे!”

एवढंच वाक्य ती बोलली तेव्हढ्यात सरिताबाईनी तिचा हात धरला व तिला फरफटत हॉस्पिटलच्या बाहेर काढले. विद्यश्री रडत-रडत निघाली. पण कुठे जावे?काय करावे? विद्यश्रीला काही सुचत नव्हते. तिच्या जवळ पैसे होते पण तिला माहिती होत की पैसे असून ही तिला कोणी थारा देणार नाही. मग अचानक तिची नजर त्या बॅगमध्ये असनाऱ्या त्या माणसाच्या व्हिजिटिंग कार्ड कडे गेली व त्या माणसाचे शब्द आठवले की“ गरज लागल्यास माझ्याकडे ये मी मदत करेन!”तिने ते कार्ड काढले विद्यश्रीला त्या माणसाचे नाव ही माहीत नव्हते. तिने कार्ड हातात घेतले व वाचू लागली. नाव होतं अमन राठोड त्यावर त्याचा ऑफिसचा पत्ता ही होता. तिने मनात काही तरी विचार केला व तिने टॅक्सी बोलावली व त्यात बसली. पण विद्यश्री तोंडाला स्कार्प बांधायला विसरली नाही. ती टॅक्सीतुन उतरून सरळ अमन राठोडच्या ऑफिसमध्ये शिरली व रिसेप्शन जवळ जाऊन त्याला भेटण्याची विनंती केली व स्वतःचे नाव सांगितले. रिसेप्शनिस्टने इंटरकॉम करून अमन राठोडला विद्यश्री माने आली आहे असे सांगितले.लगेच अमन राठोडने तिला आता पाठवायला सांगितले.

अमन राठोड एक बडी असामी बिल्डरच्या दुनियेतील मोठे प्रस्थ होते. खानदानी श्रीमंत माणूस! त्याला एक मुलगा एक मुलगी होती. बायको समाजसेविका त्याच सगळं बिर्हाड दिल्लीत स्थायिक होत. पण बिजनेससाठी तो सतत मुंबईमध्ये असायचा. म्हणतात ना बडे लोग बडी बाते! तसाच काहीसं अमनच होत. त्याला बाई आणि बाटली खूपच प्रिय होती आणि त्यातून तो विद्यश्रीचा तर फॅन होता. तिच्या सौंदर्याचा दिवाना होता आणि त्या रात्री विद्यश्रीला त्याने जसे पाहिले होते त्यामुळे तो तिच्यासाठी वेडापिसा झाला होता. तो स्वतःच्या केबिनमध्ये अधीरतेने तिची वाट पाहत होता. विद्यश्री संकोचतच त्याच्या केबिनमध्ये गेली. विद्यश्रीला अमन नखशिखांत निहाळत होता. विद्यश्रीला तर त्याचा चेहरा ही आठवत नव्हता. ती ही अमन राठोडला निहाळत होती. तो एक पन्नाशी ओलांडलेला थोराड पुरुष होता. अंगाने धिप्पाड,वर्ण गव्हाळ,नाक बसले,डोळे लाल पण वेलमेंटन शरीर दिसायला इतका काही खास नव्हता. दोघे एकमेकांना निहाळत होते. अमन भानावर आला व त्याने विद्यश्रीला बसायची खून केली. तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला विद्यश्री पाणी प्याली व बोलू लागली.

विद्यश्री,“मी विद्यश्री माने”
ती पुढे बोलणार तर अमनने तिला थांबण्याचा इशारा केला व तो बोलू लागला.

अमन,“ तू विद्यश्री मनोहर माने, शिक्षण बारावी, सफल टी.व्ही. ऍक्टर थी तुम, तुम्हारे पिता मनोहर माने रिटायर्ड BMC ऑफिसर , माँ हाउस वाईफ,एक बहन हैं जो अमेरिका में डॉक्टरी पढ़ रही हैं अपने पति के साथ,जिसे तुम्हारे पिताने घर से निकाला था। तुम लाडली पिता की जिनको आज तुम्हारी वजहसे हार्ट अटैक आया हैं। तुम्हारी माँने अभी अभी तुमसे सारे संबंध तोड दिये हैं। इसके अलावा तुम्हारा एक बॉयफ्रेंड था रौशन शर्मा जो आज एक सफल दिग्दर्शन हैं।इसके अलावा कुछ?” त्याने विद्यश्रीच्या आयुष्याची जणू रेकीच केली होती.
विद्यश्री अमनकडे आश्चर्याने पाहत राहिली. तिला कळत नव्हते की इतकी सगळी माहिती तिच्याबद्दल या माणसाकडे कशी आली. ती नुसती त्याला पाहतच होती. मग अमन परत बोलू लागला.

अमन,“ क्या सोच रही हो। मला हे सगळं तुझ्याबद्दल कस माहीत! एखादी बाई मला आवडली की मी तिच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढतो.”

इतकं बोलून अमन विद्यश्रीला पुन्हा निहाळू लागला त्याची भेदक नजर जणू तिच्या कपड्याच्या आत पाहत होती. त्याची नजर तिला टोचत होती. पण ती त्याकडे दुर्लक्ष करत बोलू लागली.

विद्यश्री,“ एवढे सगळे माहीत आहे माझ्याबद्दल मग मी इथे का आले तुझ्याकडे हे ही माहीत असेल तुला!” कुच्छीतपणे त्याला पाहत म्हणाली.

अमन,“very smart woman! मला तुझा स्मार्टनेस आवडला. तुझ्या जवळ राहायला जागा नाही. तुला माझी मदत हवी आहे. मी तुझी मदत करेन पण बदल्यात मला ही काही तरी हवं आहे. अखिर मैं बिजनेसमेन हुँ। असं म्हणून तो हसला आणि तिला डोळा मारला.

विद्यश्री,“ मला माहित आहे तुला माझ्याकडून काय हवं आहे पण तू माझी मदत कशी आणि काय करणार. What’s your deal?” ती त्याला पाहत म्हणाली.

अमन,“ you are really smart. I am impress! मी तुला रहायला मुंबईत घर, पैसा तुला हवे ते देईन but no commitment! After all I am family man & I love my. तू मला मी फक्त मुंबईत आलो की मला खुश करायचे! मी तुझ्यावर फिदा आहे ग राणी! You can be my Mistress!”अमन तिला नको तिथे स्पर्श करत म्हणाला.

Mistress हा शब्द विद्यश्रीच्या कानात गरम शिशाचा रस ओतावा तसा शिरला. त्याला त्या शब्दाची शिसारी आली.
विद्यश्री अमनची डील स्वीकारेल का? मनोहरराव व सरिताबाईचे काय होणार होते?
क्रमशः

तर कशी वाटतेय कादंबरी जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा पण माझ्या नावा सहित आणि कमेंट करायला विसरू नका😊

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)
टीप- ही कादंबरी असल्याने प्रसंगानुरूप भाग लहान मोठे आहेत तरी वाचकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती🙏🙏

 

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.