हृदयस्पर्शी ..!!

Written by

? हृदयस्पर्शी ….!!

पुरामुळे सारच अस्ताव्यस्त झाल होत….संसाराला भगदाड पडल होत…मन भयभित होत होत…पुराचे आक्राळ रुप आठवले की नैसर्गिक संकट कशी मानवी कृत्यावर आक्रमण करतात याच्या जाणीवेने मन पोखरत होते याच भिरंभिटीत सदु आपल्या कुंभार गल्लीतिल मित्राकडे भेटायला गेला होता. दरवर्षीप्रमाणे यावेळीपण त्याने गणेशमुर्ती बनवल्या होत्या .गणेशमुर्तींना रंगरंगोटीही सुंदर केली होती.उठावदार मुर्ती बनविण्याचा हातखंडा असल्यामुळे गणेशमुर्ती छान दिसत होत्या पण पावसाच्या रौद्र रुपाने सर्व मुर्त्या खराब झाल्या होत्या .सारी मेहनत पुराच्या पाण्याने व्यर्थ गेली होती.
सदु जेंव्हा घरात गेला होता तेंव्हा तुटक्या फुटक्या मुर्तिंचा ढीग लागला होता.सदुचे व मित्र अमोल यांचे भिषण पुरपरिस्थितीवर संभाषण चालु असताना तेव्हड्यात एक माणुस दारात मोटरसायकल लावून घरात आला.चांगला वेश परिधान केलेला माणुस जेमतेम चाळीसीकडे झुकलेला असावा .अमोलला ‘नमस्कार भाऊ ‘ म्हणाला अमोल थोडा चाचपडला कारण तो त्यांच्या ओळखीचा नव्हता .पुर येऊन गेल्यावर बरीच माणसे भेटायला येतात तसा हा पण आला असेल असा अमोलचा समज झाला.तो माणुस अमोलशी गप्पा मारत होता सदु हे बोलण कान देऊन ऐकत होता.
तो माणुस अमोलला म्हणाला , भाऊ दरवर्षी मी तुमच्याकडून मुर्ती घेऊन जातो आणि दहा , बारा दिवस आदि येऊन मुर्ती ठरवुन जातो म्हणून आलो होतो.असे बोलल्यानंतर अमोल त्याला म्हणाला ” या वर्षी माझ्याकडे मुर्ती नाही मिळणार हो दादा…! पुराच्या पाण्याने सार्या खराब झाल्यात .” तो माणुस अमोलला परत म्हणाला मला रंगीत मुर्ती नको आहे मला फक्त चिखलाची गणेशाची छोटी मुर्ती हवी आहे असे म्हणत त्याने अमोलच्या हातात दोन हजाराची नोट ठेवली आणि म्हणाला ‘ हे घ्या अॕडव्हान्स ‘ .अमोल म्हणाला ‘ चिखलाचा गणोबा तर दहा रुपयाला आहे मग हे दोन हजार कशाला…!!’ अमोलचे बोलणे मध्येच तोडत तो माणुस म्हणाला ” भाऊ…तुमचे हात मुर्ती नाही … आमचा देव बनवतात , हे देव बनवणार्या हातांना बळकटी येण्यासाठी ….!!एवढ बोलुन तो माणुस निघुन गेला ..! अमोलचा उर भरुन आला होता…सार चित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळल… प्रत्येक मुर्तीत जीव ओतुन केलेल कसब , रंगरंगोटी करुन आकर्षक केलेल्या मुर्त्या या सगळ्यांच पुराच्या पाण्याने देवत्व हिरावून घेतल होतं पण…दोन हजाराच्या हातावर ठेवलेल्या नोटेने माणसात माणुसकी व नितीमत्ता जिंवत आसल्याची जाणीव करुन दिली….अमोलच्या डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू नकळत ओघळून मातीमोल झालेल्या मुर्त्यांच्या मातीत पडला….!!

✍नामदेव पाटील .

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा