हेल्दी फूड

Written by

#हेल्दी_फूड

#समजगैरसमज

आदित्यच्या वाढदिवसानिमित्त  स्वराची एक आठवड्यापासून सुरू असलेली जय्यद तयारी बघून तिला मदत करायला आलेल्या मैत्रिणी  कुठेलेही काम शिल्लक नाही म्हणून तिचं भरभरून कौतुक करत होत्या. मग काय सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या .

१ मैत्रिण : अग आमच्या सोसायटी वाढदिवसाला  वेफर्स…. समोसे असच काहीतरी विकत आणून दिलं जातं.

२ मैत्रिण : हो न ग … स्वरा सारखे घरी करणे सगळ्यांना थोडीच जमणार आहे.

स्वरा: अग घरी नका करू पण काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न करायला हवा.

३ मैत्रिण: अग … हेल्दी??…. गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक म्हणून कोक देतात निदान तेही देणं बंद केले तरी पुरे आहे.

स्वरा :  हो ना ….. मी तर मुलांना कोक कसं टॉयलेट क्लीन करत याचा व्हिडिओ दाखवून ठेवला आहे . म्हणजे कोणी दिलं तरी ते घेणार नाहीत.

१,२, आणि ३ मैत्रिणी :  हो का ?  आम्हालाही पाठव तो व्हिडिओ.

तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली.

सगळी मुलं खेळून आल्यावर पार्टी पार्टी चा गलका करतच घरात शिरली. स्वराने सगळ्यांना बसायला सांगून ” वेलकम ड्रिंक” आणायला स्वयंपाक घरातील फ्रीजकडे वळली तशी सगळ्या मैत्रिणींची उत्सुकता वाढली. त्याही तिच्या मागोमाग गेल्या . फ्रीजचा दरवाजा उघडला गेला .  सगळे पदार्थ व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलेले. काही डीप फ्रिझ केलेले. आठवड्याच्या भाज्या चिरून  ठेवलेल्या . दुधाचे टेट्रा पॅक मस्त रचून ठेवलेले.  एकंदरीत फ्रिज आतून बघण्यासारखा. पदार्थ बाहेर काढून फक्त गरम करायचेच काम तेवढे शिल्लक होते. ” केवळ गरम खाणे म्हणजे हेल्दी फूड ” हा  स्वराचा असलेला गैरसमज लक्षात येवून सगळ्याच तोंडाचा ‘आ ‘ करून फ्रिज  बघण्यात गुंग होत्या तेवढ्यात स्वराने कोक ऐवजी आंबा आणि संत्री यांच्या चवीच्या  दोन मोठ मोठ्या सील बंद तयार शीतपेयाच्या बॉटल  बाहेर काढून पटापट पेले भरले  व “वेलकम ड्रिंक” तया sss र म्हणत  मुलांच्या घोळक्यात दिसेनाशी ही झाली.

©️ अंजली मीनानाथ धस्के

( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा