” होबार्ट चा हिरो ” डायरीचं एक पान !!

Written by

मागे वळून बघतो तेव्हा आठवणींच्या पोतडीत अनेक गोष्टी सापडतात . थोड्या चांगल्या आणि थोड्या वाईट !! अनेक निर्णयांचा आजही पच्छाताप होतो . तेव्हा अभ्यास केला असता तर आज दिवस वेगळे असते असा बरंच काही !! पण त्या पोडतिच्या आत शिरत गेला कि खूप सोन्या सारख्या गोष्टी हातही लागू लागतात !! एक डायरी सापडली !! प्रेम कवितांची नाही हो , एवढं माझं दुर्भाग्य नाही !! असो , डायरी होती श्वासांची !! पहिल्याच पानावर सकाळ मध्ये आलेला स्ट्रेट ड्राइव्ह मारणारा सचिन चा फोटो !! मध्येही असं बरंच काही मजेदार होत !! कधी कधी माणूस अश्या जगात निघून जातो कि तेथून वास्तवात येन अवगड वाटू लागत . माझ्यासाठी ती डायरी ते जग होतं !! मग हळू हळू पान चाळत असताना एका पानावर नजर थांबली … ” होबार्टचा हिरो ” असा स्केचपेन ने मी लिहून ठेवलं होत .खाली सकाळ मधलाच विराट चा फोटो तिथे चिटकवला होता !! आज ती पाने जीर्ण झाली असली तरीही आठवणी ताज्याच आहे !! फेब्रुवारी २०१२ , कॉमनवेल्थ ट्राय सिरीझ – संघ होते भारत , ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका !! त्या काळातले सर्वात ताकदवर संघ ! २०११ च्या वर्ल्ड कप विजयाची धुंदी उतरायला नुकतीच सुरुवात झाली होती .. त्या सिरीज मधले भारत बहुधा इतरांपेक्षा जास्त सामने हरला होता आणि जोडीला रनरेट पण कमी होता . त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला मोठा विजय हवा होता !! टॉस जिंकून भारताची पहिली गोलंदाजी !! धक्कादायक निर्णय ..जयवर्धनेच्या जोडीला विस्फोटक दिलशान !! दिलशान त्या २-३ वर्षांमध्ये वेगळ्याच झोन मध्ये गेलेला होता !! त्यात भारतीय गोलंदाजी सध्य घडीपेक्षा खूपच कमजोर होती . जयवर्धने लवकर बाद झाला . मग मात्र संगकारा मैदानावर आला !! जग विसरून ज्यांची फलंदाजी बघत बसावी ना असा तो वर्ल्ड बेस्ट लेफ्ट हॅन्डर !! गोलंदाजीच्या उणिवा स्पष्ट झाल्या .. दोघांनी मिळून खूपच धुलाई केली . दोघांचीही शतके !! एकाच संघाकडून शतके करणे त्याकाळात दुर्मिळ होते . दिलशान १६० नॉट आऊट !! लंका ५० षटकांत ३२० धावा !! भारताला मात्र स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ३२१ धावा ४० पेक्षा कमी षटकांत करणे आवश्यक होते !! अशक्यच !!! त्याकाळात हे आव्हान खूपच मोठे होते . सचिन सेहवाग ओपनिंग ला … सुरुवातीला सावध सुरुवात आणि नन्तर हाणामारी या तत्वावर खेळणारा सचिन यावेळी सुरुवातीपासून तुटून पडला . जोडीला सेहवाग होताच !! ६ षटकात ५० धावा !! सेहवाग आऊट आणि काही वेळेत सचिन देखील तंबूत !! गंभीर आणि नवखा कोहली मैदानावर … आधी सिंगल – डबल खेळता खेळता कोहली वेगळ्याच दुनियेत प्रवेश करण्यास सज्ज झाला होता . कोहली या माणसाचं तेव्हा खूप आकर्षण होतं..खूप कमी असे नवोदित खेळाडू असे आधारस्तंभ म्हणून पुढे येतात . सगळं काही व्यवस्थित चालू असताना गंभीर धावबाद होतो…. रैना मैदानावर … आशा मावळायला सुरुवात होते … एका बाजूला कोहली जम बसवत होता तर दुसरीकडे रैना तुटून पडत होता …आर या पार !! सामना कधीही कुणाकडेही फिरू शकला असता…मग येतो मलिंगा !!त्याच्याबद्दल जास्त सांगायला नको !! पण या नवख्या कोहलीने त्याच्या एका षटकांत २४ धावा कुटून काढल्यात !! अबब !! कपाळाला हाथ लावून मी तसाच खुर्ची वर बसलेलो होतो… जे बघत होतो त्यावर विश्वास नव्हता !! त्या धक्क्यातून लंका सांभाळू शकली नाही … भारताने ३२१ धावा ३७ व्या षटकांत चेस केल्यात !! क्रिकेट वैश्वातल्या बेस्ट मॅचेसपैकी ही !! आजही युट्युब वर त्या सामान्यच्या हायलाईट्स बघतो तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा त्या सामन्याच्या प्रेमात पडत जातो … कॉलेज ला जायचं आहे रे म्हणत मित्राचा मागून आवाज आला … डायरी मी पुन्हा बंद केली… वास्तवाच्या जगात परत आलो….

Article Tags:
·
Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा