हो, आवडते मला….. ??

Written by

@अर्चना अनंत धवड ✍️

 

माझी ही कविता माझ्यासारख्या स्त्रिया साठी….. प्रतेकाची जीवनाची कल्पना वेगळी अणि आवड ही वेगळी…. मला मात्र असेच जगायला आवडते…..

हो, आवडते मला….. ??

हो, आवडते मला
नवऱ्याच्या छत्रछायेत रहायला …..
सगळे नवर्‍यावर सोपवून
निर्धास्त जगायला….

हो, आवडते मला
सगळे व्यवहार त्याच्यावर सोपवायला…..
अणि घराची सत्ता….
माझ्या ताब्यात ठेवायला ….

हो, आवडते मला
माझ एटीएम त्याला द्यायला…..
नाही वाटत कमीपणा त्याचा कडून
खर्चासाठी पैसे घ्यायला…

हो, आवडते मला
आपले पैसे म्हणायला…
नाही आवडत तुझी कमाई
माझी कमाई असा फरक करायला…

हो, आवडते मला
त्याचा सल्ला घ्यायला….
अणि गरज पडल्यास
त्याला मार्गदर्शन करायला….

हो आवडते मला
त्याच्यासोबत शॉपिंग ला जायला ….
त्याच्या आवडीची साडी मला अणि
माझ्या आवडीचा शर्ट त्याला घ्यायला..

हो, आवडते मला
त्याच्या रंगात रंगायला ….
जरी मी सक्षम, तरी आवडते मला
नवऱ्याचा छत्रछायेत रहायला ….

“अर्चना अनंत “✍️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत