हो.. मी एक नोकरीं करणारी आई आहे

Written by

निताचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं आणि सुखाचा संसार चालू झाला..नोकरीं व घर दोन्ही उत्तमरीत्या ती सांभाळू लागली.. संसाराची घडी नीट बसत असतानाच संसार वेलीवर एक फुल उमलले.. आता मात्र बाळ, घर आणि नोकरीं ह्यामध्ये तिची तारांबळ उडायला लागली.. दिवसाचे 24 तास तिला कमी पडायला लागले.. नोकरीसाठी ती दिवसातून आठ तास बाळापासून लांब राहायची..आपल्या बाळाला वेळ देतं नसल्याचं दुःख तर होतच तिला.. पण पर्याय नव्हता..

सासूचा आधार होताच तिला..तीही हळहळू काही गोष्टी शिकत गेली ज्यामुळे ती स्वतःला, बाळाला, घराकडे आणि नोकरीवर नीट लक्ष देऊ लागली..

जेव्हा गरोदरपणानंतर नीता नोकरीवर रुजू झाली त्याच्या 3-4 महिन्यानंतर तिला खूप अशक्तपणा जाणवत होता, सारखी ती आजारी पडायची.. ती आजरी की मग बाळही आजारी पडायचं..तिला सारखं झोपून रहावस वाटायचं.. उत्साहच जाणवायचा नाही कशात.. एकतर घर, नोकरीं आणि सारखी आजारी ह्यामुळे बाळाकडे खूप दुर्लक्ष व्हायचं..तिने डॉक्टरकडे जाऊन चेक करून घेतलं तेव्हा कळालं की तिचा हिमोग्लोबीन कमी झाला आहे.. तुम्हाला तब्येतीकडे खूप लक्ष द्यावं लागेल.. वेळेवर जेवण करणं आणि पुरेसं झोप घेणं किती महत्वाचं आहे हे तिला डॉक्टरांनी नीट समजून सांगितलं

तेव्हा नीता ला कळून चुकलं की मी स्वस्थ असले तरच बाळाकडे नीट लक्ष देऊ शकेन.. तेव्हापासून ती स्वतःच्या तब्येतीकडे, खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देऊ लागली.. 

सकाळचा सगळा स्वयंपाक करून ऑफिस ला जाणं, आठ तास काम करून घरी येणं, परत स्वयंपाक, घरची स्वच्छता ह्या सगळ्यांमध्ये तिला बाळासाठी वेळ घालवायला मिळायचं नाही.. आणि सगळ्या गोष्टी स्वतः च्या खांद्यावर घेतल्यामुळे तिच्या शरीरावरही ताण पडायला लागला.. तेव्हा तिने ठरवून टाकलं की सगळ्या गोष्टी एकटीच्या खांद्यावर घेण्यापेक्षा तिने रात्रीच्या स्वयंपाकाला आणि घराच्या स्वच्छतेसाठी एक बाई लावून टाकली.. त्यामुळे तिला थोडा मोकळा वेळ मिळू लागला आणि तो वेळ ती बाळासाठी देऊ लागली..  नीता ला नाही म्हणायला पटकन जमायचंच नाही.. त्यामुळे खूप वेळा तिचा प्रॉब्लेम व्हायचा..  ऑफिसमध्ये जर कोणत्या टीम मेट ने एखादं काम सांगितलं आणि जरी ते तिचं नसेल तरी कसं नाही म्हणायचं म्हणून ती उशिरापर्यंत बसून करून द्यायची.. घरातही जर तिला कोणत्या फॅमिली फ़ंक्शन ला किंवा बाहेर जायचं नसेल तर कसं नाही म्हणायचं म्हणून ती जीवावर जायची.. पण आता बाळ आल्यापासून ती शक्य तिथे नाही म्हणायला शिकली.. त्यामुळे तिची होणारी ओढाताण ही थांबली आणि बाळासाठी ही तिला वेळ देता येऊ लागलं..  नीताला नोकरीमुळे आठ-दहा तास बाळापासून दूर राहावं लागत असल्यामुळे खूप वाईट वाटायचं.. कधी कधी तर तिला खूप रडायला यायचं.. ह्या सगळ्याचा दोष ती स्वतःला द्यायची.. ह्याचा तिच्या मनावर खूप ताण यायला लागला.. कारण बाळ खूप चिडचिड करायचं आणि मोबाईल वर जास्त वेळ असायचा आणि रात्रभर दूध पीत राहायचा..नाही दिलं की रडायला लागायचा..त्यामुळे नीताची झोप नीट व्हायची नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी कामावर व्हायचा..पण नंतर जेव्हा ती तिच्या डॉक्टरांना भेटून ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी समजावलं की बाळाला किती time देता ह्यापेक्षा तुम्ही किती quality time देता हे खूप महत्वाचं आहे.. बाळाला आई वडिलांचा time मिळाला नाही की मुले चिडचिडी बनतात..बोअर होऊन जातात आणि मोबाईल सारख्या गोष्टी त्यांना आवडू लागतात..कारण एकटं असलं तरीही त्यांची मोबाईल मुळे करमणूक होते..आणि बाळ स्तनपान फक्त पोट भरण्यासाठीच नाही तर सुरक्षिततेच्या भावनेतून ही करत असतं..कारण दिवसभर आई वेळ देऊ शकत नसते… त्यामुळे ती जवळ राहावी ह्या भावनेने ते तिला रात्रभर जागे ठेवतं.. त्यामुळे आता ती quality time देण्याकडे भर देऊ लागली.. शक्य तेव्हा ती ऑफिस मधून लवकर यायची.. आणि बाळाला घेऊन जवळच्या गार्डन मध्ये जायची,जेवू घालताना किंवा काम करता करता गाणे म्हणायची, गोष्टी सांगायची.. जेवल्या नंतर बाळाला घेऊन एक फेरफटका मारून यायची.. ह्या सगळ्यांमुळे तिच्या मनातील आपण वेळ देतं नाही ही स्वतःला दोष द्यायची भावना कमी झाली.. आणि बाळासोबत quality time घालवत असल्यामुळे ती बाकीच्या गोष्टींवर नीट लक्ष देऊ लागली.. आणि बाळामध्ये ही सकारात्मक बदल दिसू लागले..बाळ रात्री नीट झोपू लागलं.. कधी कधी बाळ हट्टीपणा करतो किंवा रात्री लवकर झोपत नाही, जेवू घालताना त्रास देतो तेव्हा नीता खूप बाळावर चिडायची.. कधी कधी मारही द्यायची, ओरडायची पण अशामुळे तिला बाळामध्ये नकारात्मक बदल दिसायला लागले.. बाळ अजून हट्टी बनलं, काहीच ऐकेना झालं.. तेव्हा तिला समजलं की आपली ऑफिस मधल्या कामाच्या ताणामुळे, घरच्या कामामुळे जरी चिडचिड होत असली तरीही बाळाला त्याचं काही घेणं देणं नाही.. कारण ते सगळं समजायचं त्याचं वयच नाही.. आपल्यालाच आपली सहनशक्ती वाढवावी लागेल.. त्यासाठी तिने बाळावर ओरडणं, मारणं बंद केलं.. ऑफिस मधलं टेन्शन तिने घरी घेऊन नाही यायचं असं ठरवलं आणि ऑफिस मधून निघाल्यावर डायरेक्ट घरी न जाता ती मंदिरात जाऊन मूड फ्रेश करून घरी जाऊ लागली.. त्यामुळे अशा परिस्थतीत ती स्वतःला शांत ठेवणं जमू लागलं.. आणि त्याचा सकारात्मक बदल तिला बाळामध्ये दिसू लागला..  थोडया दिवसाने नीता ने चांगलं काम करून मॅनेजर चा विश्वास संपादन केलं आणि आठवड्यातून दोनदा घरून काम करायची परवानगी मागून घेतली आणि नीता कामात तरबेज असल्याने मॅनेजरने ते मान्यही केलं.. त्यामुळे नीता त्या दोन दिवसाचा जायचा यायचा वेळ ही वाचला आणि तिला काम करत करत बाळाकडे लक्ष ही देता येऊ लागलं..

सकाळचा स्वयंपाक लवकर व्हावा ह्यासाठी नीताने पौष्टिक पण बनवायला सोप्पे आणि पटकन होणारे रेसिपीज शिकून घेतले जसे की सगळ्या डाळी घालून होणारे डोसे, ओट्स, मिक्स veg पराठा इत्यादी… त्यामुळे तिचा स्वयंपाक लवकर होऊ लागला.. आणि त्यामुळे तिला सकाळी थोडा जास्त वेळ झोपायला मिळू लागलं.. नोकरीं करणारी आई असल्यामुळे नीता काम कसं पटकन आणि सोप्प्या पद्धतीने करता येईल हे शिकली..त्यासाठी तिने वेगवेगळे पॅरेंटिंग साईट्स आणि अनुभवी आयांचा सल्ला घेतला.. नीता चा स्वभाव हा कोणाला मदत मागणार्यातला नव्हता.. त्यामुळे ती सगळा भार स्वतःवर घ्यायची.. पण आई झाल्यापासून ती शक्य तिथे सासू किंवा आईची मदत घेऊ लागली.. आणि नवऱ्यालाही प्रेमाने तिला कुठे कुठे मदतीची गरज आहे हे समजावून सांगू लागली..आणि दोघे मिळून कसं बाळाला जास्तीत जास्त वेळ देता येईल ह्याचा प्लॅन बनवून अंमलात आणू लागले..  बाळाचे vaccination नीताला कामाच्या लोड मुळे लक्षात राहायचे नाहीत..त्यामुळे तिने एक युक्ती शोधून काढली…vaccination च्या time table नुसार तिने मोबाईल मध्ये रिमांयडर लावून ठेवलं..त्यामुळे आता तिच्या लक्षात राहू लागलं की बाळाला कधी vaccination द्यायचं आहे..

बाळ कधी कधी जेवायला खूप त्रास द्यायचं.. आणि नीताला वेळेअभावी त्याच्या मागे खा खा म्हणून मागे लागणे जमायचं नाही.. त्यामुळे तिने फळे आणायला सुरुवात केली.. आणि बाळाला फळे खाण्याची लहानपणा पासूनच सवय लावली..जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ती वेळ काढुन जेवू घालायची.. पण जेव्हा शक्यच नसेल तर ती फळे देऊ लागली..त्यामुळे बाळाचं उपाशी राहून किरकिरायच बंद झालं..

अशा छोट्या छोट्या गोष्टी नीताने शिकून घेतल्या त्यामुळे आज ती घर, नोकरीं आणि मुख्य म्हणजे बाळ ह्या सगळ्यांकडे नीट लक्ष देऊ शकते..बघा तुम्हालाही ह्यातील काही गोष्टी उपयोगी पडल्या तर..

कसा वाटला हा लेख नक्की कळवा आणि तुम्हीही बाळाला वेळ कसे देता हेही नक्की कंमेंट्स मध्ये शेअर करा..धन्यवाद🙏

 

Comments are closed.