देखणा नवरा..साधारण बायको

Written by

नेहमीप्रमाणे तो त्याच्या ऐटीत कंपनीत शिरला आणि जवळपास सर्व मुलींच्या नजरा त्याच्यावर खिळल्या…होताच तो असा…सुमित..उंचापुरा, गोरापान, रणवीर सिंग सारखं नाक, शाहरुख सारखी स्माईल…त्याने मॉडेलिंग करायला हवी असे त्याचे मित्रमंडळी नेहमी म्हणायचे…पण सुमित ला अभ्यासात रस… खूप शिकून स्वतःची कंपनी काढली आणि खूप पुढे नेली…आता त्याचा कंपनीत 200 लोकं त्याचा हाताखाली. अगदी कितीही पतिव्रता स्त्री असली तरी तो दिसला की त्याच्याकडे आपसूक एक नजर वळायची इतका तो मोहक होता. तो मात्र कुणाकडेही न पाहता आपलं काम करण्यात मग्न असायचा…

एकदा करिश्मा त्याचा कंपनीत इंटरव्ह्यू साठी आली, पाहिले काही राउंड पार केल्यानंतर आता सुमित कडे तिचा फायनल इंटरव्ह्यू होता.

“मे आय कमीन सर??”

दार उघडताच सुमित ला पाहून ती दारातच त्याच्याकडे पाहत होती, कसला देखणा माणूस आहे…नको तो जॉब वैगरे, हा माणूस नवरा म्हणून मिळाला तर??…दुसऱ्या क्षणाला भानावर येऊन ती आत आली, आणि परवानगी घेऊन खुर्चीत बसली, सुमित तिच्याकडे फक्त प्रोफेशनल नजरेने पाहत होता हे पाहून तिला आश्चर्य वाटले, कारण करिश्मा म्हणजे सौंदर्याची खाण, कॉलेज मध्ये असा एकही मुलगा नव्हता जो तिच्यावर भाळला नव्हता, रेशमी केस, गोरापान रंग, सडसडीत बांधा, घारे डोळे…कंपनीत आल्यावरही इथली लोकं तिलाच पाहत होती…अप्सराच ती जणू…

म्हणूनच तिला आपल्या सौंदर्याचा प्रचंड गर्व होता, आपल्या सौंदर्याने सुमित ला मोहात पाडून त्याला आपलं करू हे सहज सोपं वाटत होतं तिला…

ती हुशारही होती, म्हणूनच शेवटी तिला जॉब मिळाला आणि ती कामावर रुजू झाली…कंपनीत सुमित च्या एका कटाक्षासाठी ती झुरायची, मुद्दाम काहीतरी काम काढून सुमित ला भेटायला जायची…सुमित ला मात्र तिचा हेतू काही समजत नव्हता…

आपण सुमित ला कधी एकदा आपल्या प्रेमात पाडू आणि कधी एकदाचं त्याला प्रपोज करण्यास भाग पाडू याची घाई झालेली करिश्माला..

एकदा दुपारी एक स्त्री कंपनीत आली…सावळा रंग, नाजूक देह पण नाकीडोळी नीटस… साधारण दिसणारी एक स्त्री डबा घेऊन आली… करिश्मा ला वाटलं इथल्या एखाद्या काम करण्यार्याची बायको असेल…पण ती येताच सुमित धावत बाहेर आला…करिश्मा जी नजर त्याच्याकडून अपेक्षित करत होती ती नजर आता सुमित च्या डोळ्यात दिसली…पण ती त्या स्त्री साठी…सुमित लाजत आणि चेहऱ्यावर हसू लपवत तिच्या जवळ आला, नुकतंच लग्न झालेलं जोडपं नाव घेताना जसं लाजतं तसा सुमित लाजत होता…ती आलीये म्हटल्यावर काय करू न काय नको असं त्याला झालं….त्याच्या वागण्यावरून तो त्या स्त्री च्या आकंठ प्रेमात आहे हे अगदी स्पष्ट कळत होतं… एरवी प्रोफेशनल वागणाऱ्या सुमितचं हे आकस्मिक वागणं तिने पहिल्यांदाच पाहिलं…आणि तिचा संयम सुटला…इतकी मोठी स्वप्न रंगवत असताना हे दृश्य पाहून तिचा प्रचंड संताप झाला…

ती स्त्री निघून गेली…सुमित मात्र केबिन मध्ये बसेपर्यंत त्याचा चेहऱ्यावर जे हास्य होतं ते कितीतरी वेळ तसंच होतं…नुकतंच प्रेम झालेल्या तरुणाचं मन जसं सैरभैर होतं तसं सुमित चं झालेल…

“कोण आहे तरी कोण ती?? “करिश्मा आता भानावर नव्हती…

ऑफिस मध्ये नुकतीच तिची मैत्री नेहा शी झालेली, तिला करिष्मा ने सांगितलं…”नेहा, मला सुमित सर हवे आहेत..मी त्यांना काहीही करून मिळवणार…”

“करिश्मा अगं वेडी झालीस का?? त्यांचं लग्न झालेलं आहे…असला भलता सलता विचार करू नकोस, काल त्या डबा द्यायला आलेल्या ना त्या सरांच्या मिसेस…”

करिश्मा एका क्षणात मनाने कोसळली, तिची स्वप्न भंग पावली…

सुमित च लग्न झालं यापेक्षा तिला जी गोष्ट जास्त खटकत होती ती म्हणजे सुमित इतका देखणा आणि त्याची बायको इतकी साधारण?? सुमित खुश असेल का तिच्यासोबत??

तिने विचार केला, आणि ठरवलं..की सुमित चं जरी लग्न झालेलं असलं तरी त्याला मिळवायचं…त्याची बायको त्याला शोभत नाही आणि माझ्या सारखी रूपाची खाण असलेली बायको मिळायला नशीब लागतं ही गोष्ट सुमित च्या मनात पक्की करायची…काहीही झालं तरी सुमित माझा…तो इतका देखणा होता की आता त्याच्याशिवाय तिला काहीही दिसत नव्हतं…

नेहा ला तिचा मनसुबा कळायचा, ती करिश्मा ची समजूत घालायची..पण करिश्मा वर सुमित च्या प्रेमाचा चष्मा…ऐकायला तयारच नव्हती…

करिश्मा आता सुमित शी भेटायला कारणं शोधायची,त्याला मेसेज, कॉल करायची, सुमित मात्र काम संदर्भातच बोलून फोन ठेऊन द्यायचा, त्याला कल्पनाही नव्हती करिश्मा च्या मन्सुब्याची…

करिश्मा चा धीर सुटत चालला होता, काहीही केलं तरी सुमित आपल्याला जराही भाव देत नाही म्हणून तिचा अभिमान दुखावला जायचा…

अशातच सुमित ला एकदा कंपनी टूर वर जायचं काम निघालं, करिश्मा ने खेळी खेळून तिचं काम त्याच ठिकाणी आहे असं पटवुन सुमितला तिला सोबत न्यायची योजना आखली, सुमित ला खरं वाटलं…तो म्हणाला चल तुही…पण आपण दोघेच जाणं योग्य नाही, सोबत एका सिनियर लेडी ला घेऊ…

करिश्मा पुन्हा चिडली…पण पर्याय नव्हता…त्या लेडी ला सोबत घ्यायची काय गरज होती??

करिश्मा ने आदल्या दिवशी त्या बाई च्या खाण्यात गपचूप एरंडेल तेल मिसळलं, करिश्मा इतकी पेटली होती की सुमित ला मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती…

दुसऱ्या दिवशी त्या बाईने कंपनीत फोन करून आजारी असल्याचं सांगितलं आणि टूर ला जमणार नाही असं कळवलं… सुमित ला करिश्मा सोबत एकटं जायला योग्य वाटत नव्हतं, पण दोघेही गाडीजवळ उभे, आता ऐनवेळी दुसऱ्या कोणाला तयार करणं शक्य नव्हतं…करिश्मा उतावीळ झालेली, पण सुमित चा पाय निघत नव्हता…तो विचार करून बाजूला गेला, फोन वर बायकोशी काहीतरी बोलला आणि मग दोघेही टूर वर निघाले…

करिश्मा हवेतच उडत होती…तिला आता मोकळं रान मिळालं होतं… गाडीत सुमित शी लगट करायचा प्रयत्न तिने केला, त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला…सुमित ला आता तिचा उद्देश समजत चालला होता…दोघेही एका मॉल मध्ये गेले, तिथे सुमित ने करिश्मा ला काही खरेदी करून दिली, चांगल्या हॉटेल मध्ये जेऊ घातले…करिश्मा ला ग्रीन सिग्नल वाटला…

दोघेही एका हॉटेल वर उतरले, कलाइन्ट ला यायला वेळ लागणार होता, तोवर ते दोघे टेबल वर बसून वाट पहात होते…हीच वेळ आहे हे समजून तिने त्याला म्हटलं..

“सुमित सर मी डायरेक्ट बोलते,

एक औचित्य साधून तिने सुमित ला सांगितलं…

“सुमित सर मी आता डायरेक्ट बोलते, मला आता राहवत नाहीये, इंटरव्ह्यू ला आले, तुम्हाला पाहिलं त्याच क्षणी मी तुमच्या प्रेमात पडले…मला तुम्ही खुप आवडतात…माझ्याशी लग्न कराल??”

“करिश्मा, काय बोलते आहेस भान आहे का..लग्न झालंय माझं…”

“माहितीये सर, पण तुम्हाला तुमची बायको शोभते तरी का?? तुम्ही खरंच आहात तिच्या सोबत खुश?? ती दिसायला अशी, माझ्यासारखी बायकोच तुम्हाला शोभेल असं नाही वाटत का तुम्हाला?? तुमचं लग्न झालेलं असलं तरी तुम्हांला मी स्वीकार करायला तयार आहे…”

सुमित चिडून काहीतरी बोलणार इतक्यात कलाइन्ट आले…दोघांनी उठून त्यांच्याशी हातमीलावणीं केली…सुमित चा राग त्याने नियंत्रित केला आणि कामावर लक्ष केंद्रित केलं….2 माणसं त्यांचे प्रॉडक्ट्स दाखवायला आलेले, त्यातला एकाला सिलेक्ट करायचं होतं..दोघे आपापली प्रॉडक्ट्स दाखवायला लागले…

“सुमित सर मी राजेश, माझी स्पेयर पार्ट ची छोटी कंपनी आहे, हे बघ सॅम्पल, बाहेरून उत्तम पॉलिश आहे, कस्टमर ला attract करण्यासाठी काही designs यावर कोरले आहेत…”

दुसर्याने त्याचे पार्ट्स दाखवले,

“मी महेश, हे बघा, आतून याची फिनिशिंग अशी आहे की कुठल्याही धातूला हा लागला तरी गंजनार नाही, आणि कुठल्याही फॉर्मट आणि साईझ मध्ये बसेल अशी adjustable सेटिंग केलेली आहे…

सुमित ने महेश ची निवड केली…करिश्मा म्हणाली,

“सर राजेश चा पार्ट जास्त आकर्षक आहे, गिऱ्हाईकला आवडेल तो…”

सुमित म्हणाला,

“इथेच आपण चुकतो, बाह्य रुपाला भुलून आंतरिक सौंदर्य पाहत नाही आणि मग नको त्या परिणामांना सामोरं जातो…आता हेच बघा, माझी बायको तुम्ही पहिलीत तर तुम्हाला एक साधारण स्त्री वाटेल, पण माझ्यासाठी ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे, कारण तिच्यातील आंतरिक सौंदर्य, तिच्या गोड बोलण्याने, तिच्या समजूतदार स्वभावामुळे मी तिच्या प्रेमात पडलो, आणि आज मी केवळ तिच्या प्रेरणेने यशस्वी झालो आहे…
तिचा इतका विश्वास आहे माझ्यावर की मी करिष्मा सोबत तूर वर जायचं सांगितलं तर कसलेही आढेवेढे न घेता मला जायला सांगितलं…आणि सोबतच करिश्मा कंपनी ची एम्प्लॉयी म्हणून तिला कंपनी तर्फे चांगल्या वस्तू भेट द्यायला आवर्जून सांगितले…किती हा विश्वास आणि किती समजूतदारपणा… तिच्या लोभस आणि निरागस वागण्याने दिवसेंदिवस मी तिच्या प्रेमात पडतोय.. हेच जर मी एखाद्या केवळ बाह्य सौंदर्य असणाऱ्या स्त्री च्या प्रेमात पडलो असतो तर कदाचित आज मला खूप बंधनं आली असती आणि मी इतका यशस्वी झालोही नसतो..

करिश्मा चे एका क्षणात डोळे उघडले गेले, सुमित ची माफी मागून ते परतीच्या प्रवासाला लागले…

वाटेत सुमित च्या बायकोचा फोन आला…

“हो राणीसाहेब, जेवण वेळेवर केलंय…हो हो…करिश्मा चीही काळजी घेतोय तू सांगितल्या प्रमाणे….”

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा