❤ माय माझी…❤

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

❤ माय माझी…❤

आनंदाचं झाड
प्रेमाची सावली देणारं
अदृश्य नाळ
नात्यांनां गुंफणारी
माय माझी…

प्रेमाचं पुस्तक
वाचुन न उमगणारं,
भावनांचं गोड कोड
समजावून न सुटणारं ,
माय माझी…

प्रेमाचा अथांग सागर
मोजता न येणारा ,
मायेचा झरा
कधीही न आटणारा ,
माय माझी…

आनंदघन
प्रेमसरी बरसवणारा
वात्सल्याचा धबधबा
अविरत कोसळणारा ,
माय माझी…

दिव्याची मंद ज्योत
ज्ञानाचा प्रकाश देणारी ,
प्रामाणिक न्यायालय
चुकता शिक्षा करणारं ,
माय माझी…

जीवनातला संस्कार
आयुष्याला अर्थ देणारा ,
घरादाराचा श्वास
नवीन जीवन देणारा ,
माय माझी…

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.