👉तुझा तु… माझी मी… 👈

Written by

भाग-४… लग्नाचा घाट 😄

     गौरी ला रूम मधे बंद केल्यामुळे तिला रोहित ला पण बोलणे जमत नव्हते… तिचा मोबाईल काढून घेतला… तिला जॉब वर पण जाऊन देत नव्हते… लग्न झाल्यावरच काय तो जॉब करायचा… असे तिच्या वडिलांनी ठणकावून सांगितले होते…

    गौरी ला काय करावे काही सुचत नव्हते… लग्न तर तिला रोहित सोबतच करायचे होते…

    तिचे बाबा तिला लग्नाला जबरदस्ती करतात… तिच्या आईचे पण काही ऐकत नाही… तिचे बाबा तिला एकामागून एक स्थळ आणतात… पण ति नकार देत असते… पण तिला समजते की आता नाही म्हणून काही उपयोग नाही…

    त्यामुळे ति लग्नाला तयार होते… तिच्या वडिलांनी इंजिनिअर चे स्थळ आणलेले असते… त्याला ती हो बोलते… त्यांचे बोलणं होत… ति त्याला काही सांगत नाही… मुलाला पण गौरी पसंद पडते…लग्न ठरत…

    लग्न ठरल्यामुळे तिला तिचा मोबाईल तिचे वडील परत देतात… त्यामुळे ति रोहितच्या Conatct मधे येते… आणि त्याला सगळ घडलेले सांगते…

रोहित: ठिक आहे… बर झाल तयार झालीस तु लग्नाला…

गौरी: एकदम shock होऊन… काय…???

रोहित: अग् हो… म्हणजे गैरसमज नको करून घेऊस… मी काय बोलतोय ऐकून घे…

गौरी: हा बोल…

रोहित: मी तुला तुझ्या लग्नातुन पळवून नेणार… बोल आहेस का तयार…??

गौरी: (घाबरत) मला लग्न तर तुझ्याशीच करायचे आहे पण…

रोहित: पण काय..??

गौरी: लग्नातुन अस् गेल्यावर आई बाबा ला खुप वाईट वाटेल आणि सगळ्यांमधे अपमान होईल रे…

रोहित: अग हो… पण दुसरा काही पर्याय नाही कारण तुला तुझे बाबा धड घराबाहेर पण पाठवत नाहीत ग…

गौरी: बरोबर आहे तुझ्… पण मला हे बरोबर नाही वाटत…

रोहित: ठिक आहे मग… अजून लग्नाला खुप दिवस बाकी आहेत… तिथपर्यत नीट विचार करून सांग… मी वाट पाहतो…

गौरी: ठिक आहे… पण तु राग नको मानुस…

रोहित: हो ग… मी समजू शकतो… आणि तु होशील तयार माहिती आहे मला…

गौरी: चल चल… Bby… कुणीतरी आलय वाटत… Love u… 😘

रोहित: love u 2…miss u… Bby… 😘

    गौरी ची आई येते… बाळा लग्नाची तारीख ठरलीये… मुलांकडच्यांना घाई आहे… त्यामुळे येत्या १५ दिवसांत लग्न करायचे ठरले आहे… तु तयार आहेस ना बाळा…

गौरी: हो…

लग्नाची तयारी सुरू होते…

    गौरी ला काय करावे सुचत नाही… विचार करून करून ती रोहित ने सांगितल्याप्रमाणे तयार होते आणि त्याला फोन करते…

रोहित: बोल… मला माहित होत… तु फोन करशील ते…

गौरी: १५ दिवसात लग्न आहे…

रोहित: मग… काय ठरवलस…???

गौरी: तु बोलला तसच… करूया मग… मी आहे तयार…

रोहित: बर् मला वाटलच होत… तु तयार होशील ते…

गौरी: hmmm…

रोहित: ठिक आहे मी लग्नाच्या दिवशी येईन… तयार रहा… मी फोन करेन… तुला… मग तेव्हा ये…

लग्नाचा दिवस…

     सगळे घाई गडबडीत असतात… गौरी ला तयार करायला तिच्या मावस बहिणी असतात… त्यापैकी एक बहीण तिच्या खुप जवळची असते… तिला ती रोहित बद्दल सगळ सांगते… आणि त्यांना मदत करायला तयार होते…

    रोहित येतो… गौरी ला call करतो…

रोहित: hello गौरी… मी आलोय… घराच्या जवळ जे गार्डन आहे तिथे थांबलोय… ये पटकन…

गौरी: लगेच शक्य नाही…पण आपल्याला माझी मावस बहीण प्रिया मदत करणार आहे…

रोहित: हो का.. बर झाल… कुणीतरी आहे आपल्या सोबत…

गौरी: हो… तिथेच थांब… थोड्या वेळाने फोन करते…

रोहित: ok… Im waiting baby… 🥰😘

    गौरी ज्या रूम मधे तयार होत असते तिथे तिच्या बहिणी आणि अजून काहीजणी असतात… तिथून आता गौरीला बाहेर पडायचे असते…. तिला काही सुचत नाही… कसे बाहेर पडावे ते…

    तितक्यात तिची बहीण प्रिया सगळ्यांना बोलते… आम्ही फ्रेश होऊन येतो… गौरीच्या लक्षात येते… की आता तिथून पळून जायचे आहे…

     Washroom ला जाऊन गौरी रोहित ला फोन करते आणि ती येत असल्याची सांगते… तु तयार रहा असे सांगते फोन ठेवते…

    इकडे तिकडे पाहत सर्वाच्या नजरा चुकवत एखाद्या अपराध्यासारखे मागच्या दारातुन ती निघून जाते… प्रिया तिच्यासोबत गार्डन पर्यंत जाते…  आणि तिला सोडून परत येते…

    गौरी आणि रोहित भेटतातच मिठी मारतात… आणि तिथून मुंबईला येऊन लगेच लग्न करतात… 💕

क्रमशः…👉

Article Categories:
प्रेम

Comments are closed.