💕💕 ओळख 💕💕

Written by

©®सुनीता मधुकर पाटील.

💕💕ओळख 💕💕

मी कोण !!! ओळख पटवण्या , जरूरत नाही चेहऱ्याची
बिनचेहरा ओळख पटेल जगाला , गरज नसेल मुखवट्याची…

आयुष्याच्या खडतर वाटेवर , बांध शिदोरी स्वप्नांची
साथ असु दे , अविरत कष्ट आणि दृढ निश्चयाची…
 
परिस्थितीशी लढवूनी छाती , दे काळाला उत्तर
संकटांना सांग ठणकावून , आता ये बेहत्तर…

आव्हानांचा लावून अत्तर , जागवं प्रबळ इच्छाशक्ती उरी
पेटव ज्ञानाचा दीप मनी , जा उजळुन सबाह्यांतरी…

लावुन आशेचे पंख नको घाबरू , उंच भरारी घेताना
पाय असुदे जमिनीवरी , आभाळाला गवसणी घालताना…

नजरेमध्ये नजर रोखून , देऊनी उत्तर आयुष्याला
आनंदाने दे आमंत्रण , नवीन उज्वल भविष्याला…

ध्येयाची शिखरे गाठ , लगाम धरून संयमाची
रहा धीरगंभीर अविचल , चाहूल लागता संकटाची…

यशाची फुले अंगावर झेलुन , कीर्ती दरवळुदे सुगंधापरी
बिनचेहरा ओळख पटेल जगाला , गरज नसेल मुखवट्याची…

©® सुनीता मधुकर पाटील…

Article Categories:
कविता

Comments are closed.