4. अभया- एक ध्येयवेडी

Written by

फिक्कट पिवळ्या रंगाच्या one पीस मध्ये ती एकदमच विशीची तरुणी वाटत होती,विश्वा तिच्याकडे भूत बघितल्यासारखा बघत होता,एकटक तिच्याकडे बघत असताना त्याने एकदा स्वतःला चिमटा पण काढून पहिला,ती मात्र त्याला असे करताना बघून मस्त गालात हसत होती..तो तिला गोंधळूनच विचारतो,”r u serious??”

ती,”about what”??

विश्वा-“तू इथे कशी ,ते पण अशा ड्रेसमध्ये??
ती-“का मी असे ड्रेस घालू शकत नाही का.असा कुठे नियम आहे का🙄

विश्वा-तसं नाही पण तुला आतापर्यंत फक्त साडीमध्येच पाहिलंय ना,अशा इतक्या शॉर्ट ड्रेसमध्ये ते पण तू अशी अचानक अमेरिकेत???what a surprise yaar..

हो ती होती अभया ..

अभया-sorry r u really doctor vishwa??कारण तुम्ही असे “यार” म्हणणं किंवा तुमचं इतकं मोठ्याने बोलणं मी कधीही ऐकलं नाही.

विश्वा एकदमच शांत होतो,त्याला कळतं की आपण अतीच उत्साह दाखवला आहे..त्याला असं शांत झालेलं बघून ती लगेच बोलते,”अहो its ok हो,आपल्याला इथे कोणीही ओळखत नाहीये,कसं हि बेधुंद होऊन वागायचं..

विश्वा तीच बोलणं ऐकून तिला विचारतो,तुम्ही इथे कशा??

ती त्याला थांबवतच विचारते,आपण आधी जेवूया का,मला खूपच भूक लागलीये,मग निवांत तुम्हाला सगळं सांगते..

विश्वा हो बोलून दोघेही एकत्र जेवायला बसतात..तो जेवतानाही एकदम फॉर्मलिटी केल्यासारखं जेवत होता आणि एक अभया होती ,जिने सरळ जॅकेट काढून ठेवलं आणि सरळ हाताने जेवायला सुरुवात केली..ती जेवतानाच त्याला सांगत होती,”मला ना फक्त भारतीय जेवणच आवडत,त्यामुळे मी अशी बाहेर फिरायला आले ना,माझी खूप “गोची” होती.

आता तिच्या तोंडून तो “गोची” शब्द ऐकून याला ठसकाच लागला..त्याने पाणी पिलं तरी ठसका काय थांबेना,मग अभया मॅडम लगेच उठून त्याची पाठ चोळायला लागल्या,मग कुठे त्याला बरं वाटलं..ती हळूच त्याच्याकडे बघून हसतच जेवण संपवते..

तिथून बाहेर पडून दोघेही एकमेकांना बाय करणार तोच तो तिला विचारतो,तू इथे कशी हे सांगितलं नाहीस??

अभया-हम्म actually मी दरवर्षी वर्षातून दोनवेळा तरी ट्रीपला जाते,माझं फिरायला जाणं फिक्स असतं पण मी कुठे जाणार हे नक्की नसत..यावेळी येताना मी विचार केला की डॉक्टर विश्वास अमेरिकेला गेलेत तर आपण पण अमेरिकेला मस्त जाऊन येऊया,..

आता विश्वाला तीच शेवटचं वाक्य ऐकून परत ठसका लागतो..
ती-अहो chill, मला कुठंतरी फिरायला तर जायचंच होतं पण नक्की कुठं हे कळतंच नव्हतं,मग तुम्ही अमेरिकेला आलाय हे लक्षात आलं म्हणून इथे बाकी आता पूर्ण अमेरिकेत तुम्ही इथे असाल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं..so आपली भेट हा पूर्णपणे योगायोग आहे त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही आणि तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा😂😂

आता मात्र विश्वाला तीच हे बोलणं ऐकून खूप हसायला येत आणि दोघेही मोठ्याने हसतात..

विश्वा-मग आता नेक्स्ट destination कुठलं??

अभया-आता तरी हे समोर दिसतंय हे meusium आहे,त्यानंतरच काय फिक्स नाही..

विश्वा-अरे वा, same here..

“चलो तर फिर”, असे म्हणत अभया पुढे चालू लागते,आज सत्या तिला लहान मुलासारखा follow करतो…..

दोघांचीही क्षेत्र वेगळी असली तरी आवडीनिवडी तरी जुळत होत्या ..पूर्ण एकाग्रतेने दोघांनीही meusium पाहिलं,आणि ते बाहेर आले..

विश्वा-आता पुढे??

अभया-काय माहित नाही पण माझ्याजवळ एक भन्नाट कल्पना आहे..

विश्वा-कोणती कल्पना??

अभया-आपल्या दोघांना माहित नाही ना नक्की कुठं जायचंय पण आपण एक करू शकतो का??

विश्वा-हो नक्कीच,पण idea काय आहे ते अगोदर सांगा..

अभया-सांगते हो,कुठे पळून जाऊन लग्न करायची आयडिया नक्कीच नाहीये..

विश्वा-very funny, तू नेहमीच अशी नसतेस ग,इकडे आल्यावर फारच वेड्यासारखी वागतीयेस असं वाटत नाही का??

अभया-त्यासाठी तर मी फिरायला येते..आपण जिथे राहतो तिथे माझी एक image आहे,त्याला धरूनच मला वागावे लागते,नेहमी चेहऱ्यावर एक smile ठेवावी लागते,ती कधी खोटी असते तर कधी खरी..खरं तर त्यावरून पण वाद होतात..साडी नेसायचा मला कधीच कंटाळा येत नाही even ड्रेस पेक्षा मला ते better वाटतं पण म्हणूनच नेहमी साडी ।।।नाही शक्य होत..कधी तरी जीन्स ,one पीस घालावा वाटतो ,किंवा घालतेही मी,पण खूप अवघडलेपण वाटत,सतत डोक्यात विचार चालू असतो,आता कोण काय बोलेल का,कोण कंमेन्ट पास करेल कि काय,कि हि संस्कृती नव्हे असं..पाऊस आला की मस्त पावसात भिजायला जावं वाटतं पण घरात आणि घराबाहेरदेखील बॉडीगार्ड मग बंधन येत..actually मला देशासाठी,राज्यासाठी नेहमी काय तरी करावं वाटतं पण मी या क्षेत्रात आले आणि मला कळलं की फक्त तेवढंच महत्वाचं नाही तर आपण काय घालतो,कुठे जातो,कसे वागतो,even आपण काय जेवतो हे सुद्धा सगळ्यांसाठी मॅटर करतं..आधी काही दिवस मी ते सगळं करून पण पाहिलं पण काही कामानिमित्त मी अशीच एकदा बाहेर देशात आलेले आणि कसं कोणास ठाऊक मी आठ दिवस जास्त तिथे राहिले आणि जो आनंद मला मिळाला ना तेव्हाच ठरवलं की बॉस आता बास वर्षभर जोमाने काम करायचं पण energy आणि टॉनिकसाठी मात्र वर्षातून दोन वेळा तरी स्वतःसाठी वेळ हा काढायचाच.😎😎

ती बोलत होती आणि हा एकदम शहाण्या बाळासारखं तीच सगळं ऐकत होता..

विश्वा-आम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप वेगळी life आहे तुमची..मला अजून तुमच्या राजकारणातल्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडतील ।..

अभया-आणि मला तुमच्या डॉक्टरकीच्या😊😊माझा फ्रेंड चा फ्रेंड पण डॉक्टर आहे..

विश्वा-आजकाल डॉक्टर होणं हे comman आहे..

अभया-हो पण या बोलण्यात माझी आयडिया सांगायची राहिली ना😀

विश्वा -हो बोला ना..

अभया-तर माझं असं मत आहे की ,आपण जर आपली journey एकत्र च स्टार्ट केली तर..

विश्वा-actually great idea..

अभया-so lets start..

दोघांचाही प्रवास चालू होतो,पण हा प्रवास याना कुठे नेउन ठेवणार आहे आणि त्यासाठी अजून किती गोष्टींचा उलगडा होणार आहे हे त्यांनाही माहित नव्हतं..रात्रीच दोघांचंही हॉटेल वेगळी होती..उद्याच ठिकाण नक्की करून आणि एअरपोर्ट वर भेटायचं ठरवून दोघेही निघतात..पण अभयाच डोकं तर आता कुठे चालायला सुरुवात झालेली असते..आज सकाळी त्याला एकदम असे समोर बघून तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता,दोन्ही हात खिशात घालून तो तिच्याकडे बघत होता..प्लेन एकदम फिक्कट ब्लू रंगाचा शर्ट त्यावर इन् न करता त्याने ब्लू जीन्स घातली होती,शिवाय लॉंग ब्लॅक जर्किंग आणि विशेष म्हणजे त्याच पोट पूर्ण कमी झालं होतं,त्याच्यातला इतका बदल बघून तिला परत एकदा “ती” ची आठवण झाली..आता मात्र याचा इतिहास ,भूगोल सगळा बाहेर काढलाच पाहिजे असे म्हणून तिने त्याच्यासमोर एकत्र फिरण्याचा प्रस्ताव ठेवलेला असतो..

दोघेजण हि मस्त फिरत असतात,ती स्वतःच्या मनातला कोणताही हेतू त्याला न दाखवता खरोखर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होती,योग्य वेळ पाहून त्याला हळूहळू आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची नकळत उत्तरे विचारायचीच..आणि बरोबर चार दिवसांनी तिला हि संधी मिळाली देखील..दोघेही डिनर करून निवांत बसले होते,विश्वा तिच्यासोबत बोलताना comfortable होता.. आता तिने ठरवले की याला बोलतं करायचंच म्हणून ती त्याला विचारते,तुम्हाला काही विचारले तर राग नाही ना येणार??

विश्वा-हो विचार ना..

अभया-तुमची कोणी girlfrend किंवा जवळची मैत्रीण नाही का??

विश्वाला तिचा हा प्रश्न अपेक्षित नव्हता,पण त्याला तिला उत्तर द्यायलाही तसा काही प्रॉब्लेम नव्हता..पण त्याने पूर्ण सांगायचं टाळलं आणि तो म्हणाला,”हो एक होती आणि आता एक आहे”खूप कोड्यात बोलला होता तो..

अभया-म्हणजे??

विश्वा-सांगेल ना नंतर कधी तरी,अजून चार दिवस आहेत आपल्याजवळ..

अभया-आता काही प्रॉब्लेम आहे का आणि pls तसे काही असेल तर नका सांगू..😏😏

विश्वा-तसे काहीच नाहीये,पण ही वेळ योग्य नाहीये म्हणून..

अभया राग येण्याचं नाटक करून तिथून निघून जात असते ,तोपर्यंतच तो लगेच उठून तिचा हात पकडतो आणि नकळतपणे तिला मागे खेचतो आणि पटकन पुढे जातो(असे मागे खेचणे अचानकपणे झालेले असते,अगदी त्याच्याही नकळत)ती अलगदपणे मागे खेचली जाते त्यामध्ये दोघांच्याही नाकांची टक्कर होते..तिला कळालं होत की हे चुकून झालंय म्हणून ती मागे सरकते,तो मात्र तिला पाठीमागे सरकू न देता दोन्ही हाताने तिचे दंड घट्ट पकडतो,ती त्याच्या या कृतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहते,आणि तो..तो फक्त तिच्या डोळ्यात हरवलेला असतो त्याच्या तिच्या आठवणीत..

दोघेही परत एक कॉफीची ऑर्डर देऊन एकत्र बसतात आणि विश्वा तिला सगळं सांगायला सुरुवात करतो.. आज त्याला तिला “नाही”म्हणणे जमले असते पण आज तिला नकार देणं त्याच्या जीवावरच आलं होतं,म्हणून त्याने जास्त आढेवेढे न घेता सगळं सांगणे पसंत केले.

मी ,सुशांत आणि पोर्णिमा आम्ही सगळे पाहिलीपासूनचे मित्र,नेहमी योगायोगाने एकाच क्लासमध्ये असायचो आणि त्यातूनच बेस्ट फ्रेंड झालो..जिथे जाऊ तिथे आमची तिघडी एकत्रच..एखाद्या वेळी आमच्यामधील एकजण जरी गायब असला तरी “अजून एक कुठंय”हा इतरांचा प्रश्न विचारला जायचाच..तुला विश्वास बसणार नाही पण आम्ही एकमेकांसोबत एकमेकांचे सगळे प्रॉब्लेम किंवा सगळे आनंदाच्या गोष्टी जगलो आहे,उदा.जेव्हा फर्स्ट टाइम पोर्णि ला पेरिअड आलेले ना तेव्हा ती आमच्यापासून लांब राहत होती,ती स्वतःच इतकी अस्वस्थ होती की तीच ते वागणं तिच्या तोंडावर आम्हाला दिसत होतं,मग काय घेतलं तिला राउंडवर ,मग सगळं सांगितलं मॅडमने..तेव्हा इतकं काय कळत नव्हतं पण आम्ही तिला खूप pamper करायचो,चॉकलेट दे,तिची बॅग सांभाळणे,तिची सेवा करणे..हळूहळू एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच झालो..बारावीनंतर पण एकत्रच MBBS ला ऍडमिशन घेतलं..तिघेही पहिल्यापासूनच मस्तीखोर,उडानटप्पू..मग काय कॉलेज ला गेल्यावर ठरवले होते की,मस्तीही भरपूर करायची पण अभ्यासाकडेही कधीच दुर्लक्ष करणे नाही..अशा तऱ्हेने सुरुवात झाली आमच्या कॉलेज लाईफची.फक्त मस्ती नाही तर गुंडगिरी पण केली होती आम्ही आणि हि पोर्णि आता दिसतीये इतकी शांत,पण तेव्हा आम्ही डॉन होतो तर ती ग्रुपमधली लेडी डॉन होती..खूप छान दिवस होते ग ते..आम्ही दोघे मुलींवर फुल लाईन मारायचो आणि हि पोरांवर लाईन मारायची पण कधीही कोणी मर्यादा क्रॉस नाही केली किंवा आमच्या मस्तीचा कधीही कोणाला त्रास होऊन दिला नाही..

अशातच तिची एन्ट्री झाली..असे म्हणून तो हसायला लागला कारण त्याला कॉलेज चा पहिला दिवस आठवला जेव्हा ती proper पंजाबी ड्रेस,त्यावर घडी केलेली ओढणी ,त्याला पिन अप केलेलं,तेलकट केसांची ती टिपिकल वेणी,पाठीला बॅग अडकवली होती आणि पुढे पोटाजवळ थोडी पुस्तकं धरून ती येत होती,तिच्याकडे बघून मला लगेच जाणवलं की हिने काय जुने हिंदी मूवी पाहून गेट अप केलाय का??bcoz रिअल मध्ये असं कोणीही कसं कॉलेजला कसं येईल ना,पण इतका विचार करत असतानाच तिच्याकडे कधी खेचलो पण गेलो हे कळलं पण नाही..”हे सगळं सांगत असतांना त्याच्या तोंडावर एक चमक आणि उत्सुकता होती..त्याच लक्ष अभयाकडे जातं आणि तो तिला विचारतो खूप बोअर झालीस काय??

अभया-“काहीही काय,अजिबात नाही,तुम्ही सांगा मी ऐकतीये”..

ok म्हणून विश्वा परत बोलायला सुरुवात करतो..

“तिचा तो अवतार पाहून सुशांत आणि पोर्णिने तिची खूप वेड्यात काढली होती,नेहमी त्यांच्या या मूर्खपणात मी पण सहभागी असायचो पण तिच्याबाबतीत होणाऱ्या या शेरेबाजीवर सहभागी होण्याची माझी इच्छा पण नव्हती ,म्हणून मी नेहमी त्यांना गप्प करायचो..आणि राहिला प्रश्न तिच्या dressing सेन्स चा तर तसा ड्रेस अप तिने फक्त आठ दिवस केला होता,त्या गोष्टीचं कारण तिने आम्हाला नंतर सांगितलं जेव्हा ती आमच्या ग्रुपमध्ये आली तेव्हा,आणि तीच मत होत की,ड्रेस किंवा श्रीमंती बघून किंवा देखणेपणावर भाळून जे माझ्याशी मैत्री करतील ते खरंच माझे मित्र असतील का?मला judge न करता जे मैत्री करतील ते माझे खरे फ्रेंड्स..तीच इतकं मोठं logic बघून परत एकदा माझी विकेट पडली होती.ती जेव्हापासून कॉलेजला आलेली ना तेव्हापासून मी lectures अटेंड करायला लागलो,lectures कसली मी तर फक्त तिलाच बघायला वर्गात असायचो..या अशा माझा वागण्याला कंटाळलेल्या माझा दोन मित्रांनी त्यावर एक आयडिया काढली आणि तीचासोबतच मैत्री करून तिलाच आमच्या ग्रुपमध्ये घेतले😀..आम्ही तिघेही एकमेकांबाबत तितकेच पजेसिव्हही होतो म्हणून कि काय माझी जरा तिच्याशी जवळीक होऊ लागली, हे फक्त त्यांच्या लक्षात आले आणि मी त्यांच्यापासून दूर जातोय, असे त्यांना वाटले .खरं तर तसे काहीही नव्हते..या दोघांसारखीच ती पण माझी मैत्रीनच होती..नंतर कधी तिच्या प्रेमात पडलो हे पण कळले नाही पण तिच्यासाठी मी फक्त बेस्ट फ्रेंडच राहिलो..मला त्याचाही काहीच प्रॉब्लेम नव्हता,कारण खरंच खूप मनापासून तिच्यावर प्रेम करत होतो..आणि ती एकमेवच होती जीच्याविषयी प्रेम हि भावना मला फील झालेली,पोर्णि मजेत मला बोलायची पण,”का रे माझ्याविषयी बरं तुला कधी असं फील वगैरे झालं नाही रे”..तेव्हा मी तिला म्हणायचो “मला मुलीवर प्रेम करायचंय ग,मुलीच्या रुपात असलेल्या तुझ्यासारख्या गुंडावर नाही”😂😂..

त्या आठ दिवसानंतर तिने परत तिचा ड्रेस अप change केला..ती फक्त जीन्स ,टी शर्ट,वेगवेगळे टॉप्स यावर च असायची कधी तरी एकदम युनिक असे पंजाबी ड्रेसेस पण घालायची तेव्हा एखाद्या परीप्रमाणे दिसायची..शेवटच्या वर्षी valentine डे ला तिने फिक्कट गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस,त्यावर व्हाईट सलवार,आणि फिक्कट गुलाबी,पांढरी मिक्स रंगाची ओढणी असा ड्रेस करून आलेली..केस रिकामे सोडून एका बाजूला घेतलेली,जेव्हा ती आली ,शपथ!!!सगळे तिच्याकडेच बघत होते आणि मी ??माझा इतक्या विकेट्स आतापर्यंत कोणाच्याच पडल्या नसतील..मी तर हवेतच होतो ,कारण मी तीला propose करणार होतो ..आम्ही म्हणजे मी आणि पोर्णि दोघेच पार्किंगमध्ये बोलत होतो तेव्हा ती दुपारी माझ्याकडे येतच होती पण तिचा चेहरा बघून माझा रंगच उडाला होता,कारण तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते ,ओढणी फाटली होती,केसं विस्कटली होती.माझ्याजवळ येताच तिने मला मिठी मारली आणि ती रडत होती आम्हाला कोणालाच कळत नव्हते की नक्की काय झालंय..मी तिला फक्त शांत करत होतो तेव्हाच सुशांत तिथे पळत आला आणि त्याने सांगितले की,”वहिनीला त्या रितेशने छेडले,जबरदस्तीने स्टोर रूममध्ये नेऊन तिची छेड काढली “..खरं तर ते ऐकायला मी तिथे थांबलोच नाही..तिला पोर्णिजवळ उभी करून तिथल्याच ग्राऊंडवरच्या हॉकी स्टिक घेऊन मी क्लासमध्ये गेलो..रितेश तिथेच निवांत काही झाले नाही असे दाखवत उभा होता..त्याच असं निवांत उभे राहणे मला इतकं खटकलं कि,कसलाही विचार न करता मी त्याला सरळ मारायला सुरुवात केली.मला दम लागेपर्यंत मी त्याला मारले तोपर्यंत तिथे त्या दोघी आल्या होत्या ..त्याच्या डोक्यातून ,हाता पायातून रक्त येत होते आणि ते सगळं पाहून तिने माझ्या तिथेच सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारले आणि तिथून मला ओढत पार्किंगमध्ये घेऊन गेली..कारण या मारामारीत मला पण भरपूर लागले होते..तिथं नेऊन या दोघींनी मला इतके झापले होते की विचारूच नको..सुशांत बिचारा “भिगी बिल्ली”होऊन एका कोपऱ्यात शांत उभा होता..ड्रेसिंग वगैरे करून झाल्यावर मी तिला propose करणार होतो,हळूच या दोघांना तिथून कटवले कारण या दोघांनाही सगळं माहित होते ..पण तरीही  नालायक दोघेही गेट च्या बाहेर माझी वाट बघत उभे होते..मी तिला सांगणारच होतो की तेवढ्यात ती बोलली,”विश्वा आता झालं ते आपण जरा वेळ बाजूला ठेवू आणि सगळ्यात अगोदर मला फक्त तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे ,जी मी आतापर्यंत कोनासोबतच share केली नाहीये.”

मी-हा बोलना, मला पण तुला एक सांगायचं आहे,पण तू सांग अगोदर..

ती-अरे आज सकाळी मला विकी ने propose केलं😊..मी हि त्याला माझा होकार सांगितला..

तीच असं हे सगळं मला सांगणं इतकं अनपेक्षित होते की मी फक्त तेव्हा इतकंच बोलू शकलो ,”कोण विकी”??कारण या चार वर्षात त्याचं नाव मी कधीच तिच्याकडून ऐकलं नव्हतं..ती पण त्याच्याविषयी सांगत होती पण माझा कानावर काहीच पडत नव्हते,माझा डोळ्यात नकळत पाणी येत होते..”खरंच अश्रूंना पण कधी यायचं हे सांगावं लागत नाही ना,त्याच timing कधीच चुकत नाही ,अगदी वेळेवर डोळ्याच्या बाहेर पडतात”..मी तसाच काहीतरी बहाणा सांगून पटकन निघून आलो ती आवाज देत होती,पण थांबायची अजिबात इच्छा नव्हती.. मला तिचा राग अजिबात आला नव्हता आणि येणं पण शक्य नव्हतं इतकं मनापासून मी तिच्यावर प्रेम करत होतो..पण आत खूप खोलवर काय तरी गमावतोय असे वाटून एक कळ यायची आणि अस्वस्थ व्हायला व्हायचे..तसाच तिथून बाहेर आलो आणि मोठ्याने एकटाच रडत होतो त्यावेळी पोर्णिमा आणि सुशांत तिथेच होते,त्यांना वाटले हे माझे आनंदाश्रू आहेत म्हणून दोघेही मला चिडवत होते,मला त्यावेळी काही सुचत नव्हते,आणि कधी नव्हे ते मी त्याच्या पण थोबाडीत मारली ..दोघांनीही अगोदर मला शांत केलं..मला काय झालंय ते त्यांना कळालं होतं..मी या सगळ्या गोष्टी खूप मनाला लावून घेतल्या होत्या..पहिल्यासारखं राहणं मी सोडून दिलेलं,अचानक शांत झालेलो,माझा अशा वागण्याचा तिला अर्थच कळत नव्हता,माझ्यातला बदल तिला कळाला होता पण कारण तिला माहित नव्हतं..मी फक्त तिच्याशीच नाही तर सगळ्यांसोबतच बोलणं कमी केलेलं..अर्थात हे जाणूनबुजून नव्हतं..आम्ही चौघेही एकत्र असायचो पण मी फक्त दाखवायला त्यांच्यासोबत होतो,हे सगळं त्या दोघांना सुशांत आणि पोर्णिमाला कळायचं,त्यांचा खूप जीव तुटायचा माझ्यासाठी,आता पण तुटतो..

आमचं कॉलेज संपून आम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब ला लागलो,तरी पण आमची मैत्री तशीच होती..मी पण सावरलो होतो..अशातच एक दोन वर्षाने एक दिवस तिने आम्हाला पेढे दिले ते तिच्या लग्नाचे..मला जरा वाईट वाटले पण मी ते सगळं विसरलो होतो पण तिच्यावरचं प्रेम जराही कमी झाले नव्हते..लग्नाची डेट पण जवळची होती आणि तिचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून तिला मला सगळीकडे मिरवायचे होते.याचा मला त्रास होत होता पण परत एकदा फक्त तिच्यासाठीच मी तिच्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले होते..तिची सगळी शॉपिंग,तिच्या छोट्या मोठ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करत होतो,तिची खरंच यात काहीही चूक नव्हती कारण तिला माझा मनात काय चालू आहे हे माहीतच नव्हते..ती तर तिच्या जगात विकिसोबत एकदम मश्गुल होती..तिने एकदा आमची आणि विकीची भेट घालून दिलेली..मला तर तो अजिबात आवडला नव्हता.पण तिच्यावर प्रेम असल्यामुळे कदाचित मला असे वाटले असेल म्हणून मी तो विचार सोडून दिला..लग्नाच्या दिवशी जेव्हा मुलीला घेऊन तिच्या मैत्रिणी येतात ना तेव्हा त्या वेडीची एकच इच्छा होती की “तिच्यासोबत त्या क्षणी फक्त मी म्हणजे तिचा बेस्ट फ्रेंड असावा” ,मग मी काय तिच्यासाठी हे करायलाही तयार झालो..

लग्नाच्या दिवशी आम्ही तिघेही तिच्यासोबत होतो.काय सुंदर दिसत होती ती,त्या वांगी कलरच्या शालूमध्ये..त्या क्षणी पण मला विकीचा खूप हेवा वाटत होता,पण काय करणार बाहेरून जगासाठी कितीही मस्ती करणारा असलो तरी आतून मात्र मी हि एकच प्रेमी होतोच ना,त्यातही ज्याला त्याच पहिलं प्रेम मिळालं नाही असा..शेवटी आम्ही सगळे तिला घेऊन आलो .।सप्तपदी सुरु झाल्या,तिच्या चेहऱयावर आनंद अगदी मावत नव्हता,माझ्याकडे आनंदाने पाहत असतानाच अचानक धाडकन असा आवाज झाला,मी समोर पाहिले तर ती जागीच जमिनीवर पडली होती..कोणाच्याच काही लक्षात येईपर्यंत मी जोरातच” सखी$$$$$”म्हणून ओरडलो आणि पटकन तिच्याजवळ गेलो तिचे डोके तसेच मांडीवर घेऊन तिचे हात चोळायला लागलो.मला सगळं सुचायचं बंद झालेलं,मग सुशांत आणि पोर्णिमाने तिच्या नर्व्ह चेक केल्या,त्यांना कळालं होतं की काही तरी गंभीर आहे म्हणून त्यांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले..तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या टेस्ट करण्यात आल्या..रिपोर्ट लगेच येणार नव्हते..एकतर घरात लग्न होते म्हणून भरपूर नातेवाईक तसेच हॉस्पिटल ला आलेले त्यामुळे मला तिला बघायलाच मिळत नव्हते..डॉक्टर असल्यामुळे तिला चेक करण्यापूरते मला तिच्याजवळ जायला जमत होते..पण तिला exactly काय झालंय हे मात्र खरं मला कळणार होते..मी फक्त रिपोर्टची वाट बघत होतो आणि तिच्या नीट होण्याची देवाजवळ प्रार्थना करत होतो.. कारण डॉक्टर असल्याने काही तरी गंभीर आजार आहे हे मलाही कळले होते..आणि थोड्याच वेळात सुशांत पळतच रिपोर्ट घेऊन सगळ्यात अगोदर माझ्याकडेच आला..माझे heartbeat मला ऐकायला येत होते इतका मी घाबरलो होतो..सुशांत आणि पोर्णिने माझ्याजवळ येतंच मला खुणावले ,नकळतच मी रिपोर्ट पाहिले आणि मला अक्षरशः घाम फुटला,तोंडाला कोरड पडली होती,रिपोर्ट तर हातातून गळून पडले होते..मी घाईने उठलो आणि रिपोर्टवरच नाव परत एकदा वाचलं,तर नाव तेच होतं”सखी पवार”…तसाच बाहेर आलो आणि विकीच्या समोर ते सगळ्यांना सांगितले..तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या बारीक गाठी झालेल्या,त्यासाठी आम्हाला तीच ऑपरेशन तात्काळ करणे गरजेचे होते,मी त्या तयारीला लागणार तोच विकी रागाने सखीच्या वडीलाजवळ गेला आणि रागाने त्यांना म्हटला कि,”तुमची असली मुलगी नकोय मला,मी आता हे लग्न मोडतोय”..तो तिथून निघालाच होता की मी त्याला समजावले कि,”अरे आधी आपण ऑपरेशन तरी करू,तू अगोदरच कसं लग्नाला नाही म्हणतोस”..तेव्हा तो माझ्याकडे बघून हसत म्हटला,”विश्वास तू कर ना तिच्यासोबत लग्न,तसंही तू खूप प्रेम करतोस ना तिच्यावर ??कि तुला सगळं माहित आहे म्हणून असली कसलीही मुलगी स्वतःला नको म्हणून तिच्यासोबत तू लग्न करत नाहीयेस”??

मी-तू काहीही काय बोलतोयस..

विकी-तुझं तिच्यावरचं प्रेम तुझा डोळ्यात माझ्यासारख्या नालायक माणसालाही दिसत पण त्या dump ला ते कधी कळणार??

आता मात्र मला राग आलेला ,म्हणून मी त्याची कॉलर पकडली पण सुशांत ने अडवल्याने आणि तिथे सगळे पाहुणे असल्याने मी गप्प तसाच ऑपरेशनसाठी आत निघून जातो..

Article Categories:
प्रेम

Comments are closed.