5. अभया- एक ध्येयवेडी

Written by

हे सगळं सांगत असताना आताही तो खूप भावनिक झालेला,त्यामुळे त्यावेळी खरंच त्याची काय परिस्थिती असेल हा विचार करून अभयाला आता त्याच्याविषयीचा एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता..कधी कधी न एखाद्या व्यक्तीला फक्त व्यक्त व्हायचं असतं पण कधी??जेव्हा समोरचाही त्याच्या भावना समजून घेईल,कोणतंही judgement पास न करता फक्त ऐकून घेईल,त्याही परिस्थितीत तीच सगळं ऐकून घेऊन योग्य मार्गदर्शन करेल..आणि आता विश्वासाठी अभया एक गुड listener झाली होती..ती सगळं लक्ष देऊन ऐकत होती,त्याने पुढे सांगितले,

तुला माहितीये तेव्हा पहिल्यांदा ऑपरेशन करताना मी शांत नव्हतो,माझा हातांना सारखा घाम येत होता,त्यामुळे सगळ्यांना खूप डिस्टर्ब होत होते..पोर्णिमाला मुद्दाम मी ओटी मध्ये बोलावले होते..सखीच्या चेहऱ्याकडे बघून मला तिची इतकी दया येत होती.मनात देवाजवळ एकाच प्रार्थना करत होतो,”एकदाच तिला नीट कर,परत तिला कधीच दुःखी होऊन देणार नाही आणि स्वतःपासून तर कधीच लांब जाऊन देणार नाही.तू फक्त एकदा शुद्धीवर ये”…कदाचित देवाला पण माझं प्रेम दिसलं असेल,म्हणून सर्जरी एकदम व्यवस्थित झाली..पण तिला औषधं हि आयुष्यभर खावी लागणार होती..नाही तर तिला परत पॅरॅलीसीस चा झटका येण्याचे chances खूपच होते..तिची सर्जरी झाली होती,चार ते पाच तासांत ती शुद्धीवर आली.।पण या मधल्या वेळेत खूप गोष्टी घडून गेल्या होत्या..

अभया-म्हणजे??असं काय घडलं होतं??

विश्वा-सर्जरी झाल्यावर सखीच्या आई वडिलांसोबत माझं तिच्या आजारावरून सगळं बोलणं चालू होतं तसाच विकी काय वागला आणि आपण त्याला convince करू असे तिचे parents मला म्हटले,मी पण तयार झालो..विकी ला फोन केला पण त्याने परत एकदा सगळ्यांना स्पष्ट सांगितले की,”मी तुमच्या मुलीसोबत लग्न करू शकत नाही,आणि इतकीच लग्नाची हौस असेल तर त्या विश्वाससोबत लग्न लावून द्या तुमच्या पोरीचे”..आता अशा वेळी त्यांनी माझ्याकडे खूप अपेक्षेने पहिले होते,खरं तर मला कधीही तिच्या आजाराचा प्रॉब्लेम नव्हताच,इतकं प्रेम करत होतो तिच्यावर,त्यावेळी हे वेडे दोघेही मला म्हणायचे,तुझ्यासारखं pure soul तिच्या नशीबातच नाही रे..प्रॉब्लेम हा होता की ,सगळं इतकं पटापट घडलं होत की,तिला हे सगळं कसं explain करणार ??विकी विषयी कसं सांगणार होतो आणि माझा लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर तिच्या घरातले कसे ठेवणार होते,आणि मी ??मी तिला कसं face करणार होतो??त्यावेळी इतका गुंता झालेला कि कसं?काय??कोण??हे फक्त प्रश्नच आमच्यासमोर होते,आणि उत्तरं तर दूरदूरवर पर्यंत दिसत नव्हती..

अभया-हम्म 😇कसं सोडवलात मग हा गुंता??तिला जाणून घ्यायची खूपच घाई झालेली..

विश्वा-मी फोनवर विकिसोबत बोललो पण त्याने काय भाव दिला नाही म्हणून मग मी आणि सुशांत परत एकदा त्याला भेटायला त्याच्या घरी गेलेलो पण तिथेही आमच्या पदरी निराशाच आली,त्याने आम्हाला गेटच्या आत पण येऊन दिले नाही..मग काय ..दोघेही घरी आलो..इतकी धावपळ झालेली आणि मानसिकरित्या विचार करून इतकं थकलो होतो की आता पुढे काय???याचा विचार करायची पण ताकद नव्हती..त्यादिवशी संध्याकाळी विचार करता करता दोघेच तिथेच झोपलो रात्री 11 ला पोर्णि चा कॉल आला की,”सखी शुद्धीवर आलीये”..माझा अपेक्षेप्रमाणे ती वेळेनुसार शुद्धीवर आली होती..होतीच ग तशीच ती एकदम लढाऊ type..प्रत्येक गोष्टींचा सामना एकदम धैर्याने करायची पण आता जे घडणार होत ते तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं..मी गडबडीतच हॉस्पिटलला गेलो,पोर्णि तिथेच होती त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं,तिने मला सांगितलं की” सगळं नॉर्मल आहे,तिचे parents तुझीच वाट पाहत आहे”,तेव्हा मात्र मला दडपण आलेलं कारण यांनी जर सगळं तिला सांगितलं तर टेंशन ने गोष्टी बिघडण्याचे chances जास्त होते..मी घाईतच त्यांच्याकडे गेलो,विचारपूस केली तेव्हा कळले की,माझा सल्ल्याशिवाय ते काहीच करणार नाहीत..तेव्हा माझा जीवात जीव आला होता..मी त्यांना सांगितलं की,”ती बरी झाल्याशिवाय आपण कोणीही तिला काहीच सांगू नये,आणि विकिविषयी विचारलं तर सांगायचं कि तो अचानक प्रोजेक्टसाठी बाहेर गेलाय”..सगळे तयार झाले..पण माझं मन मात्र मला खात होतं कारण तिच्यासमोर खोटं बोलणं मला कधीच जमलं नाही,तिला लगेच सगळं समजायचं.ती नेहमी म्हणायची ,जिथे खोटं बोलावं लागतं, ती मुळातच मैत्री नाही..आणि आता तीचासोबतच काही दिवस सगळी खोटी नाटकं करावी लागणार होती..मी हसतच तिच्या रूममध्ये गेलो,जास्त काहीच झाले नाही असे दाखवत तिला hiii बोललो..

सखी-hii(उठायची धडपड करत)

विश्वास-अगं झोपूनच राहा कि,इतकी कसली घाई असते ग तुला सगळ्याची..

सखी-विश्वा🙄

विश्वा-हा बोलना

सखी-मी पण एक डॉक्टर आहे,हे तुम्ही सगळे विसरलात का??

(खरं सांगू का अभया ,मी काय आम्ही सगळेच हे विसरलो होतो,पण तिच्या या प्रश्नाने आम्ही अजून पेचात अडकणार होतो ..ती डॉक्टर नसती तर तिला कसही समजावता आले असते पण ती ही न्यूरो सर्जन होती)

विश्वा-असं का म्हणतेस..

सखी-तुम्ही सगळे काही तरी लपवताय ना माझ्याकडून??

विश्वा-हे असं आणि कोण म्हटलं तुला..

सखी-खूप शहाणा झालायस का..

विश्वा-हम्म 🤔🤔हो actually..

सखी-बरं, आता एक करायचं हा,माझे सगळे रिपोर्ट्स आणून मला दाखवायचे,मला जरा idea आलीये कि काय असू शकते तरी पण रिपोर्ट्स पहिले तर कळेल..आणि अजून एक तूला वाटत असेल की ,मी रिपोर्ट्स पाहून घाबरेल वगैरे पण तसं काहीही नाहीये,इतकी कमकुवत तर मी नक्कीच नाहीये..

विश्वा-अजून काही आज्ञा सरकार??

सखी-आणि एक,मला विकीला भेटायचंय, त्याने लग्न का मोडलं हे त्याला विचारायचंय..

तिच्या तोंडून हे ऐकून मी चमकलोच,तिला कसं कळालं याच्या विचारातच असताना ती बोलली,अरे सगळ्यांच्या चेहऱयावर बारा वाजलेत,आणि आता मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याने इथे असायला हवे होते तर तो इथे नाहीये,यावरून मी जे समजायचं ते समजून गेले..

विश्वा-म्हणजे तुला टेंशन आलं नाहीये ना..wo thank god..

सखी-ते आपण नंतर बघू,तू आधी रिपोर्ट्स आणतो का??

विश्वा-हो,आलोच only 5 min..

सखी (मनातच)-खचले तर खूप आहे रे मी,पण प्रेम केलंय ना त्याच्यावर,त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न तर नक्की करणार..त्याच्यासमोर प्रेमाची भीक मागावी लागली तरी चालेल..खरं प्रेम केलंय, काय जोक नाही केलेला,आणि त्याची so called लग्न न करण्याची कारणं पण ऐकून घ्यायचीये ना..jst wait Mr.विकी..

विश्वा-हॅलो सखी,कसला विचार करतीयेस, हे घे रिपोर्ट्स..एकदम नॉर्मल आहेत,जरा औषधं खावी लागतील इतकंच(तो खोटं बोलत होता पण तिने strong असावं म्हणून)

ती रिपोर्ट पाहत होती,पण बैचेन तर मी होत होतो कारण तसं विचार करायला गेले तर सगळं नॉर्मलच होतं, पण तो आजार तिला खूप तरूनपणातच तिच्या मागे लागला होता..तो कधीही बरा होणार नव्हता,ती फक्त औषधांवर जगणार होती..ती रिपोर्ट वाचून एकदम निवांत बोलत होती,पण मला माहित होते ना,आतून पूर्णपणे तुटली होती,स्वतःमुळे आम्हाला सगळ्यांना त्रास नको म्हणून इतकी आजारी असताना पण फक्त सगळ्यांचा विचार करत होती,उगाचच मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो.तिच्यामुळे तर मी प्रेम करायला शिकलो ,त्याचा अर्थ समजत गेलो,पण तिच्याबाबतीतच असे का??वाटत होतं आता जावं आणि तिला सांगावं”सखी होशील का ग या वेड्या डॉक्टर विश्वा ची “विश्वासखी”..

सखी-विश्वाsssss..अरे विचार करत कुठंपर्यंत जाऊन आलास😀😀

विश्वा-तुला आता पण मस्ती सुचतीये का??😏😏

सखी-ऐक ना विकिच बरोबर आहे अरे..।रिपोर्ट्स वाचून कळतंय कि त्याचं वागणं एका अर्थाने बरोबर आहे..बरोबर ना..पण त्याच्याजागी मी असते ना नक्कीच त्याला असं सोडलं नसतं रे,but its okk..सगळ्यांकडून नाहीना आपण प्रेमाची अपेक्षा करू शकत..

विश्वा-ये dont be सो emotional..तुझ्यासाठी मुलांची लाईन लावेल..

सखी -😊😊

विश्वा-चल निघू का मी..परत येतो.

सखी विचार करतच त्याला थांबवते..

सखी-एक काम होते विश्वा..

हा बोलना-विश्वा

सखी- मला विकीला भेटायचंय आणि तू मला तिथे आता घेऊन जाणार आहेस..

आता माझा परिस्थितीवर मला खरंच शब्द सुचत नव्हते,कारण ती असे काय तरी सांगेल अशी दूरवर पण मला वाटले नव्हते.

विश्वा- आताssss not possible..

सखी-होय आताच..मला काही ऐकायचं नाहीये..आणि जर मला तू आता तिकडे घेऊन गेला नाहीस तर मी आतापासूनच औषधं खाणार नाहीये..
असे म्हणून तिने रागाने तोंड फिरवले.😞😞तिच्या या कृतीचं अगोदर खूप अप्रूप वाटायचं..अशी रागाने फुगली ना अजून cute दिसायची..

अभया-मग तुम्ही घेऊन गेला का तिला त्या विकीकडे..माझ्यासारखीने तर त्याला चप्पलने मारले असते..😏😏

विश्वा-woooo, wait ती पण असाच विचार करून  माझ्यासोबत त्याच्या घरी निघाली होती…खूप strong होती ना ती,मग स्वतः कसं strong आहे हे दाखवायला नको का म्हणून हा उपद्व्याप होता..तीला कसं तरी समजावून मी दुसऱ्या दिवशी विकीकडे घेऊन गेलो..ती तिथे काय पराक्रम करणार होती हे मला माहित होतं आणि त्या विकीला तसंच पाहिजे म्हणून मी एकंदर खुश होतो,स्वार्थी झालेलो जरा..पण विकीला बघून ती खूप भावनिक झाली होती..

सखी-हे बघ विकी ,तुझी परिस्थिती मी समजू शकते रे,पण एकदा विचार करायला काय हरकत आहे..मी तुला अजिबात फोर्स करणार नाहीये..आपल्या प्रेमाचा तू विचार करावा..

विकी-r u serious सखी??प्रेम???कुठलं प्रेम??माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं..

सखी आश्चर्याने त्याला विचारते- म्हणजे??प्रेम नव्हतं तर दोन वर्षे माझ्यासोबत काय timepass करत होतास का??

विकी हसतच तिला सांगतो-obivisly yes..तो फक्त timepass होता..तुझ्यासारख्या dumb मुलीला मूर्ख बनवणे खूप easy गेलं मला..आणि माझं प्रेम वगैरे काही नाही हा..आता आपलं लग्न कॅन्सल झालंच आहे तर सांगतो,”तुझ्या इस्टेटीसाठी फक्त मी तुझ्यासोबत लग्नाला तयार झालेलो..आणि अजून एक स्वतः इतकी श्रीमंत आहेस ते जरा वागण्यात पण दिसू दे,तो जो attitude, तो माज असतो ना तो दिसुदे ग..नेहमी असं गोड राहायला कसं जमत तुला??अजून एक सिक्रेट सांगू??हा जो तुझा विश्वास आहे ना,तो खूप प्रेम करतो तुझ्यावर ..जेव्हा तू लग्नाच्या अगोदर मला त्याच्याशी भेटवलं ना ,मला तेव्हाच समजलं होतं.पण तू त्याच्यासोबत इतके दिवस होतीस तरी तुला ते समजू नये how dumb u are..

तो बोलतच होता ती ऐकत होती पण तिला ते सहनच झालं नाही आणि तिथेच चक्कर येऊन पडली..एवढं सगळं घडत होते आणि तो विकी  मला बोलला ,”ये चल रे उचल हिला आणि निघ इथून.”खरं तर त्या क्षणी त्याला तिथेच मारावं वाटत होतं पण ती वेळ नव्हती म्हणून तिला पटकन हॉस्पिटल ला नेले..अगदी पटकन ईलाज झाला म्हणून ती आता वाचली होती..

आठ दिवस होऊन गेले होते,पण मी तिच्यासमोर गेलोच नव्हतो.तिला माझा प्रेमाविषयी कळालं होतं, आणि तीचासमोर मला माझा पंचनामा करून घ्यायचा नव्हता..

तो पुढे सांगत होता पण अभयाने त्याला थांबवले आणि विचारले,”ते सगळं जाऊदे,आधी सांगा तुमचं आणि तीच लग्न झालं का”??

विश्वा-“झालं की,पण त्यामुळेच मी तिला गमावलं ग,आणि आतापर्यंत त्याचा पश्चाताप करतोय,विसरतो म्हटलं तरी ते सगळं विसरता येत नाहीये मला”..

अभया त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारते,”इतकं काय घडलं होतं अजून??

क्रमश:

(कथेमध्ये अजून भरपूर twist and turns आहेत,सो लगेच अभया आणि विश्वा च्या प्रेमाची अपेक्षा चुकीची असू शकते..पार्ट छोटा आहे पण नक्की कंमेंट्स करा)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.