जगा स्वच्छंद…

Written by

योगिता चं आम्हाला फार कौतुक वाटायचं.. आम्ही कॉलेज ला एकत्र होतो, योगिता अत्यंत आक्रमक, चंचल आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची ती होती. बंधनं तिला कधीच मान्य  नसत. एकदा एक लेक्चर बंक करून आम्ही कॉलेज च्या मागच्या गेट ना पळणार होतो इतक्यात त्या प्रोफेसर ने आम्हाला पाहिलं… त्यांनी तास न घेता आम्हाला त्यांचा केबिन मध्ये बोलावलं आणि आम्हाला झापायला सुरवात केली. मी मान खाली घालून उभी होते, योगिता च  मला जाम टेन्शन आलं. ही आता काय बोलेल याचा काहीच अंदाज नव्हता … ती शांत होती, प्रोफेसर ला वाटलं बघा आपल्याला किती घाबरलीये, पण खरं म्हणजे ती वादळापूर्वीची शांतता होती… सरांचं बोलणं झाला तशी ती सुरु झाली ..  “सर माफ करा पण कशासाठी आम्ही तुमच्या लेक्चर ला बसायचं? आपल्याला एकूण ६ युनिट असतांना तुम्ही २ वरून डायरेक्ट चौथ्या युनिट वर उडी घेतली, पहिले जे २ युनिट शिकवले ते पण अगदी शॉर्टकट मध्ये, युनिट ३ आणि ४ आम्हला self  स्टडी ला दिले.. कशासाठी? मग तुम्ही काय फुकट बसून पगार खाताय का? एक वेळ तुम्ही शिकवलेलं समजलं असत तर नक्कीच आम्ही लेक्चर ला बसलो असतो, पण तुम्ही काय शिकवता हे तुम्हाला तरी समजतंय का? ” हे बोलत असतांना मला मात्र घाम फुटला, आता प्रोफेसर प्रिंसिपॉल कडे तक्रार करून आमच्या दोघींची हकालपट्टी करेल या विचाराने मी आता रडायचेच बाकी होते, पण झालं उलटंच, प्रोफेसर जाम घाबरला, करण चुकीत्याचीही होती…सॉरी सॉरी म्हणत निघून गेला..  खरं तर ती जे बोलत होती त्यातला शब्दन शब्द खरा होता… पण बोलायची हिम्मत कोणाला होती? योगिता मात्र कसलाच विचार न करता बोलत असे, एक मात्र होतं की ती ज्या गोष्टी चुकीच्या असायच्या त्यावरच ती अशी बोलायची, तिची स्वतःची चूक असली तर मात्र मान्य करायची…  आमचं कॉलेज संपलं, नोकरीला लागलो, तिथेही तिचा हाच स्वभाव, बॉस ला झापायला जराही मागेपुढे ती पाहत नसे, पण तीच काम खूप चोख असल्याने तिला नोकरीत ठेवणं कंपनीला फायद्याचं ठरायचं..  त्यामुळे तिथले काम करणारे लोकं काही अडचण अली कि तिलाच सांगत असत ..  इथपर्यंत सगळं ठीक होत, पण आता लग्नानंतर हि काय करणार हा एक वैश्विक प्रश्न सर्वांसमोर होता…

तिच्या स्वभावामुळे लव्ह मॅरेज चा संभव नव्हता …काही मुलांना ती आवडायची, पण जरा काही चुकले कि त्यांचा आया बहिणी एक करून त्याला ती पिटाळून लावायची..  मोठ्या मुश्किलीने तिच्या स्वभावाला साजेसा एक मुलगा पहिला आणि बोलणी करायला ते घरी आले.. 

मुलगा बाहेरगावी एकटा राहत असे, मुद्दम असा एकटा मुलगा तिच्या आई वडिलांनी पहिला, कारण एकत्र कुटुंबात तिचं राहणं  धोक्याचं होतं ..  पाहायचा कार्यक्रम ठरला..  योगिता ने चहा पाणी दिले, मुलाला चहा देतांना डोळ्याला डोळे भिडवून एक नजर तिने टाकली, मुलगा लाजला आणि त्यानेच खाली पहिले..  मुलाचे आई वडील आणि योगिता चे आई वडील गप्पा मारत होते, शेवटी त्यांनी विचारले कि तुम्हाला काही बोलायचे असेल तर बाहेर जा आणि एकमेकांशी बोला..  योगिता बोलली, “हो बोलायचं आहे, पण सर्वांसमोर” योगिता च्या आईवडिलांना धोक्याच्या घंटेचा आवाज ऐकू येऊ लागला.. त्यांना गरगरायला झालं.  ” राज,तू नोकरी करतोस ना? राहायला कुठे असतो?” “मी गोविंद नगर ला एक रूम  घेऊन राहतो, पण काळजी नको, लग्न नंतर एक फ्लॅट घेणार आहे तिथे आपण दोघे राहू” “गोविंद नगर आणि तुमच्या आई वडिलांचं घर फक्त 20 km  अंतरावर आहे, मग असं बाजूला घर घेऊन राहण्याचा काय अर्थ?” राज ला खरं तर राजा राणीचा संसार हवा होता, आई वडील जुन्या वळणाचे असल्याने त्याला थोडी अडचण वाटायची, म्हणून मुद्दम त्याने असं वेगळं राहायचं ठरवलं होतं . त्याचा आई वडिलांना दुःख वाटत होता मुलाच्या या निर्णयाबद्दल पण पण विचारायला संकोच वाटायचा, आज योगिता ने हा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांना कौतुक वाटलं तिचं . 

राज म्हणाला..  “बरोबर आहे तुझं.. म्हणजे… खरं तर… अं … मी .. मी …” त्याला काय बोलावं कळत नव्हतं…

“मला तुम्ही पसंत आहात, पण लग्न नंतर आपण तुमच्या आई वडिलांसोबत राहायचं, तुम्ही एकुलते एक आहात, तुमच्या आई वडिलांना आपली साथ हवी.. ” राज ने होकारार्थी मान डोलावली..  आई वडिलांना आनंद झाला, असं स्पष्ट बोलणारी आणि आपल्या घराला जोडणारी मुलगी त्यांना वेगळी वाटली आणि आनंदाने त्यांचे लग्न उरकले..  पुढे सर्वजण एकत्र राहू लागले..  योगिता ने नोकरी सुरु केली..  कितीही म्हटलं तरी सासू ला ते पसंत नव्हतं..तिची सासू जुन्या वळणाची असल्याने योगिता ने घरातच लक्ष द्यावं अशी त्यांची अपेक्षा.. पण योगिता चा स्वभाव पाहता ती ऐकणार नाही हे त्यांना समजलं पण काही ना काही कारणाने घरात कुरबुरी सुरु झाल्या..  योगिता सकाळी लवकर उठून घरातली काम आवरण्याचा प्रयत्न करी पण सगळीच काम काही व्हायची नाही, मग तिची सासू योगिता गेल्यावर ती काम यावरून घेई.  खरं तर लग्ना आधी योगिता ची सासू एकटीच सगळी काम आवरत असे पण आता त्यांना जीवावर येऊ लागलं.. आलेल्या सुनेनेच सगळं आपल्याला हातात द्यावं अशी त्यांची अपेक्षा वाढू लागली..  मग घरात चिडचिड सुरु झाली, सासू राज ला काहीबाही सांगू लागली, योगिता ला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पणें टोमणे मारू लागली, राजही योगिता ला आता बोलायला लागला..  हे सर्व योगिता च्या लक्षात आलं …  आणि तिच्या स्वभावाला अनुसरून तिने सासू ला , नवऱ्याला आपल्या समोर बसवलं.. आता काहीतरी वाजणार याची कल्पना राज आणि त्याच्या आईला आली.. इतके दिवस योगिता काही बोलत नव्हती पण आज ती काहीतरी करणार म्हणून दोघे जाम घाबरले.. कारण योगिता खरी आणि स्पष्ट बोलणारी होती आणि तिच्या युक्तिवादापुढे बोलणं कुणालाही शक्य नव्हतं, ती खरं बोलत होती आणि त्यामुळे तिला उलट उत्तर देणं शक्यच नव्हतं…  “आई, बऱ्याच दिवसापासून बघतेय , तुम्हाला कोणतीतरी गोष्ट खटकतेय, असं मागून कुरबुर करण्यापेक्षा मला स्पष्ट सांगितलं तर बरं होईल..” “योगिता हे बघ, मला तू नोकरी केलेली आवडत नाही, घरात राहून घर सांभाळावं अशी माझी इच्छा आहे..” ” राज, आईंना असा वाटतंय, तुझं काय मत आहे?” “अं … म्हणजे.. मला असं वाटत की…  आई म्हणते ते बरोबर आहे…” “आई, तुम्हाला असं का वाटतं  कि मी नोकरी करू नये??” “कारण  बाईच्या जातीने बाहेर पडलेलं चांगलं नाही, बाई घरातच शोभते” “ठीके मग मी नोकरी सोडते पण तुम्हीही भिशी लावणं, मंदिरात जाणं, संध्याकाळी बायकांसोबत जायचं बंद करायचं.. ” “अं ??? ते कसं  शक्य आहे? कि कित्येक वर्ष हे करतेय आणि सवय झालीये मला आता” “तुमच्या सासूबाई जायच्या का हो असं मैत्रिणींसोबत फिरायला?” “नाही ग बाई, त्यांना फार बंधन होती…घरातच मुकाट्याने बसून असायच्या” “मग तुम्ही का फिरता बाहेर?? ” ” कारण आता जमाना बदलला आहे, काळासोबत आपणही बदलायला हवं, आपले विचारही बदलायला हवे” “घ्या कि मग, माझ्या प्रश्नच उत्तर तुम्हीच दिलात की” सासू वादविवादात हरली, थोडी संकोचली पण मोकळं हसून आपली हार मान्य केली..  “हे बघा आई आणि राज,

…माझ्या आई वडिलांनी पैसे खर्च करून मला शिकवले ते मी माझ्या पायावर उभी राहावी म्हणून, माझ्या पगारात मी घराला हातभार लावतेच आहे, माझ्या नोकरी करण्यातून काहीही संकट येत नाहीये आणि राहिली गोष्ट घरकामाची तर मी एक कामवाली शोधली आहे, ती घरातलं सगळं काम करून घेईल” “आणि राज, तुम्हाला आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतील, शिका जरा ते.. नुसतं आई म्हणते त्यात हो ला हो लावत जाऊ नका..” असं म्हणत योगिता ने प्रॉब्लेम काही मिनिटात सोडवला.. एकंदरीत संवादाने प्रश्न सुटतात हेच खरं..  योगिता च्या बऱ्याच सवयीचा तिच्या सासूला आणि राज ला राग यायचा, म्हणजे सुट्टीच्या दिवशी उशिरा उठणे, वस्तू जागेवर न ठेवणे, स्वयंपाक घरात पसारा घालणे, फोन वर तासंतास बोलणे.. कुरकुर चालू असायची, राज आणि आईची भांडण व्हायची पण योगिता मात्र अगदी आपल्या मनाला पटेल तसं  वागत होती… कारण अगदीच भांडण करण्या इतपत काही मोठे गुन्हा ती करत नव्हती..  कधी राज किंवा सासू बोलली तरी अगदीच दुर्लक्ष करायची.. अगदी निर्लज्जाप्रमाणे इग्नोर मारायची…  आपल्या धुंदीत , आपल्या चालीत ती आयुष्य जगात होती.. इकडे राज आणि तिची सासू कुरबुर करायचे, मनातल्या मनात कुढत बसायचे, संताप करत बसायचे.. पण योगिता मात्र एकदम दगड… कसलाच परिणाम नाही..  हळूहळू योगिता च्या सवयीची सर्वांना सवय होत गेली… आता राज आणि तिची सासू योगिता जशी आहे तशी तिला स्वीकारायला शिकले… ती कशीही असली तरी तिची घरात मदत होत असे, तिच्या योगिता ची कुरकुर करून, तिची चुगली करून आणि संताप करून शेवटी ते दोघे थकून गेले… आणि तिच्या चांगल्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला लागले.. योगिता च घरात नसणं त्यांना आता खायला उठत होत, तिच्या हातचा स्वयंपाक, सणासुदीला तिचा उत्साह ह्या गोष्टींनी ते आता कौतुक करू लागले.. कारण ते आनंद शोधत होते आणि कुरकुर करण्यात कसलाच आनंद नाही हे त्यांना समजले.. 

आपणही आयुष्यात कितीतरी गोष्टींचा मनस्ताप करून घेतो.. गोष्टी नीट करायला वर्षानुवर्षे घालवतो.. पण हे सर्व करण्यात आयुष्य निघून जातं आणि हाती काहीच येत नाही.. म्हणून योगिता सारखं आयुष्य जगावं, दुसऱ्याच्या कुरबुरींनी, टोमण्यांनी स्वतःची मानसिक शांती कधीही न ढळू देणारा योगिता सारखा स्वभाव आपलाही बनला तर किती छान होईल ना??

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत