दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २५
माधव बेंचवर बसलेला होता... आणि फोनवर हसत काहीतरी बोलत असतो... तेवढ्यात रोहन धावत येतो...
“माधव… माधव..."
"अरे... ऐ... काय झालं इतकं... जो तु माझ्या नावाने बोंब मारतोयस...?" माधव फोन आपल्या खिशात ठेवत बोलतो...
"अरे काय झालं काय म्हणून तु काय विचारतोयस...? त्यापेक्षा काय झालं नाही ते विचार ना...?" रोहन थापा टाकत बोलतो...
"ठिक आहे... सांग काय नक्की झालं नाय ते तु आता पटकन ओकून सांग..." माधव वैतागून बोलतो...
"अरे व्हाइस प्रिन्सिपलनी अँटी-रॅगिंग मीटिंग बोलावली आहे... आणि… त्यात तुझं नाव पण घेतलंय म्हणे... अशी बातमी मिळाली मला... आणि आलोच लगेचच तुला माहिती द्यायला..." रोहन बॅंचवर बसत बोलतो...
रोहनने सांगितलेले ऐकताच माधवचा चेहरा क्षणात बदलतो...
“काय…?”
त्याच्या आवाजात पहिल्यांदाच अस्वस्थता निर्माण होते...
“काय…?”
त्याच्या आवाजात पहिल्यांदाच अस्वस्थता निर्माण होते...
तो दूर कॉरिडॉरकडे पाहतो... तेव्हा तिथे त्याला गौरवी... सायलीच्या शेजारी उभी असलेली प्रा देशमुखांशी बोलताना दिसते...
आणि माधवला पहिल्यांदाच जाणवतं...
आज फक्त एक मुलगी उत्तर देऊन गेली नव्हती…
तर सिस्टम हलवून गेली होती...
आज फक्त एक मुलगी उत्तर देऊन गेली नव्हती…
तर सिस्टम हलवून गेली होती...
ππππππππππππππ
संध्याकाळची वेळ...
अँटी-रॅगिंग मीटिंग रुम...
कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीतली मीटिंग रूम....
भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो...
भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो...
आणि भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं पोस्टर...
“शिक्षण हे शोषणासाठी नाही, तर मुक्तीसाठी असतं...”
“शिक्षण हे शोषणासाठी नाही, तर मुक्तीसाठी असतं...”
टेबलाभोवती प्रिन्सिपल..., प्रा. देशमुख, दोन अजून प्राध्यापक, दोन महिला प्राध्यापिका आणि स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते...
दार उघडतं... गौरवी आत येते... तीची सरळ चाल व नजर खाली नाही तर थेट समोर...
तर तिच्यामागे सायल चालत असते...
दुसऱ्या बाजूला... माधव आणि त्याचे मित्र... हसण्याचा व अहंकाराचा आव आणलेला चेहरा… पण आत कुठेतरी घाबरलेली नजर मात्र होती...
प्रा. देशमुख थेट मुद्द्यावर येतात...
“आज सकाळी कॉलेज गेटजवळ जे घडलं,
ते रॅगिंग होतं की आणखी काय होतं...? हे कळण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आहे...”
“आज सकाळी कॉलेज गेटजवळ जे घडलं,
ते रॅगिंग होतं की आणखी काय होतं...? हे कळण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आहे...”
प्रिन्सिपल गंभीर आवाजात म्हणतात...
“पहिले नवीन मुलं फ्रेशर बोलतील...”
“पहिले नवीन मुलं फ्रेशर बोलतील...”
क्षणभर त्या खोलीत शांतता पसरते...
गौरवी एक पाऊल पुढे येते...
“मी बोलते सर...”
“मी बोलते सर...”
माधव उपहासाने हसतो आणि म्हणतो...
“सर… आम्ही काहीच केलं नाही... आम्ही तर नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत होतो... कारण ती आपल्या कॉलेजची परंपरा आहे... आणि आम्ही थोडीशी ओळख करून थोडंस मस्ती सुद्धा करत होतो...
“सर… आम्ही काहीच केलं नाही... आम्ही तर नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत होतो... कारण ती आपल्या कॉलेजची परंपरा आहे... आणि आम्ही थोडीशी ओळख करून थोडंस मस्ती सुद्धा करत होतो...
'थोडी मस्ती...'
गौरवी त्याचं हे वाक्य मध्येच तोडत बोलते...
“मस्ती ती… ज्यात समोरचा हसतो.
आणि रॅगिंग ते… ज्यात समोरचा गप्प बसायला भाग पाडला जातो...”
गौरवी त्याचं हे वाक्य मध्येच तोडत बोलते...
“मस्ती ती… ज्यात समोरचा हसतो.
आणि रॅगिंग ते… ज्यात समोरचा गप्प बसायला भाग पाडला जातो...”
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."