Login

"बाई पण.. " एव्हढा भारी झाला कसा ?

बाईपण भारी देवा .. एव्हढा पॉप्युलर का झाला असावा ?

एखादी कलाकृती सुपरहिट होते त्याला सामान्यतः ३ पैकी १-२ कारण  असतात 
१. लोक त्याच्याशी relate करतात,/connect होतात
२. त्यांना काही करायचे असते पण प्रत्यक्षात करू शकत नाहीत मग त्यांचे ते स्वप्न/ इच्छा/ आकांशा पडद्यावर पूर्ण होताना बघायला मिळते
३. अगदी त्यांची चाहती/ मनातली व्यक्तिरेखा असते


एक तर त्यात कोणीही  मेनस्ट्रीम हिरो - हिरोईन नाही, कसलेल्या अभिनेत्री असल्या तरी त्या सगळ्या चाळीशी पुढच्या आहेत. तरी  सिनेमा  एव्हढा गाजतोय. का?
बाई पण मध्ये १ आणि २ points बरेचसे कव्हर होतात कदाचित म्हणून हा सिनेमा येव्हढा hit झाला असावा.

१. नीट बघितलं तर त्यात काही गोष्टी किंचित illogical किंवा ओढून ताणून आणल्यासरख्या वाटतात. जसं, iphone घेण्यासाठी मंगळागौर खेळून बक्षीस जिंकणे, fibroid झालं म्हणून  एव्हढ्या तरुण मुलीचं तडका फडकी uterus काढून टाकणं etc.

२. काही सीन्स थोडे अति वाटतात एक स्पर्धा हरल्यावर लगेच हताश होऊन  दारू प्यायला बसणे, भर स्टेशन वर मोठ्या बहिणीचा गळा पकडणे etc.
पण सहा पात्रांना एकत्र आणणे आणि त्यांची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे यासाठी लेखिकेला बहुदा ह्या गोष्टी कराव्या लागल्या असतील.

वरील काही बाबी सोडल्या तर अतिशय छान जमून आलेल्या गोष्टी: 

१. सगळ्यांचा उत्तम अभिनय, team work
२. Competitive आई, पळून जाऊन केलेलं लग्न निमूटपणे निभवणारी, प्रसंगी आपली आवड निवड बासनात बांधून ठेवणारी नोकरपेशी स्त्री, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्यामुळे कुचंबणा होणारी गृहिणी,  फक्त सौंदर्य बघून केलेल्या लग्नात, तेच सौंदर्य उतरल्यावर दुसरीकडे खेचला जाणारा नवरा बघुन हताश झालेली स्त्री, सगळ्यात महत्त्वाची आजची घर, मुलं, नोकरी, लोन्स सगळं स्वतः च्या खांद्यावर वाहून नेणारी  चाळिशीतली सुपरमॉम ह्यातली कोणी ना  कोणी प्रत्येकीला आपल्यात, शेजारणीत, मैत्रिणीत, नातेवाईकांमध्ये , ओळखीच्यांमध्ये जरूर दिसते.
३. इतर मालिका आणि सिनेमात दाखवतात तशी कुठली नाती खरतर flawless नसतात. त्यामुळेच दोन जुळ्या बहिणी मधल शीतयुद्ध, छोट्या गैरसमजातून दोन टोकांना घेऊन जाणारे नातेसंबंध,  हे नातेसंबंधांचे पीळ जेव्हा अलगद स्क्रीन वर  सोडवलेले दिसतात तेव्हा नकळत  प्रेक्षकही  सुखावले जातात. 
४. प्रेक्षणीयता, संगीत, हलकं फुलकं वातावरण, हसता हसता रडविणार लेखन, उत्तम दिग्दर्शन, आणि संहितेचा वेग. 

मला वाटतं ह्या जमेच्या गोष्टींनी पारडं जड झाल आणि प्रेक्षकांनीही  तसच कौल दिला. 

जाता जाता केदार शिंदेच एक कौतुक वाटत, त्यानं  टिपरे, अग बाई अरेच्चा, आणि आताचा बाई पण भारी हे मध्यमवर्गी, मध्यममार्गी सरळ  साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून इतके छान सिनेमा / मालिका  बनवल्या आहेत. 
१९९१ ला आलेल्या "माहेरची साडी" ला बायकांनी उचलून घेतले होते आणि २०२३ ला तीस वर्षांनी  "बाई पण भारी.." ला उचलून धरलंय. पण म्हणजेच सासर  माहेर गुंत्यातून कधीच्याच बाहेर पडलेल्या ह्या, आता आत्मनिर्भर होऊन स्वतःच छोट का होईना पण स्वतंत्र विश्व शोधू आणि वसवू पाहतायत अस वाटत ना? 

0