दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग १३
“काल तू जशी त्या पावसात एकटी भिजत होतीस ना… तसं मी एकदा ट्रेकिंगला गेलो होतो... महाबळेश्वरला... तेही एकटाच... आणि तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते... मी ट्रेकिंग करताना तिथेच अडकलो होतो... तेव्हा मला मदतीची खुप गरज होती... पण सोबत मी कोणाला आणलेच नव्हते... त्यापेक्षा अस म्हणालीस तरी चालेल कि मला मित्रच नव्हते... म्हणून मी आपला एकटा दुकटा फिरायचो... पण खरं सांगू तुला... जेव्हा मी अडकलो ना... तेव्हा मला समजलं आयुष्यात आपणास कितीही मजबूत वाटलं, स्वतःला कितीही खंबीर समजत असलो...,
तरीही कधीतरी कुणाच्या तरी मदतीची गरज ही पडतेच... म्हणून तुला काल एकटीला तिथेच सोडून जावं... असं माझ्या मनाला जमलंच नाही...”
गौरवी शांतपणे ऐकत होती... तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच कालच्या भीतीच्या जागी थोडासा विश्वास उमटत होता... कुठलाही प्रश्न न विचारता, कुठलाही हक्क न गाजवता, फक्त माणूस म्हणून उभा राहणारा हा अनोळखी माणूस तिच्या तुटलेल्या मनावर अलगद मलम लावत होता...
त्या क्षणी गौरवीला जाणवलं…
कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करणारे आपलेच असतात,
आणि जखमांवर फुंकर घालणारे पूर्णपणे अनोळखी सुद्धा असतात...
कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करणारे आपलेच असतात,
आणि जखमांवर फुंकर घालणारे पूर्णपणे अनोळखी सुद्धा असतात...
गौरवीने शेवटचा घास गिळला आणि ट्रे बाजूला ठेवला...
तिचे डोळे अजूनही ओले होते, पण आरवच्या बोलण्याने तिच्या मनात एक छोटासा विश्वासाचा बी उगवला होता... तीने हळूच आपल्या पापण्या वर उचलल्या आणि पहिल्यांदाच त्याच्याकडे थेट तीने पाहायला सुरुवात केली...
तिचे डोळे अजूनही ओले होते, पण आरवच्या बोलण्याने तिच्या मनात एक छोटासा विश्वासाचा बी उगवला होता... तीने हळूच आपल्या पापण्या वर उचलल्या आणि पहिल्यांदाच त्याच्याकडे थेट तीने पाहायला सुरुवात केली...
तीने हळूच आपल्या पापण्या वर उचलल्या तेव्हा तीने पहिल्यांदाच थेट आरवकडे पाहिलं...
आणि गौरवीच्या नजरेतून तो वेगळाच भासू लागला...
गौरवीच्या नजरेतून तो क्षण जणू थांबून राहिला होता...
समोर बसलेला तो माणूस..., कालच्या रात्रीचा तोच अनोळखी नव्हता; आज सकाळच्या उजेडात तो वेगळाच भासत होता...
तो कुठलाही नायकासारखा दिमाखदार नव्हता, ना कुठल्या चित्रपटातल्या हिरोसारखा होता...
समोर बसलेला तो माणूस..., कालच्या रात्रीचा तोच अनोळखी नव्हता; आज सकाळच्या उजेडात तो वेगळाच भासत होता...
तो कुठलाही नायकासारखा दिमाखदार नव्हता, ना कुठल्या चित्रपटातल्या हिरोसारखा होता...
तो मध्यम उंचीचा, साधा पण नीटस पोशाख म्हणजे साधे स्वच्छ कपडे घातलेला, काल पावसामुळे थोडे विस्कटलेले केस आता अलगद मागे सारलेले..., कालच्या पावसाची आठवण जपणारी ओल अजूनही त्याच्या चेहऱ्यावर होती... आणि त्याचे डोळे… तेच तिचं लक्ष वेधून घेत होते... गडद, शांत, पण आतून काहीतरी खोल जपणारे...
त्या नजरेत उत्सुकता होती, पण त्यात कुठलाही कुतूहलाचा किंवा अधिकाराचा भाव नव्हता..., फक्त संयम आणि संवेदनशीलता व काळजी होती..., पण दया नव्हती... ; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे... त्याच्या चेहऱ्यावर बनावटी हसू नव्हते..., जणू “तू सुरक्षित आहेस... काळजी करू नकोस...” असं न बोलता सांगणारी ती नजर होती...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा