दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग १४
खरंतर तो तिच्याकडे रोखून पाहत नव्हता... उलट, तिच्या अस्वस्थतेची जाणीव ठेवून अधूनमधून नजर वळवत होता... त्या नजरेत चौकशी नव्हती, कि शंका नव्हती... फक्त तीला , तीच्या भावनांना व तीच्या जखमांना समजून घेण्याचा प्रयत्न होता... त्याचे हात गुडघ्यावर ठेवलेले होते..., शरीर थोडंसं पुढे झुकलेलं होते..., जणू कुठल्याही क्षणी तो उठून मदतीला धावायला तयार असेल...
गौरवीला जाणवलं... हा माणूस बोलण्यापेक्षा ऐकणारा आहे.... स्वतःला पुढे न ढकलता, समोरच्याला जागा देणारा आहे...
काल ज्या नजरेने तिला रस्त्यावर पाहिलं गेलं..., त्या वासनाग्रस्त..., घाणेरड्या नजरेपेक्षा ही नजर कितीतरी वेगळी होती... इथे ती वस्तू नव्हती, संशयित नव्हती..., ती फक्त एक थकलेली स्त्री होती..., आणि तो तिला माणूस म्हणून पाहत होता...
त्या क्षणी तिच्या मनात एक विचार अलगद उमटला...
“हा माझा नातलग नाही, माझा भाऊ नाही किंवा माझा मित्र ही नाही… तरीही, ह्याने मला वाचवले आणि आता स्वतःच्या घरात मला अन्न , वस्त्र आणि निवारा दिला... याच्या डोळ्यात काळजी आणि माणुसकी दिसते..."
“हा माझा नातलग नाही, माझा भाऊ नाही किंवा माझा मित्र ही नाही… तरीही, ह्याने मला वाचवले आणि आता स्वतःच्या घरात मला अन्न , वस्त्र आणि निवारा दिला... याच्या डोळ्यात काळजी आणि माणुसकी दिसते..."
तो समोर बसला होता, थोडा पुढे झुकलेला, जणू तिच्या प्रत्येक हालचालीकडे नकळत लक्ष देत होता... हात गुडघ्यावर ठेवलेले, पण बोटांत हलकीशी अस्वस्थ हालचाल होती...
जणू तोही आतून थोडा गोंधळलेला होता...
त्याच्या आवाजात काल जसा ठामपणा होता, तसाच आजही होता; पण त्यात आता एक मृदुता मिसळली होती...
जणू तोही आतून थोडा गोंधळलेला होता...
त्याच्या आवाजात काल जसा ठामपणा होता, तसाच आजही होता; पण त्यात आता एक मृदुता मिसळली होती...
गौरवीला जाणवलं... हा माणूस तिला पाहत नव्हता, तर समजून घेण्याचा प्रयत्न करत होता... तिच्या वेदनेला प्रश्न न विचारता स्वीकारत होता... तिच्या भूतकाळावर बोट न ठेवता, वर्तमानात तिच्या बाजूला उभा होता...
त्या क्षणी तिला पहिल्यांदाच जाणवलं, आरव म्हणजे फक्त काल रात्री अंधारात, पावसात तिला वाचवणारा माणूस नव्हता…
तो तिच्यासमोर बसलेला, शांतपणे, कुठलाही आग्रह न धरता, नजरेत संयम, वागण्यात आदर,
आणि शांततेतून बोलणारी एक विश्वासाची भाषा घेऊन
फक्त माणूस म्हणून उभा असलेला एक आधार होता...
तो तिच्यासमोर बसलेला, शांतपणे, कुठलाही आग्रह न धरता, नजरेत संयम, वागण्यात आदर,
आणि शांततेतून बोलणारी एक विश्वासाची भाषा घेऊन
फक्त माणूस म्हणून उभा असलेला एक आधार होता...
आणि तिच्या तुटलेल्या विश्वासाच्या अवशेषांत,
त्या कोसळलेल्या भावनांच्या ढिगाऱ्यातून
पहिल्यांदाच आशेचा एक नाजूक, कोवळा कोंब अलगद वर येऊ लागला…
जणू फार दिवसांनी मनात कुणीतरी पाणी शिंपडलं होतं...
त्या कोसळलेल्या भावनांच्या ढिगाऱ्यातून
पहिल्यांदाच आशेचा एक नाजूक, कोवळा कोंब अलगद वर येऊ लागला…
जणू फार दिवसांनी मनात कुणीतरी पाणी शिंपडलं होतं...
ती नजर पुन्हा खाली वळवते,
पण यावेळी ती भितीने झुकलेली नव्हती…
ती नजर होती थोड्या विश्वासाने,
थोड्या सुरक्षिततेच्या जाणिवेने,
आणि फार काळानंतर मिळालेल्या
एका अनोळखी, पण खरी वाटणाऱ्या सुरक्षिततेने…
पण यावेळी ती भितीने झुकलेली नव्हती…
ती नजर होती थोड्या विश्वासाने,
थोड्या सुरक्षिततेच्या जाणिवेने,
आणि फार काळानंतर मिळालेल्या
एका अनोळखी, पण खरी वाटणाऱ्या सुरक्षिततेने…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."