दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २२
गौरवी पुढे निघून गेली होती…
पण तिच्या पाठोपाठ तिच्या शब्दांची प्रतिध्वनी अजूनही कॉलेजच्या आवारात घुमत होती...
पण तिच्या पाठोपाठ तिच्या शब्दांची प्रतिध्वनी अजूनही कॉलेजच्या आवारात घुमत होती...
कॉलेजच्या नोटीस बोर्डजवळ
एक मध्यमवयीन, काटक बांध्याचा माणूस थांबून हे सगळं पाहत होता...
एक मध्यमवयीन, काटक बांध्याचा माणूस थांबून हे सगळं पाहत होता...
डोळ्यांत अनुभव, चेहऱ्यावर शिस्त, आणि नजरेत काहीतरी मोजत असल्यासारखी शांत चौकशी होती...
आणि ते होते... डॉ. देशमुख... कॉलेजचे वाइस प्रिन्सिपल
आणि अँटी-रॅगिंग कमिटीचे प्रमुख...
त्यांनी काही न बोलता गौरवीकडे जाताना पाहिलं…
आणि मग हळूच माधवकडे नजर वळवली...
आणि अँटी-रॅगिंग कमिटीचे प्रमुख...
त्यांनी काही न बोलता गौरवीकडे जाताना पाहिलं…
आणि मग हळूच माधवकडे नजर वळवली...
त्या नजरेत राग नव्हता... पण ती नजर इतकी तीक्ष्ण होती
की माधवच्या पाठीवर एक हलकीशी थंडी शिरली...
की माधवच्या पाठीवर एक हलकीशी थंडी शिरली...
गौरवी एका लांब कॉरिडॉरमधून चालत होती... भिंतींवर जुन्या बॅचचे फोटो, यशाची प्रमाणपत्रं, आणि “शिस्त हीच खरी ओळख” असं लिहिलेलं ब्रीदवाक्य होते...
ती थांबली... त्या वाक्याकडे पाहत हळूच स्वतःशीच पुटपुटली...
“शिस्त जर माणुसकीशिवाय असेल, तर ती फक्त दडपशाही असते…”
“शिस्त जर माणुसकीशिवाय असेल, तर ती फक्त दडपशाही असते…”
तेवढ्यात मागून एक मुलगी धावत धावत गौरवी जवळ आली...
“हे… थांब जरा…”
मागून आलेला आवाज ऐकून गौरवी मागे वळते...
मागून आलेला आवाज ऐकून गौरवी मागे वळते...
तर समोर उभी होती एक साध्या कपड्यातली, थोडी घाबरलेली
पण डोळ्यांत प्रचंड कृतज्ञता असलेली मुलगी...
पण डोळ्यांत प्रचंड कृतज्ञता असलेली मुलगी...
“हाय... मी सायली… FY Arts…”
ती हळू आवाजात म्हणाली...
ती हळू आवाजात म्हणाली...
ती क्षणभर थांबून पुढे म्हणते... " तु भारी नडलीस त्यांना... खुप बरं झालं... नाहीतर नालायकांनी मला पन्नास उठाबशा काढायला लावल्या..."
"काय...? आणि तु काढल्यास सुद्धा...?" गौरवी
"हो तर... पायांचे माझ्या खुळखुळा झाला..." सायली...
"पण एक सांगू... तु जे केलंस ना… ते माझ्यासाठी नाही, पण माझ्यासारख्या खूप जणींसाठी मोठं होतं...”
"पण एक सांगू... तु जे केलंस ना… ते माझ्यासाठी नाही, पण माझ्यासारख्या खूप जणींसाठी मोठं होतं...”
तिचा आवाज थरथरत होता...
“माझ्या बहिणीचं रॅगिंग झालं होतं… तीन महिन्यांत कॉलेज सोडलं तिनं…”
“माझ्या बहिणीचं रॅगिंग झालं होतं… तीन महिन्यांत कॉलेज सोडलं तिनं…”
गौरवी काही बोलत नाही...
फक्त सायलीचं बोलणं शांतपणे ऐकत असते...
फक्त सायलीचं बोलणं शांतपणे ऐकत असते...
सायली आपले डोळे पुसते. “आज पहिल्यांदाच वाटलं…
इथे फक्त डरपोकच नाहीत... तर निडर आणि आवाज उठवणारी सुद्धा कोणीतरी आहे...”
इथे फक्त डरपोकच नाहीत... तर निडर आणि आवाज उठवणारी सुद्धा कोणीतरी आहे...”
गौरवी तिच्या खांद्यावर हलकं हात ठेवते... आणि शांतपणे बोलते...
“डरपोक नाही गं… आपल्याला फक्त शिकवलेलं असतं सहन करा आणि गप्प बसा...”
“डरपोक नाही गं… आपल्याला फक्त शिकवलेलं असतं सहन करा आणि गप्प बसा...”
"हम्म... बरोबर आहे तुझं... गौरवी... आणि मग आपण सहन करत राहतो..." सायली
"ऐ... तुला माझं नाव कसं माहित...?" गौरवी आश्चर्याने विचारते...
"अगं तुच नाही का मघाशी त्या सिनियर विद्यार्थ्यांना आपलं नाव सांगितलेस... तेव्हा तर मी सुद्धा उभी होते तिथे..." सायली...
"अच्छा हो का... सॉरी मला माहित नव्हते... माझं लक्षच नव्हतं कोणाकडे..." गौरवी...
"अगं सॉरी काय बोलतेस यार... आता आपण फ्रेंड आहोत..." सायली असं बोलून चेहऱ्यावर एक स्माईल देत आपला हात पुढे करत म्हणते... "फ्रेंड्स..."
तर गौरवी सुद्धा स्मित हास्य करत आपला हात तिच्या हातात मिळवत म्हणते... " फ्रेंड्स..."
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."