दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २३
माधव कॅन्टीनमध्ये बसला होता... हातात कॉफीचा कप…
पण लक्ष कपात नव्हतं, आणि मन तर अजिबातच तिथे नव्हतं...
पण लक्ष कपात नव्हतं, आणि मन तर अजिबातच तिथे नव्हतं...
कॉफीचा वाफाळता धूर वर जात होता, पण त्याच्या डोळ्यांत फक्त एकच दृश्य घोळत होतं...
सकाळचा तो क्षण… सगळ्यांसमोर झालेला अपमान...
सकाळचा तो क्षण… सगळ्यांसमोर झालेला अपमान...
रोहन खुर्ची मागे टेकवत म्हणाला,
“अरे सोड ना… ती एक फ्रेशरच तर आहे...”
“अरे सोड ना… ती एक फ्रेशरच तर आहे...”
माधव हसला नाही... त्याचा आवाज थंड होता… पण त्या थंड आवातही काहीतरी धोकादायक होतं...
“ती फ्रेशर असेल,”
“ती फ्रेशर असेल,”
तो सावकाश म्हणाला,
“पण आज सकाळी तिनं जो माझा अपमान केला ना…
तो मी मेलो तरी कधीच विसरणार नाही...”
“पण आज सकाळी तिनं जो माझा अपमान केला ना…
तो मी मेलो तरी कधीच विसरणार नाही...”
तो टेबलावर बोटं आपटतो... एक… दोन… तीन.
“आणि तिनं आज जे केलंय ना... ती आता फक्त मुलगी राहिलेली नाही...” तो पुढे झुकतो...
“ती एक उदाहरण बनली आहे...”
“आणि तिनं आज जे केलंय ना... ती आता फक्त मुलगी राहिलेली नाही...” तो पुढे झुकतो...
“ती एक उदाहरण बनली आहे...”
मित्रांच्या चेहऱ्यावरची हसरी भावनाच गायब होते...
“आणि लक्षात ठेवा,”
माधव आवाज आणखी खाली आणतो,
“जेव्हा एखादं उदाहरण आपल्यासाठी धोकादायक ठरू लागतं… तेव्हा ते उदाहरण मोडावंच लागतं...”
“आणि लक्षात ठेवा,”
माधव आवाज आणखी खाली आणतो,
“जेव्हा एखादं उदाहरण आपल्यासाठी धोकादायक ठरू लागतं… तेव्हा ते उदाहरण मोडावंच लागतं...”
कोणीही हसत नाही..., कोणीही काही बोलत नाही...
कॅन्टीन हळूहळू रिकामी होत चालली होती...
हशा, गोंगाट, प्लेट्सचा आवाज सगळं मागे पडत होतं...
हशा, गोंगाट, प्लेट्सचा आवाज सगळं मागे पडत होतं...
पण एका कोपऱ्यात बसलेला माधव अजूनही तसाच होता...
कॉफी थंड झाली होती.... पण त्याच्या मनातला राग
आता उकळायला लागला होता...
कॉफी थंड झाली होती.... पण त्याच्या मनातला राग
आता उकळायला लागला होता...
रोहन हळू आवाजात म्हणाला,
“अरे सोड ना… एक दिवसाचं नाटक आहे... उद्यापर्यंत विसरतील सगळे...”
“अरे सोड ना… एक दिवसाचं नाटक आहे... उद्यापर्यंत विसरतील सगळे...”
माधव कप टेबलावर ठेवतो... डोळे वर करतो... आवाज शांत… पण निर्णायक...
“नाही... ही गोष्ट विसरण्यासारखी नाही...”
“नाही... ही गोष्ट विसरण्यासारखी नाही...”
सगळे गप्प...
तो पुढे म्हणतो...
“आज तिनं फक्त मला नाही, तर आपल्याला सगळ्यांना
सगळ्यांसमोर उघडं पाडलं आहे...”
“आज तिनं फक्त मला नाही, तर आपल्याला सगळ्यांना
सगळ्यांसमोर उघडं पाडलं आहे...”
तो क्षणभर थांबतो.
“आणि असं उघडं पाडणाऱ्यांना फक्त एकच उत्तर दिलं जातं…”
तो हलकंसं हसतो...
“उदाहरण बनवून...”
“आणि असं उघडं पाडणाऱ्यांना फक्त एकच उत्तर दिलं जातं…”
तो हलकंसं हसतो...
“उदाहरण बनवून...”
माधव फोन काढतो..., व्हॉट्सॲप ग्रुप उघडतो...
“Final Year Boys”
“Final Year Boys”
तो टायप करतो...
“FY मध्ये नवीन मुलगी आहे... जास्त शहाणी बनतेय...
सगळं माहिती काढा.... तीचे बॅकग्राउंड, घर, जात, स्कॉलरशिप… सगळं म्हणजे सगळंच शोधून माहिती द्या....”
“FY मध्ये नवीन मुलगी आहे... जास्त शहाणी बनतेय...
सगळं माहिती काढा.... तीचे बॅकग्राउंड, घर, जात, स्कॉलरशिप… सगळं म्हणजे सगळंच शोधून माहिती द्या....”
एकामागोमाग एक रिप्लाय येऊ लागतात...
“तु इतकं सिरीयस का घेतोस एका मुलीला...?”
“तु इतकं सिरीयस का घेतोस एका मुलीला...?”
माधव लगेच उत्तर देतो...
“कारण हिला आज थांबवलं नाही, तर उद्या अजून अश्या दहा उभ्या राहतील...”
“कारण हिला आज थांबवलं नाही, तर उद्या अजून अश्या दहा उभ्या राहतील...”
तो फोन खिशात ठेवत आणि तो उठतो....
“आणि ते… आपल्याला परवडणार नाही.”
असं म्हणत माधव वर्गात निघून जातो...
“आणि ते… आपल्याला परवडणार नाही.”
असं म्हणत माधव वर्गात निघून जातो...
कॅन्टीन रिकामी असते…
पण हवेत एक अदृश्य धोक्याची जाणीव रेंगाळत राहते...
पण हवेत एक अदृश्य धोक्याची जाणीव रेंगाळत राहते...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा