दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २६
रूममधली हवा बदलते... गौरवी पुढे बोलते...
आवाज न चढवता, पण धारदार शब्दात...
“माझ्यावर रॅगिंग करण्याचा तुम्हाला कोणता अधिकार आहे...? आणि तुम्हाला तो अधिकार आधी मुळात कोणी दिला...?
तुम्ही सीनियर आहात म्हणून...? की पुरुष आहात म्हणून...? की समाजाने शिकवलंय... नवीन आलेल्यांना वाकवायचं...?”

माधव चिडतो... आणि तो रागात बोलतो...
“ऐ शहाणे... फार मोठे डायलॉग देऊ नकोस...!
आम्ही काही गुन्हा केलेला नाही...”

गौरवी थेट त्याच्याकडे पाहते...
“गुन्हा... तुम्हाला खरंच या शब्दाचा अर्थ तरी कळतो का...?"

"अच्छा तुला कळतो तर तुच सांग ना समजावून...?" माधव हसत बोलतो...
"गुन्हा म्हणजे फक्त मारहाण करणं नसतं..., किंवा कोणाचा खुन करणं नसतं..., किंवा फक्त शारीरिक इजा पोहचवणे म्हणजेच गुन्हा नसतो... तर एखाद्याला घाबरवणं..., काहीतरी कृत्यं किंवा अपशब्द उच्चारुन मान खाली घालायला लावणं..., स्वतःच्या अस्तित्वावर शंका घ्यायला लावणं..., आणि हळूहळू त्याचं मानसिक खच्चीकरण करणं... हा सुद्धा गुन्हाच असतो...
मानसिक त्रास देणं..., आणि त्या छळामुळे ती व्यक्ती आत्महत्येसारखा विचार करायला लागली, किंवा तसं टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त झाली, तर तेव्हा ती आत्महत्या नसते… तो केलेला खून असतो... आणि तर तोसुद्धा एक गंभीर गुन्हाच असतो...”
एवढं बोलून गौरवी शांतपणे आपल्या खुर्चीत बसते...

महिला प्राध्यापिकेच्या चेहऱ्यावर एक समाधानाची झळक स्पष्ट दिसते... व त्या शिक्षिका मान डोलावतात...
तेवढ्यात सायली पुढे येते... आणि आता ती पहिल्यासारखी घाबरत नाही... तर ती सुद्धा ताठ मानेने उभी राहून आपली तक्रार नोंदवते...
“सर… माझ्याकडून यांनी पन्नास उठाबशा काढून घेतल्या... सर एक दिड महिन्यापूर्वी गावाला एक छोटंसं ॲक्सिडेंट झाला होता माझा... मी पडले होते आणि पायाचं हाड थोडंसं क्रॅक झाले होते... आणि माझ्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते... जे आता काही दिवसांपूर्वीच काढून टाकले... मी यांना माझी परिस्थिती सांगितली..., मी रडले… हात जोडले... पण कोणी ऐकलं नाही... आणि मला पन्नास उठाबशा काढायला लावल्या... आणि आता माझा पाय थोडा दुखत आहे... मी तर उद्यापासून कॉलेजला येणारच नव्हते... पण आज गौरवीलि पाहिले..., ती उभी राहिली म्हणून मी इथे उभी आहे...”

डॉ. देशमुख टेबलावर हलकं हात ठेवतात.
“बस...”
“बस...”
ते माधवकडे पाहतात...
“तू म्हणतोस परंपरा...?
परंपरा ती जी माणुसकी जपते..., आणि जी अपमान शिकवते ती परंपरा नाही, तर ती विकृती आहे... आत्ता पर्यंत तुमची कधी कोणी तक्रार केली नाही... म्हणूनच तुम्ही आजपावेतो सुटलेले होते... पण आज कोणीतरी हिम्मत दाखवली... आणि आज तुम्ही बरोबर तावडीत सापडलात..."

प्रिन्सिपल निर्णय जाहीर करतात...
“माधव आणि त्याचे साथीदार तात्काळ सस्पेंड केले जात आहेत... आणि एकही ‘फ्रेशर’ या कॉलेजमध्ये घाबरून शिकायला येणार नाही... याची जबाबदारी आता आमची...”

माधव सुन्न होतो... तर गौरवी मात्र त्या खोलीतून शांत बाहेर पडते...
बाहेर पडताना ती आंबेडकरांच्या फोटोखाली थांबते... आणि हळूच पुटपुटते...
“आज फक्त रॅगिंग नाही थांबलं… आज एका मुलीचा आवाज
कायदेशीर झाला...”

सायली तिचा हात घट्ट पकडते... कॉरिडॉरमध्ये उभे असलेले विद्यार्थी पहिल्यांदाच टाळ्या वाजवत नाहीत… तर ते आदराने त्या दोघींकडे पाहतात...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा