दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २९
माधवचे बोलणं ऐकून गौरवी शांत बसते...
तीला असं शांतपणे उभी असलेली पाहून माधव आपल्या बाईकवर बसतो... आणि म्हणतो...
"मान्य आहे मी चुकीचा वागलो... पण मी नीच वृत्तीचा मुलगा नाही... कि एखाद्या मुलीचं आयुष्य तीच्या मनाविरुद्ध उद्ध्वस्त करायला..." असं बोलून माधव कॉलेजच्या आवारात गाडी घेऊन गेला... आणि ती पार्क करून तो आपल्या वर्गात निघून गेला... आणि गौरवी शांतपणे त्याच्याकडे बघत बसली...

संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर....
माधव खाली मान घालून आपल्या बाईकजवळ येतो... तेव्हा बाईकच्या शेजारी त्याला गौरवी उभी असलेली दिसते...
तेव्हा माधव आपल्या गाडीला चावी लावत विचारतो...
"आता काय झालं...? आणि तु माझ्या गाडीजवळ उभी राहून काय करत आहेस...?"
"आता काय झालं...? आणि तु माझ्या गाडीजवळ उभी राहून काय करत आहेस...?"
" तुला काय मी भावना नसलेली वाटते का...? आणि मी इतकी काही वाईट नाही... जसं तु समजतोस ते... आणि कोणतीही मुलगी... अशी पहिल्यांदाच अनोळखी मुलासोबत कुठे ही कशी काय जाईल...? एवढं सुद्धा तुला कळत नाही..." गौरवी तिथेच उभी राहून बोलते...
"आपण अनोळखी कुठे आहोत...? एका आठवड्यापुर्वी तर आपली ओळख झाली होती की..." माधव गाडी स्टार्ट करत बोलतो...
"हो... बरोबर आहे... पण त्यादिवशी जे झाले त्यावरून मी तुझ्यावर विश्वास ठेवून कशी काय तुझ्यासोबत लगेचच येऊ शकते... याचा पण तु थोडातरी विचार करायला हवा ना..." गौरवी शांतपणे बोलते...
माधव एक खोल श्वास घेतो आणि बोलू लागतो...
“ठीक आहे…
जर तुला माझ्यावर विश्वास नसेल, तर तू माझ्यासोबत येऊ नकोस...”
तो क्षणभर थांबतो...
“ठीक आहे…
जर तुला माझ्यावर विश्वास नसेल, तर तू माझ्यासोबत येऊ नकोस...”
तो क्षणभर थांबतो...
“मला खरं तर त्या दिवशीच्या रॅगिंगबद्दलच बोलायचं होतं…
पण नाही… ठिक आहे... चालेल मला… मी इथेच बोलतो...”
त्याचा आवाज आता आक्रमक नसतो… तो आवाज थोडा खालावलेला, आणि थोडा अपराधी असतो...
पण नाही… ठिक आहे... चालेल मला… मी इथेच बोलतो...”
त्याचा आवाज आता आक्रमक नसतो… तो आवाज थोडा खालावलेला, आणि थोडा अपराधी असतो...
“त्या दिवशी जे काही घडलं…
त्या सगळ्या कृतींसाठी मी मनापासून माफी मागतो...”
तो नजर खाली घालतो...
त्या सगळ्या कृतींसाठी मी मनापासून माफी मागतो...”
तो नजर खाली घालतो...
“मी चुकीचं करत होतो, हे आता मला मान्य आहे...
मी काही वाईट माणूस नाही आहे… पण मी फार बेफिकीर होतो...”
मी काही वाईट माणूस नाही आहे… पण मी फार बेफिकीर होतो...”
तो थोडा वेळ गप्प राहतो… मग पुढे म्हणतो...
“मी ते सगळं ‘मजा’ म्हणून करत होतो…
पण माझ्या त्या मजेमुळे कुणाला किती मानसिक त्रास होत होता, याचा विचारच मी कधीच केला नाही...”
“मी ते सगळं ‘मजा’ म्हणून करत होतो…
पण माझ्या त्या मजेमुळे कुणाला किती मानसिक त्रास होत होता, याचा विचारच मी कधीच केला नाही...”
तो नजर वर करतो… आणि गौरवीकडे थेट पाहत म्हणतो...
“तू मला ती जाणीव करून दिलीस... तु मला माझी चुक दाखवून दिलीस... त्यामुळे मी आज बचावलो...
आणि खरं सांगायचं तर… तुझ्यामुळेच मी आज तुरुंगात जाण्यापासून वाचलो...”
“तू मला ती जाणीव करून दिलीस... तु मला माझी चुक दाखवून दिलीस... त्यामुळे मी आज बचावलो...
आणि खरं सांगायचं तर… तुझ्यामुळेच मी आज तुरुंगात जाण्यापासून वाचलो...”
त्याचा आवाज थरथरतो...
“नाहीतर आज माझं आयुष्य, माझं करिअर… सगळं एका चुकीमुळे संपलं असतं...”
तो शेवटी फक्त एवढंच म्हणतो...
“धन्यवाद… आणि खरंच… मनापासून माफी मागतो...” आणि तो हात जोडतो...
“नाहीतर आज माझं आयुष्य, माझं करिअर… सगळं एका चुकीमुळे संपलं असतं...”
तो शेवटी फक्त एवढंच म्हणतो...
“धन्यवाद… आणि खरंच… मनापासून माफी मागतो...” आणि तो हात जोडतो...
त्याला असं हात जोडताना पाहून गौरवी सुद्धा क्षणभर थबकली…
तिच्या डोळ्यांसमोर त्यादिवशीचा अपमान, भीती, संताप सगळं एकाच वेळी उभं राहिलं...
पण त्याचबरोबर तिला पहिल्यांदाच हेही जाणवलं की
समोर उभा असलेला हा माणूस आज माफी मागतोय…
भीतीपोटी नाही, तर जाणीवेपोटी...
समोर उभा असलेला हा माणूस आज माफी मागतोय…
भीतीपोटी नाही, तर जाणीवेपोटी...
तिने हात जोडले नाहीत…
ती पुढेही झुकली नाही…
पण तिच्या नजरेतला कठोरपणा थोडासा मऊ झाला...
ती पुढेही झुकली नाही…
पण तिच्या नजरेतला कठोरपणा थोडासा मऊ झाला...
क्षणभर शांतपणे उभी राहून ती इतकंच म्हणाली...
“माफी मागणं महत्त्वाचं आहे…
पण पुन्हा ती चूक न करणं, त्याहूनही महत्त्वाचं...”
“माफी मागणं महत्त्वाचं आहे…
पण पुन्हा ती चूक न करणं, त्याहूनही महत्त्वाचं...”
आणि कोणताही विजयाचा आव न आणता,
ताठ मानेने ती तिथून निघून गेली…
कारण तिला माफ करवून घेत नव्हतं जिंकायचं,
तर तिला बदल सुरू होताना पाहायचा होता...
ताठ मानेने ती तिथून निघून गेली…
कारण तिला माफ करवून घेत नव्हतं जिंकायचं,
तर तिला बदल सुरू होताना पाहायचा होता...
जो तिला आज माधवमध्ये बदल घडताना दिसला...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा