दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ३१
कॅफे…
संध्याकाळची वेळ कॅफेत मंद प्रकाश, हलकंसं संगीत, आणि खिडकीतून दिसणारी संध्याकाळची दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेली मुंबई…
माधव आणि गौरवी एकमेकांच्या समोरासमोर बसले होते...
माधव वेटरला ऑर्डर देतो... आणि वेटर शांतपणे येतो, कॉफीचे भरलेले दोन्ही कप टेबलवर ठेवतो आणि काही न बोलता एक स्माईल देऊन मान खाली घालून निघून जातो...
माधवच्या आणि गौरवीच्या टेबलावर क्षणभर शांतता पसरते...
टेबलवर ठेवलेले दोन कपातून कॉफीचा वाफाळता सुगंध
आणि त्या सुगंधात मिसळलेली दोघांच्या मनातली न सांगितलेली धडधड…, तळमळ..., तडफड..., कॉफीपेक्षा जास्त उकळत होती...
आणि त्या सुगंधात मिसळलेली दोघांच्या मनातली न सांगितलेली धडधड…, तळमळ..., तडफड..., कॉफीपेक्षा जास्त उकळत होती...
ती नजर, तो थांबलेला श्वास, आणि तो क्षण... जो काहीतरी याक्षणी बदलणार होता...
माधव आपल्या जागेवरुन हळूच उठतो...
आणि गौरवी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहते...
तो तिच्या समोर येतो… आणि अचानक... एका पायावर खाली गुडघ्यावर बसतो...
कॅफेतला आवाज जणू क्षणभर थांबतो...
आणि गौरवी आश्चर्याने..., विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे बघते...
त्याच्या उजव्या हाताच्या दोन बोटांत एक साधी, पण भावनेच्या, प्रेमाच्या अर्थाने ओथोंबून भरलेली अंगठी असते...
तो ती अंगठी तिच्यासमोर धरतो... त्याचा आवाज थोडासा थरथरतो..., पण त्याच्या डोळ्यात मात्र विलक्षण ठामपणा असतो...
तो न अडखळता... व न घाबरता... आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो...
“गौरवी… मी तुला वचन देऊ शकत नाही की आयुष्य नेहमीच सोपं असेल… पण एवढं नक्की सांगू शकतो की प्रत्येक कठीण क्षणात... मी तुझ्या बाजूला उभा असेन... तू माझ्यासाठी फक्त प्रेम नाहीस… तर तु माझा निर्णय आहेस... माझं आयुष्य आहेस... सांग तु माझ्यासोबत आयुष्य चालशील का…? सांग तु माझी बायको होशील का…?”

गौरवीच्या हातातून कॉफीचा कप थरथरतो... आणि तीचे डोळे पाणावतात...
तीचे ओठ काही बोलायला तयारच होत नाहीत...
तीचे ओठ काही बोलायला तयारच होत नाहीत...
तो क्षण...
जिथे तिच्या कॉलेजच्या भूतकाळाचं दुःख, तिच्या जखमा,
तिची भीती, आणि माधववर तीचा जडलेला जीव... सगळं सगळं काही त्या अंगठीत गुंफलं गेलं होतं...
जिथे तिच्या कॉलेजच्या भूतकाळाचं दुःख, तिच्या जखमा,
तिची भीती, आणि माधववर तीचा जडलेला जीव... सगळं सगळं काही त्या अंगठीत गुंफलं गेलं होतं...
ती हळूच होकारार्थी मान हलवते…
आणि अश्रूंमधून उमटतं एक शब्द उच्चारते...
“हो…”
आणि अश्रूंमधून उमटतं एक शब्द उच्चारते...
“हो…”
माधव आनंदाने तिच्या डाव्या हातातील एका (मरंगळी) बोटात अंगठी घालतो....
तेव्हा कॅफेत सर्वत्र टाळ्यांचा हलका आवाज होतो...
पण त्यांच्या दोघांसाठी तो आवाज महत्त्वाचा नव्हता…
कारण त्या क्षणी दोन प्रेमात घायाळ झालेली, प्रेम जखमी माणसं एकमेकांसाठी एकत्र कुटुंब , आपल्या भविष्यातील घर होण्याचा निर्णय घेत होती…
कारण त्या क्षणी दोन प्रेमात घायाळ झालेली, प्रेम जखमी माणसं एकमेकांसाठी एकत्र कुटुंब , आपल्या भविष्यातील घर होण्याचा निर्णय घेत होती…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा