Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३६

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३६



"हॅलो... गौरवी मी घरी बोललो आपल्या लग्नाचं आणि त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी सुद्धा दिली आहे..." माधव फोनवरून बोलतो...

"काय...? खुप आनंदाची बातमी दिलीस तु... मला तर आभाळ सुद्धा ठेंगणे वाटू लागले... पण एक प्रोब्लेम आहे... मी कशी काय माझ्या घरी सांगू...? आय मीन... म्हणजे मी मुलगी आहे तर घरी कशी बोलू स्वतःच्या लग्नाविषयी....? म्हणजे मी काय बोलते आहे ते तुला समजलं का...?" गौरवी

"हो... समजलं तुझं मन, तुझी परिस्थिती... मी उद्याच येतो... माझ्या आईला घेऊन... तुझ्या घरी... तुझा हात मागायला... तु काळजी करु नकोस... आणि आता आपण एकत्र राहू कायमचं..." माधव

"हो... असंच होऊ दे..." गौरवी

"असंच होईल... तु नकोस लोड घेऊ... आपण आता एकमेकांपासून कधीच दूर नाही राहणार..." माधव

"ठिक आहे... मी उद्या वाट पाहीन तुझी... लवकर ये पण..." गौरवी

"हो... येईल मी लवकर...

"आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे..." गौरवी

"बोल बेटा..." गौरवीचे वडील...

"आईबाबा... कसं सांगू...? माझंच मला कळत नाही..." गौरवी

"बोल बेटा... न घाबरता बोल..." वडील

"बाबा तुम्हाला भेटायला उद्या कोणीतरी येणार आहेत..." गौरवी

"कोण येणार आहेत...?" गौरवीचे वडील...

"कळेलच उद्या..." गौरवी

"तुझी मावशी येणार आहे का...?" गौरवीची आई

"नाही.." गौरवी

"मग तुझी आत्या येणार आहे का...?" गौरवीची आई

"नाही ग आई... ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच उद्या..." गौरवी

"ते उद्या बिद्याच सांगत बसू नकोस...  सरळ सरळ सांग... कोण येणार आहेत ते..." गौरवीची आई

गौरवी थोडीशी गडबडते… हाताची बोटं एकमेकांत गुंफते…
क्षणभर खाली पाहते… आणि मग धीर एकवटून म्हणते…
“आई… बाबा… उद्या… माझ्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी कोणीतरी येणार आहेत…”

हे गौरवीचे शब्द ऐकून तीचे आई-वडील एकमेकांकडे पाहतात…

वडिलांच्या नजरेत काळजी, तर आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते…

“निर्णय…?” वडील हळू आवाजात विचारतात...
“कशाबद्दल निर्णय...?”

गौरवीचा आवाज थरथरतो… पण शब्द ठाम असतात…
“माझ्या लग्नाबद्दल…”

क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरते…
भिंतीवरचं घड्याळसुद्धा मोठ्याने चालल्यासारखं वाटतं…

आई आश्चर्याने प्रश्नांची सरबत्ती करून म्हणते,
“लग्न…? इतक्या लवकर…? आणि ते ठरवणार...? मग आम्ही कोण...? आमचा अधिकार नाही का...? आणि तुला लग्नाची एवढी घाई का झाली आहे...? आणि अजून तुझं शिक्षण बाकी आहे… आणि तुझं मध्येच लग्नाचं कसं काय...?”



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all