Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३८

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३८


घरात पुन्हा शांतता पसरते…
आईचा आवाज थोडा नरम होतो, पण अजूनही तणाव आहे…
“पण समाज काय म्हणेल…? लोक काय बोलतील…?”

गौरवी हलकेच हसते… पण त्या हसण्यात वेदना असते…
“आई… लोक नेहमीच काहीतरी बोलतात… मी शिकले तरी…
आणि मी शिकली नाही तरीही…”

वडील खोल श्वास घेतात…
“ठीक आहे… उद्या येऊ दे त्यांना…”

आई आश्चर्याने वडिलांकडे पाहते…
“अहो…!”

“आधी ऐकूया…” वडील शांतपणे म्हणतात…
“मुलगा काय विचारांचा आहे ते पाहूया… आपली मुलगी मूर्ख नाही... ती धीराने बोललीय…”

गौरवीचे डोळे पाणावतात… ती काही बोलत नाही…
फक्त हळूच मान झुकवते… त्या क्षणी तिला जाणवतं...
ही परवानगी नाही… पण नकारही नाही… आणि कधी कधी…
तेवढंच खूप असतं…

गौरवीची आई थोडीशी नरम होत विचारते,
“नाव काय आहे त्याचं…?”

गौरवीच्या ओठांवर हलकंसं हसू येतं… आणि डोळ्यांत आशा चमकते…
“माधव…”

पुन्हा एक क्षणभर शांतता पसरते… पण यावेळी ती शांतता प्रश्नांची नसून एका नव्या वळणाची जाणीव करून देणारी असते…

वडील हळूच म्हणतात,
“ठीक आहे… उद्या येऊ दे त्याला… आपण ऐकून घेऊया… आणि मग काय ते ठरवूया...”

गौरवीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी येतं… ती पुढे येऊन वडिलांचा हात धरते… आणि त्यांना म्हणते...
“धन्यवाद बाबा…”

आणि त्या क्षणी तिला जाणवतं...  लढाई अजून संपलेली नाही,
पण पहिलं पाऊल मात्र आज घरातूनच पुढे टाकलं गेलं आहे…

दुसऱ्या दिवशी...

गौरीवीच्या दारावरची बेल वाजते…

गौरवीच्या आईचा हात काम करत असताना थांबतो… आणि
वडील घरात पेपर वाचत बसलेले असतात... आणि गौरवीचा भाऊ टिव्ही बघत बसलेला असतो... तो जाऊन उठून दार उघडतो…

तर समोर उभा असतो... माधव...
साधा शर्ट, पँट… आणि डोळ्यांत आत्मविश्वास… पण चेहऱ्यावर मात्र थोडा तणाव असतो…

माधवला पाहताच गौरवीचा भाऊ आपल्या वडिलांना आवाज देतो...
"बाबा... कोणीतरी आलं आहे...?"

"कोण आहे...?" गौरवीचे वडील...

"तु सुजय आहेस ना...? गौरवीचा छोटा भाऊ...?" माधव

"हो... पण तुला कसं‌ माहित...?" गौरवीचा भाऊ गोंधळून विचारतो...

तेवढ्यात पुन्हा गौरवीचे वडील विचारतात...
"सुजय... कोण आलं आहे रे...?"

तेव्हा माधव दारातून हात जोडून बोलतो...
“नमस्कार काका…”

गौरवीचे वडील क्षणभर थबकतात… आणि आपल्या जागेवरुन उठत त्याला विचारतात...
“तू…?”



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all