दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ४०
घरात फक्त एक प्रश्न उरतो... जात मोठी की माणूस…?
आणि गौरवी… दाराआड उभी… सगळं ऐकत असते…
डोळ्यांत पाणी… पण मान मात्र ताठ…
माधव दाराबाहेर जातो… दार बंद होतं… त्या आवाजासोबतच
गौरवीच्या संयमाचं दारही तुटतं…
गौरवीच्या संयमाचं दारही तुटतं…
ती खोलीतून बाहेर येते… तीचे डोळे लाल झालेले असतात…
ती आपल्या आईवडिलांना जाब विचारण्यास सुरुवात करते... तेव्हा तीचा आवाज थरथरत नाही, तर जळत असतो…
“आई… बाबा… तुम्ही असं का केलं…? का त्याला नकार दिला…?”

ती पुढे येते… आणि पुन्हा बोलते
“तो माझ्यावर प्रेम करतो… खरंखुरं… तेही कोणत्याही स्वार्थाशिवाय… तो मला सांभाळून घेईल… माझ्या स्वप्नांना थांबवणार नाही… तो माझ्या शिक्षणाला अडथळा ठरणार नाही…”
तीचा आवाज आता फुटतो…
“तो आपल्या घरच्यांना समजावून सांगेल… मी सुद्धा प्रयत्न करत राहीन… हळूहळू का होईना… ते मला स्वीकारतील…”
असं बोलून ती खरंच आपल्या आईवडिलांसमोर… हात जोडत बोलते...
“मला खात्री आहे आई… प्लीज… लग्नाला नकार देऊ नका… मी हात जोडते…”

तीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात… पण तीचा आवाज अजूनही ठाम असतो…
आणि तीच्या आईचा चेहरा कठोर होतो… आवाजात वेदनेसोबत राग मिसळतो…
“तुला कळतंय का तु काय मूर्खासारखं बोलतेयस ते…? त्याची आई आली नाही याचा अर्थ तुला कळतोय का…?”

गौरवीची आई गौरवीच्या थोडी जवळ येते…
“ती लोकं जातीयवादी आहेत… आणि हे मी तुला मुद्दामहुन किंवा विनाकारण सांगत नाही आहे... तर अनुभवातून सांगतेय… ते तुला कधीच स्वीकारणार नाहीत…"

गोरवीच्या आईचा आवाज आता जड होतो…
“ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे गं… जी कधीच पुसली जात नाही… आणि खरी गोष्ट सांगू…? ती पुसण्याचा प्रयत्न
कोणी करतही नाही…”

गौरवीचे वडील जे आतापर्यंत गप्प असतात… ते सुद्धा
आता बोलू लाडतात…
“प्रेमावर संसार चालत नाही बाळा… उच्च समाज तुझ्यावर रोज न्यायाधीशासारखा बसेल… आणि सगळ्यात आधी
तुझ्या जातीकडे बोट दाखवेल…”

गौरवी डोळे पुसते… आणि पहिल्यांदाच आवाजात वेदनेऐवजी प्रश्न असतो…
“मग माझा काय गुन्हा आहे बाबा…? मी कोणत्या घरात जन्म घ्यावा हे मी ठरवलं होतं का…?”

घरात शांतता पसरते…
ती आपल्या आईला म्हणते...
"त्या काळ्या दगडावरची रेघ पुसण्याचे काम माधव करतोय तरीही तुम्हाला ते नकोय..."

शेवटी ती म्हणते…
“जर प्रेम करूनही मी अपवित्र ठरणार असेन… तर मग या समाजात शुद्ध काय उरलंय…?”

आईवडील निरुत्तर… आणि गौरवी आपल्या बेडरूममध्ये निघून जाते... कारण ती आता तुटलेली आहे… पण हरलेली मात्र नाही…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."