Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५५

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५५


आरव थोडा थांबतो… जणू शब्दांची जुळवाजुळव करून घेतो
आणि मग हळू पण ठाम आवाजात बोलतो…
"पण एवढं सगळं बदलून सुद्धा... माणसाची मानसिकता अजूनही बदललेली नाही... विज्ञान पुढे धावत आहे...
पण समाज अजूनही मागे ओढत आहे...
आजही माणसांची किंमत त्याच्या विचारांनी नाही तर त्याच्या जन्माने ठरवली जाते... जात बदलता येत नाही... पण  म्हणून माणूस विचार बदलत नाही का...? कि माणूस बदलायलाच तयार नाही...?"

आरव थोडावेळ थांबून पुन्हा बोलतो...

“एवढं सगळं पुढे गेलंय... पण आपण अजूनही माणसाला माणसाच्या जातीवर मोजतोय… विज्ञानाने आपल्याला चंद्रापर्यंत नेलं… पण समाजाने अजूनही काही लोकांना
उंबरठ्यापलीकडेच थांबवलं आहे…”

आरव गौरवीकडे सरळ पाहत म्हणतो...
"गौरवी तुझ्या आयुष्यात जे घडलं... ते तुझं अपयश नाही... तर तो समाजाचा पराभव आहे..."

तो गौरवीकडे पाहत म्हणतो…
त्या नजरेत कुतूहल नाही… दया नाही… फक्त आदर असतो…
“तुझा गुन्हा काय आहे माहितेय का…?”

तो थोडा थांबून म्हणतो…
“तू वेगळी आहेस… आणि समाजाला वेगळेपण सहन होत नाही…”

गौरवीची मान अजूनही खालीच असते…
पण डोळ्यांत पहिल्यांदाच अपराधभाव नाही… फक्त खोल थकवा असतो… जो सतत विचार करून थकला होता...

“लोक म्हणतात काळ बदललाय…”
आरव पुढे म्हणतो…
“पण सत्य हे आहे की काळ बदललाय, पण बुरसटलेले विचार नाही…”

त्याचा आवाज ठाम असतो... पण सहानुभूती भरलेला असतो...
"तु कमजोर नाही... तर तुला कमजोर केले गेले... आणि तरीही तु उभी आहेस... हेच तुझं बळ आहे...

खोलीत पुन्हा शांतता पसरते… पण ती शांतता बोचरी नसते…
ती जखमेवर हात ठेवणारी..., मलम लावणारी... , आणि हळूवारपणे फुंकर घालणारी असते… आणि त्या क्षणी
गौरवीला पहिल्यांदाच असं वाटतं... कोणी तरी आहे
जो तिची जात नाही… तर तिचं दुःख पाहतोय…

“गौरवी… तु असा विचार करु नकोस कि इथे या घरात एका परपुरुषासोबत कशी राहू...? तर मी तुला आधीच सांगतोय... इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस… इथे तुला कसलाही त्रास होणार नाही... आणि तुझं मन जितके दिवस म्हणेल, तितके दिवस तू इथे राहू शकतेस… तुझ्यावर कुठलीही अट ठेवली जाणार नाही… किंवा कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही… आणि काळजी करू नकोस…
माझी मोठी बहीण पुढच्या आठवड्यात पुण्याहून इथे येणार आहे… ती खूप समजूतदार आणि चांगली आहे…
तुझी आणि तिची भेट झाली की तुला एक मैत्रीण मिळेल…"


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all