दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ५८
बाल्कनीत बसून चहा पिता पिता आरव गौरवीला विचारतो...
"तु पुढे काय करायचे ठरवले आहेस...?"
"तु पुढे काय करायचे ठरवले आहेस...?"
"मला नाही माहित... पण मी माधवशी एकदा बोलून बघते... मला पुर्ण विश्वास आहे की तो मला समजून घेईल..." गौरवी
"मग त्या दिवशी का नाही त्याने समजून घेतले तुला...?" आरव
"त्यादिवशी तो... रागात होता... त्याला जे दिसलं तेव्हा त्याने तसं रिऍक्ट केले... यात त्यांची चुक नाही..." गौरव
"मला नाही वाटत तसं... पण असो... तु कर मग फोन... आणि बोलून बघ... काय म्हणतोय ते..." माधव...
गौरवी आपल्या मोबाईलवर माधवला फोन लावते पण माधव फोन काही उचलत नाही...
म्हणून गौरवी पुन्हा दोन तीन वेळा फोन लावते... पण माधव तेव्हासुद्धा तीचा फोन उचलत नाही...
म्हणून गौरवी पुन्हा दोन तीन वेळा फोन लावते... पण माधव तेव्हासुद्धा तीचा फोन उचलत नाही...
हे पाहून आरव त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही...
तेव्हा तो गौरवीला म्हणतो... तु तुझ्या आईवडिलांना एकदा फोन कर... त्यांच्याशी बोल... ते तुला नक्कीच समजून घेतील...
यावर गौरवी नकारार्थी मान हलवत बोलते...
"कोणत्या तोंडाने फोन करु...? मी जे माझ्या आईवडिलांशी ज्या पद्धतीने वागले... ते योग्य नव्हते... मी माधवसाठी त्यांचा विचार केला नाही... आणि त्यांना तसंच मागे टाकून आले... आणि माधवच्या आईने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, मला चारित्र्यहीन स्त्री म्हटले... तेव्हा माधवने एकदा सुद्धा मला माझं काहीच एकून घेतले नाही..., कि कोणतीही शहानिशा केली नाही... उलट आपल्या आई व बहिणीच्या सांगण्यावरून मला घरा बाहेर काढले..."

गौरवीचं बोलणं तिथेच थांबतं… शब्द संपतात… पण श्वास मात्र जड होतो…
तिचे डोळे चहाच्या कपात स्थिरावतात… जणू त्या कपातच
तिचं अख्खं आयुष्य उतरलेलं असतं…
तिचं अख्खं आयुष्य उतरलेलं असतं…
“मी चुकीचीच होते आरव…”
ती हळूच म्हणते…
“आईबाबांना सोडून गेले… आणि ज्या माणसासाठी सगळं केलं
त्याने मला ऐकून घ्यायलाही थांबविले सुद्धा नाही…”
ती हळूच म्हणते…
“आईबाबांना सोडून गेले… आणि ज्या माणसासाठी सगळं केलं
त्याने मला ऐकून घ्यायलाही थांबविले सुद्धा नाही…”
क्षणभर शांतता पसरते…
आरव काहीही लगेच बोलत नाही… तो फक्त तिच्या बाजूला जाऊन बसतो… ते सुद्धा थोडासा पुढे झुकून… जसं कुणी कोसळणाऱ्या माणसाला आपल्या सावलीत घेतं तसं…
आरव काहीही लगेच बोलत नाही… तो फक्त तिच्या बाजूला जाऊन बसतो… ते सुद्धा थोडासा पुढे झुकून… जसं कुणी कोसळणाऱ्या माणसाला आपल्या सावलीत घेतं तसं…
“गौरवी…”
तो शांत, ठाम आवाजात म्हणतो…
“तू जे केलंस ते प्रेमातून केलंस… आणि प्रेमात माणूस चुकतो…
पण त्यासाठी त्याला शिक्षा मिळावी असं कुठे लिहिलेलं नाही…”
तो शांत, ठाम आवाजात म्हणतो…
“तू जे केलंस ते प्रेमातून केलंस… आणि प्रेमात माणूस चुकतो…
पण त्यासाठी त्याला शिक्षा मिळावी असं कुठे लिहिलेलं नाही…”
ती मान खाली घालते…
“आईबाबांना फोन करणं तुला अवघड वाटत असेल
हे मला कळतं…”
आरव पुढे म्हणतो…
“पण एक गोष्ट लक्षात ठेव आईवडिलांचं मन दुखावलं जातं
पण ते मुलांसाठी कायमचं तुटलं जात नाही…”
हे मला कळतं…”
आरव पुढे म्हणतो…
“पण एक गोष्ट लक्षात ठेव आईवडिलांचं मन दुखावलं जातं
पण ते मुलांसाठी कायमचं तुटलं जात नाही…”
गौरवीचे डोळे पाणावतात…
“कदाचित आज नाही…”
आरव हलकंसं हसत म्हणतो…
“कदाचित उद्या नाही… पण कधीतरी तू त्यांच्याशी बोललीस पाहिजेस…”
“कदाचित आज नाही…”
आरव हलकंसं हसत म्हणतो…
“कदाचित उद्या नाही… पण कधीतरी तू त्यांच्याशी बोललीस पाहिजेस…”
ती हळूच विचारते…
“आणि माधव…?”
“आणि माधव…?”
आरव थोडा थांबतो… मग म्हणतो…
“तो जर खरंच तुला समजून घेणारा असेल... आणि तुझ्यावर खरोखरच प्रेम करणारा असेल... तर तो स्वतः तुझ्याकडे येईल... आणि तुझ्याशी बोलेल… पण जर तसं काही नसेल किंवा घडत नसेल तर तू त्याच्याशी पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही…”

गौरवी पहिल्यांदाच
आरवकडे नीट पाहते… त्या नजरेत ना सहानुभूती असते...
ना उपकाराची भावना… फक्त माणुसकी असते…
आरवकडे नीट पाहते… त्या नजरेत ना सहानुभूती असते...
ना उपकाराची भावना… फक्त माणुसकी असते…
बाल्कनीत संध्याकाळ उतरते… चहा थंड होत जातो…
पण गौरवीच्या मनात पहिल्यांदाच थोडंसं हलकं वाटू लागतं… कारण आज कोणी तिला दोष देत नव्हतं…
फक्त समजून घेत होतं…
पण गौरवीच्या मनात पहिल्यांदाच थोडंसं हलकं वाटू लागतं… कारण आज कोणी तिला दोष देत नव्हतं…
फक्त समजून घेत होतं…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा