" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद लेखन
भेटीची ओढ... भाग १
©® एकता माने
सकाळी उठल्यापासूनच एकांशीच्या मनात एक वेगळाच आनंद भरून आला होता. गेले सहा महिने ती आणि निखिल फक्त फोनवर बोलत होते. कधी मेसेज, कधी व्हिडिओ कॉल, तर कधी छोट्या छोट्या रुसव्यांतून त्यांनी दिवस काढले होते; पण आजचा दिवस वेगळा होता. आज ती त्याला प्रत्यक्ष भेटणार होती.
खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याबरोबर तिच्या मनात आठवणींचा गुंता उलगडत होता. कितीदा त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला होता; पण वेळ, अंतर आणि दोघांचे काम यामुळे काहीच जमत नव्हते. एकांशीने आरशात पाहिलं.
हलकं स्मित करत ती स्वतःशीच बोलली,
'कशी दिसतेय मी? सहा महिन्यांनी मला पाहून तो काय म्हणेल बरं? मी त्याला पहिल्यासारखीच आवडेल का?'
'कशी दिसतेय मी? सहा महिन्यांनी मला पाहून तो काय म्हणेल बरं? मी त्याला पहिल्यासारखीच आवडेल का?'
अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होत होते. इतक्या दिवसांचा विरह आणि त्यात सतत होणारे भांडण म्हणून मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती; पण त्याचबरोबर उत्साहही ओसंडून वाहत होता.
दुसरीकडे निखिल ट्रेनमध्ये बसून प्रवास करत होता. त्याच्या हातात लहानसं गिफ्ट होतं. एक सुंदरशी फोटो फ्रेम, ज्यामध्ये त्याने दोघांचा पहिल्या भेटीचा फोटो ठेवला होता. त्या दिवसापासून ते आजपर्यंतचं नातं त्याने मनात पुन्हा उलगडून पाहिलं.
तो मनाशी बोलला,
'एकांशी, सहा महिने झाले तुला जवळून न बघता. रोज फोनवर तुझा आवाज ऐकायचो; पण मनाची ओढ भागत नव्हती. आज तुला भेटल्यावर माझं प्रत्येक दुःख, प्रत्येक राग नाहीसा होणार. जशी मला आपल्या भेटीची ओढ लागलेली आहे, तशीच तुझ्या मनालाही लागली आहे का? मला भेटण्यासाठी तूही तेवढीच उत्सुक आहे का?'

त्याच्या मनातही भावनांचा कल्लोळ झाला होता. त्याच्या डोळ्यांत उत्सुकता होती. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघताना त्याला प्रत्येक स्टेशन लवकर संपून जावं असं वाटत होतं.
दोघांच्या नात्यात प्रेम होतं; पण त्या अंतरामुळे वादही खूप व्हायचे.
एकदा एकांशी रागाने फोनवर म्हणाली होती,
"निखिल, तू खरंच मला विसरत चाललायस असं वाटतं. रोज फक्त 'व्यस्त आहे' असं सांगतोस. मला वेळ देऊ शकत नाहीस का?" तिच्या आवाजामध्ये राग आणि त्यांच्या नात्याला गमावण्याची भीती जाणवत होती.
"निखिल, तू खरंच मला विसरत चाललायस असं वाटतं. रोज फक्त 'व्यस्त आहे' असं सांगतोस. मला वेळ देऊ शकत नाहीस का?" तिच्या आवाजामध्ये राग आणि त्यांच्या नात्याला गमावण्याची भीती जाणवत होती.
निखिल थोडा त्रासून म्हणाला होता,
"एकांशी, मी कामात असतो म्हणून तुला फोन उशिरा करतो, याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय; पण तू नेहमी तक्रारीच करतेस. कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्नही करत जा."
"एकांशी, मी कामात असतो म्हणून तुला फोन उशिरा करतो, याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय; पण तू नेहमी तक्रारीच करतेस. कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्नही करत जा."
"प्रत्येक वेळी मीच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा का? तूही कधी माझ्या मनाची अवस्था समजण्याचा प्रयत्न कर. कधीकधी असे वाटते की हे नाते फक्त एका बाजूने मी निभावण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या बाजूने मला काहीच प्रतिसाद मिळत नाही." एकांशी रागानेच फोनवर बडबड करत होती.
"असे वाटते का तुला? माझे प्रेम दिसत नाही का तुला? तुझ्या मनाची अवस्था समजते ग मला बाळा; पण माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे ना. तुला न भेटता राहणे मला तरी शक्य आहे का? एक तुझ्या प्रेमामुळेच तर माझ्या या जगण्याला धीर येतो. बाळा, प्लीज असे काहीही विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घेऊ नको. कारण तुला झालेला त्रास हा मलाही खूप वेदना देऊन जातो." निखिलने प्रेमळ भाषेमध्ये तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
क्रमशः
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा