Login

अनोळखी वळणावर

अनोळखी वळणावर भेट

आयुष्याच्या पायवाटी
लागले अनोळखी वळण
त्या क्षणाला नकळत
हळवे झाले माझे मन

त्या वळणावर होते
वळणावळणाचे घाट
जिथे सजला होता
निसर्गाचा सुंदर थाट

आपसुकच वळले त्या
वाटेवरती पाऊल
मनाला लागली एक
वेगळीच अनामिक चाहूल

त्याच अनोळखी वळणावर
झाली तुझी माझी भेट
हीच भेट रूतून बसली
काळजात घर करून थेट

ही भेट होती अगदीच छोटी
पण कायम राहिली आठवणीत
आठवण येता आसवांचे मोती
नयनांतून बरसे पाठवणीत