अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर हे लवकरच लग्न करणार अशी बातमी छापलेली एक पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. अमोल कोल्हे हे सध्या बायकोला कंटाळले आहेत. त्यामुळे ते चंद्रा फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात आहेत. लवकर ते बायकोला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर सुद्धा तिच्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहेत. \"या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मीपण उपमुख्यमंत्री होऊ शकेन, कारण अमृता हे नावच लकी आहे\" असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.
इंस्टाग्रामवर अमोल कोल्हे यांनी एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची इमेज पोस्ट शेअर करत, \"नशीब बायकोला माहितीये की आज १ एप्रिल आहे. नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती,\" अशी टिप्पणी देखील पोस्टमध्ये केली आहे.