Login

अर्धवर्तुळ भाग 6(जलद कथामालिका स्पर्धा )

काय होते त्या मुर्त्याच्या मागचे रहस्य हें आपण बघितलं आत्ता त्याचा विनाश कसा होईल हें आपण बघणार अहोत कथेच्या पुढील भागात.
भाग -6
# रहस्य कथा
त्या मुर्त्याच्या डोळ्यांना एक अनोखी चकाकी होती.  बघितल्यावर वाटे की त्या आपल्याकडे टक लावून बघत असाव्यात.
रहस्य असे काही होते.  तीस चाळीस वर्ष्यापूर्वीची गोष्ट होती.  एक बस रामनगरहुन  काश्मीरला जात होती. रस्ता अगदीच वळणाचा आणि धोकादायक  होता. रस्ता अगदी अरुंद आणि सर्वत्र खोलदऱ्याचा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी रस्त्याला कडे बांधणे शक्य नव्हते. तिकडे भूकंप  वारंवार होत असल्या कारणामुळे तिकडे रस्ते नेहमीच खचत असायचे.  बासमध्ये बासलेले सारेच प्रवाशी अगदीच आनंदात  होते. कोण कुठे जाणार होते तर... कोण फिरायला निघाले होते. बसचा ड्रायव्हर अतिशय कुशल होता  तरी ही संकट कधी सांगून येत असते का...
दरी अतिशय खोल होती. खाली खळखळून वाहणारी एक भली मोठी नदी होती. त्या बसमध्ये तरुण मंडळी तसेच लहान मुले सर्वच वयोगटातील मंडळी होती. कुणी झोपलेले होती तर कुणी तरुण मंडळी एकमेकांशी गप्पा करत होते. लहान बालके बाहेरचा परिसर खिडकीतून निहारत  होते. बस त्या घाटावर अगदीच संत गतीने चढत होती. त्या क्षणाला काय झाले कुणास ठाऊक कदाचित टायर पंक्चर झाला असावा. नाहीतर चुकून ड्रायव्हरला गुंग्गी आली असावी. नाही तर भूकंप  होण्याच्या बेतात असावा. पण सर्वांचा अंदाज चुकीचा ठरला. परिणाम एकच झाला, अचानक बसचे इंडिकेटर आग पकडू लागले बसने आणि बसने खोल दरीमध्ये कोलांटी मारली. बसला आग लागली. त्याच क्षणाला बसने आग पकडली आणि तिचे जणू काही अस्तित्वचं संपले . जाळणारे प्रवाशी दरीत जाऊन पडले. बसच्या अगदीच ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या.  बासमधली  सारी माणसे खोल असलेल्या दरीत जाऊन पडली आणि ती पन्नास-साठ  फुट खोल पाण्यात ती माणसे अगदीच किड्या मुंग्यासारखी नदीच्या किनारी जाऊन विसावली. तेव्हा पावसाचे दिवस होते. अतिशय जोरात पाऊस आला. दरी कोसळल्या, मातीचे ढीग किनाऱ्यावर साचले. त्या मातीच्या ढिगा खाली ती माणसे जाऊन दबून गेली.
ही बातमी सर्वत्र पसरली पण खुप तपास केल्यावर ही काही तपास लागला नाही.
अशीच अनेक वर्ष निघून गेली. माती वाहुन गेली सर्व मृत माणसांची हाडे उघडी पडली. असे काय होते कोण जाणे पण ती हाडे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली नाही. नदीच्या वाहत्या पाण्यासोबत नदीच्या किनाऱ्यावर येऊ  विसावली. ती तशीच उघडी पडून राहिली. कित्येक वर्ष ती हाडे तशीच पडून राहिली. त्या नदीच्या किनाऱ्यावर सूर्यप्रकाश अगदीच थोडा पडत असायचा. पौर्णिमेच्या दिवसापासून तर अमावस्याच्या दिवसापर्यत तिकडे प्रकाश बरा पडत असायचा.  काही दिवसांसाठी अति सूर्यप्रकाश त्या ओसाड पडलेल्या हाडांवर पडला. हळू हळू त्या मृत हाडामध्ये मानवी अस्तित्व निर्माण व्हायला लागले. जणू त्यांचे काही जगणे बाकी राहिले असावे. साठ वर्ष्यानंतरची ती सकाळ फार वेगळीच होती. ज्या मृत हाडांवर सूर्यप्रकाश  अति प्रमाणात पडला. ती हाडे मानवी स्वरूप घेऊ लागली .जिवंत झालेली माणसे नदी किनारी निवांत फिरत असायची.  परत प्रकाश संपला की आपल्या मूळ स्वरूपात येत असायची. असा त्यांचा नियमित खेळ चालू असायचा. जी माणसे मृत अवस्थेतून जिवंत होत होती त्यांना चालता फिरता येत होते. मग त्यात लहान बालक तसेच स्रिया माणसे असे काही जिवंत झाली होती. सूर्य प्रकाश  जिथंपर्यत होता. तितकेच अंतर ते जाऊ शकत होते.त्या पलीकडे गेल्यावर परत ते आपल्या मूळ जागेवर खेचले जात असायचे.
नंतर नंतर तिकडे सूर्यप्रकाशाचे  प्रमाण खूपच कमी झाले . अगदीच नसल्या सारखे. मग तर ते परत हाडे बनून  राहिली. आत्ता जिवंत होणाऱ्या माणसाचे प्रमाण खुप कमी झाले होते आणि काही शिल्लक काळासाठी  ते  बंदच झाले होते. पावसाच्या दिवसात सूर्यप्रकाश अजिबात पडत नसायचा तेव्हा मात्र ती हाडे बनून रहायची.
असेच एकदा सारिकाचे वडील जागा परीक्षणकरिता गेले असतांना  तिकडे त्यांना हाडे पडलेली दिसली. त्यांच्या डोक्यात साहजिकच एक विचार येऊन गेला. जर ह्या हाडानपासून कलर  तसेच मूर्या बनवल्या तर त्यांना किती सारी डिमांड असेल मार्केटमध्ये .
त्यांनी आपला स्वतःचा लहानसा एक कारखाना उघडला  तिकडे ते जणावरांची हाडे तसेच ही सर्वओसाड पडलेली हाडे जमा केली जात असायची. पण त्या हाडांमधले रहस्य कुणालाच माहित न्हवते. हळु हळू  कारखान्यातले कामगार कमी होऊ लागली. पण ते का कमी होता आहे...? आणि नेमके जातात तरी कुठे आहे हें मात्र अजून पर्यत समजतं न्हवते.
असे करता करता कारखाना बंद पडण्याच्या बेतावर  येऊन गेला.
शेवटी एक दिवस सारिकाच्या वडिलांना ही  त्या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्यातच त्यांचा बळी गेला. शेवटी कारखाना बंद होण्याच्या बेतात होता तेव्हा त्यांनी काही सुंदर मुर्त्या आपल्या घराच्या एका खोलीत ठेवल्या होत्या. त्याच त्या तीन मुर्त्या होत्या. त्यांना अजूनही मुक्ती मिळालेला न्हवता आणि त्यांच्यातचं जिवंत होण्याचे प्रमाण अधिक होते.


*********
कथेचा पुढील भाग क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
**********
कथेच्या पुढील भागात काय होते हें जाणून घेण्यासाठी वाचत रहा ही कथा....

0

🎭 Series Post

View all