Login

अविश्वास त्याचा (पार्ट10)

अविश्वास त्याचा (पार्ट 10)

वर्तमानकाळ


थोड्याच वेळात स्वप्नील त्याच्या तंद्रीतून बाहेर येतो आणि राधीकाकडे बघतो

स्वप्निल  : राधिका स्वराज्य नाव तर आपण .......आणि तो बोलता बोलता थांबतो तो एकदा आशेच्या नजरेने तिच्याकडे बघतो आणि निघून जातो

राधिका सुद्धा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते (ती मनातच म्हणते )तू बरोबर बोललासन...... स्वराज्य नाव आपल्याच मुलाचा ठरवणार होतो आपण..... तो तुझाच मुलगा आहे स्वप्निल..... स्वराज तुझाच मुलगा आहे (आणि ती रडायला लागते)

@@@@@@@@@@@@@@@@

इकडे स्वप्नील त्याच्या घरी येतो नम्रता त्याची वाट बघत असते

नम्रता:  अरे स्वप्नील आलास तू किती उशीर करतो आजकाल काम असतं का तुला....???? जेव्हा तुला उशीर होणार असेल त्यावेळेस तू मला एक कॉल करून सांगत जाणारे नाहीतर काळजी लागते...... जा तू हात पाय धुऊन घे फ्रेश हो मी जेवण गरम करते.....

स्वप्निल : ( शांतपणे )नाही नको मी बाहेरून जेवून आलो आज ।।।।।सॉरी तुला सांगायचं राहून गेलं तू जेवली नसेल तर जेवून घे आणि मी आज खरच खूप थकलो य त्यामुळे जरा आराम करतो....

नम्रता : ( काळजीने )विचारते स्वप्निल ऑफिसमध्ये (बॅंक)खूप काम वाढले आहे का तुझं.... आज नाहीतरी तू खूप थकलेला वाटतोय ......ठीक आहे एक काम कर तू जाऊन झोप मी तुझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते..... जा फ्रेश हो आणि आराम करा

स्वप्निल तसाच बॅग सोफ्यावर ठेवून आत मध्ये त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो..... स्वप्निल थोडा फ्रेश होतो तेवढ्यात नम्रता त्याच्यासाठी हळदीचे दूध घेऊन येते हळदीचे दूध पिऊन त्याला थोडं बरं वाटतं आणि तो तसाच शांतपणे डोळे मिटून एका कुशीवर झोपतो तसंच त्याला जुन्या गोष्टी आठवायला सुरुवात होतात

@@@@@@@@@@@@@@@@@@

खुप दिवसानंतर सगळे मित्र जरा हसायला खेळायला लागले होते .....आणि नम्रता ने ऑलरेडी त्यांचा ग्रुप सोडला होता .....स्वप्निल ने सुद्धा त्याला चांगले टक्के पडले म्हणून कॉमर्स निवडलं कारण त्याला पुढे जाऊन बँकेमध्ये म्हणजे सरकारी बँकेमध्ये जॉब करायचा होता .....त्याला हव्या त्या कॉलेज मध्ये सुद्धा ॲडमिशन मिळालं होतं ....त्यामुळे तो खूपच खूश होता .....राधिकाची आता दहावी होती..... त्यामुळे तिला जास्त डिस्टरब करत नव्हता तिला जर काही अडचण आली तर स्वप्नील मात्र आवर्जून तिला मदत करायचा ...... नेहमीप्रमाणे सगळे मित्र मैदानात भेटायचे इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचे...... असेच काही वर्ष निघून गेले स्वप्नील नेत्याच्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि इतर बाकीच्या मित्रांनी ही त्यांचे त्यांचे ग्रज्युएशन कम्प्लीट करून आपापल्या आवडीची फील्ड निवडून घेतले कोणी पोलीस बनलं तर कोणी स्वतःचा हॉटेल टाकलं कोणी प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉईन झाले..... सगळे मित्र एवढे प्रेमळ होते की त्यांची मैत्री खूप घट्ट होती कोणीही एकमेकांबद्दल वाईट विचार न करणारे होते...... सगळ्या कॉलनीला त्यांच्या या मैत्री बद्दल माहित होत........

जसजसे दिवस सरत होते तसतसा स्वप्नील आणि राधिका च प्रेम खूप फुलत होतं..... नजर लागेल अशी त्यांची जोडी होती .....त्यांच्या प्रेमाची गोष्ट फक्त त्यांच्या ग्रुपमध्ये माहित होती .....बाकी कोणाला कानो खबर नव्हती..... जसा वेळ मिळेल तसे ते एकमेकांना वेळ देत होते ..... आता ते दोघे मॅच्युअर्ड सुद्धा झाले होते ते आपापल निर्णय घेऊ शकत होते....... अशातच स्वप्निल ला सरकारी बँकेमध्ये चांगल्या पदावर ती नोकरी मिळाली..… त्याने त्याची ही बातमी त्यांच्या ग्रुप वर मेसेज मध्ये सांगितले त्याने पर्सनली राधिकाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं होतं राधीकाने त्याच्या साठी थोडा वेळ काढुन एका कॅफे मध्ये भेटायचं ठरवलं........ दोघे संध्याकाळी सुमारे साडेसहा च्या वेळेस कॅफेमध्ये भेटले राधिकाने त्याच्यासाठी एक शर्ट आणि फुलांचा गुच्छ घेऊन आली होती....... तसं बघायला गेलं तर दोघे खुप दिवसानंतर भेटले होते कारण स्वप्निल ला इकडे तिकडे इंटरव्ह्यू द्यायला जावं लागत होतं त्यामुळे तो तिला वेळ देऊ शकत नव्हता पण आता त्याला नोकरी लागली त्यामुळे तो तिला भेटायला आला होता

राधिका :  हे घे  तुझ्यासाठी छोटस .....सरप्राईज माझ्याकडून
स्वप्निल : अग हे काय..... ह्याची  काय गरज होती तू आलीस तिच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी......

राधिका: ( मस्करीत )
अरे असं कसं तुला तुझ्या हक्काचा जॉब मिळालाय ज्याच्यासाठी तु एवढी मेहनत घेत होतास तो जॉब तुला मिळाला आणि मी असंच खाली हात देऊ असं तर नाही होऊ शकत तर मग मला सांग तुझी जॉइनिंग कधी आहे( त्याच्या हातावर हात ठेवत बोलते)

स्वप्निल:  अजून काही असं कळलं नाही पण पुढच्या आठवड्यात जोईनिंग लेटर येईल ......तर माझ्या मते एक विक नंतर असेल......

राधिका ठीक आहे हे घे आणि उघडून बघ....." (स्वप्निलच्या हातात गिफ्ट च  पॅकेट देत बोलते)

स्वप्निल : काय आहे याच्या मध्ये .....?????

राधिका  : अरे मी कसं सांगणार तुला काय आणलं म्हणून मी तुझ्यासाठी तूच उघडून बघ ना.....

(स्वप्नील आनंदाने गिफ्ट उघडून बघतो त्याच्या मध्ये व्हाईट त्याच्या आवडीचं शर्ट होतं त्यावरती ब्लू रंगाचे चेक्स होते)

स्वप्नील आनंदामध्ये वाव माझा फेवरेट कलर

राधिका  : ज्या दिवशी तुझी जॉइनिंग असेल ना त्याच्या पहिल्याच दिवशी तु  हा शर्ट घालून जायचा आणि मला फोटो पाठवायचा


स्वप्निल हो का नाही काहीतरी हा माझा फेवरेट कलर आहे आणि लकी सुद्धा थँक यु सो मच (आणि तिच्या हातावरती कीस करतो)( राधिका लाजून मान खाली करते)

स्वप्निल त्याच्या बॅग मधून काहीतरी काढतो आणि राधिका च्या हातावर देतो

राधिका आश्चर्यचकित होत आता हे काय तू पण माझ्यासाठी काही ना काही आणलं मला काय गरज होती याची जॉब तुला लागला आहे मला नाही (असंच बोलते)

स्वप्निल :  माय स्वीट हार्ट माय ..जानेमन ....तू काहीतरी विसरते स......

राधिका :  मी मी तर काहीच नाही विसरते...."""

स्वप्निल:  अच्छा ते सगळं सोड आधी उघडून बघ तुला आवडते का...????

राधिका :  स्वप्नील तू आज पर्यंत मला जे जे दिले आहेस ते मला सगळं आवडतं मग हे का नाही आवडणार (पॅकेट खोलतच बोलते)

पॅकेट खोल्यावर राधिका त्याच्याकडे एक टक नजरेने बघते

त्या पॅकेटमध्ये तिच्या आवडीच्या रंगाची स्टॅटिन ची साडी असते म्हणजे लेमन येल्लो कलर आणि त्यावरती रेड नेट वाले फ्लावर्स असतात....

राधिका : माय फेवरेट कलर थँक ......यू सो मच स्वप्नील लव यू स्वप्नील....


स्वप्नील : मग आता तरी काही आठवलं का थोड्या दिवसात काहीतरी आहे

राधिका :  स्वप्निल अरे आता मी काही लहान लहान राहिली का मला सगळं माहित आहे आपल्या प्रेमाला पूर्ण आठ वर्ष कम्प्लिट होतायत

स्वप्निल मग मागासपासून तू माझी फिरकी घेत होतीस....

राधिका हसतच हो बोलते( अच्छा चल बोल काय पाहिजे तुला माझ्याकडून)

स्वप्निल :  तू त्या दिवशी मला तुझा पूर्ण वेळ द्यायचा म्हणजे आपण बाहेर जाणार सेलिब्रेशन करणार पण मी तुला सांगणार नाही की मी तुला काय काय देणार कारण ते सरप्राईज आहे ना तुझ्यासाठी

राधिका :  अरे मग सगळं तू देणार असशील तर मग मी काय करु त्या दिवशी मी पण काहीतरी देणार ना तुला

स्वप्निल : यावर्षी माझी बारी पुढच्या वर्षी तुझी बारी आता यापुढे मला काही विचारू नको नाहीतर माझ्या सगळ्या प्लॅनिंग वरती पाणी पसरेल

तिच्या डोळ्यांमध्ये आनंद पाहून त्याला सुद्धा खूप बरं वाटतं थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ते दोघे निघतात.....

===============================

काही शेताच्या कामामुळे राधिका चे आई वडील अचानक गावी जातात त्यांना यायला कमीत कमी एक हप्ता असतो त्यामुळे राधिका एकटीच घरात असते....

मला सांगितल्या प्रमाणे त्याची एका त्यानंतरच जॉइनिंग डेट असते..... दोन दिवसानंतर त्या दोघांच्या प्रेमाला आठ वर्ष पूर्ण होत असतात त्यामुळे स्वप्ने काही प्लॅन बनवलेले असतात तो एक दिवस आधीच राधिकाला मोबाईल वरती बोलतो

स्वप्निल :  काय करतेस...?????

राधिका : काही नाही रे आता जेवून भांडी आवरले आणि थोडावेळ टीव्ही बघणार.....

स्वप्निल  : उद्या लक्षात आहे ना काय आहे ते आणि नाहीतरी परवापासून माझी जॉइनिंग आहे

राधिका :  हो का नाही आठवणार .....उद्या आपल्याला आठ वर्ष पूर्ण होतील ....स्वप्नील अरे कळलच नाही ना किती भराभर हे दिवस निघून गेले .....की ती अल्लड प्रेम होतं ना आपलं आणि आता बघ आपण म्याचोरड झालो.... पण(हसतच)....
बोल मग काय प्लान आहे उद्या तुझा काय काय सरप्राईज प्लॅन केला आहे माझ्यासाठी.....

स्वप्निल :  कसा काही मोठा प्लान नाही आहे ग माझा पण तू उद्या मला मी दिलेल्या साडी मध्ये सकाळी नऊ वाजता आपल्या रॉयल पार्क मध्ये भेट....

राधिका : ठीक आहे उद्या नऊ वाजता पण प्लीज खूप उशीर नको करूस आई बाबांचा फोन आला तर मला त्यांना उत्तर द्यायला संकोच वाटेल

स्वप्नील : काळजी नको करूस मी तुला वेळेत घरी पोहोचवेल
@@@@@@@@@@@@@@@@@@@@

ठरल्याप्रमाणे राधिका सकाळी नऊ वाजता त्याला रॉयल पार्क मध्ये भेटते स्वप्नील तर तिला बघूनच घायाळ होतो त्याला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही किती राधिका आहे जिला आपण लढयामध्ये प्रपोज केलं होतं आणि आज तब्बल आठ वर्ष झाली त्यांच्या प्रेमाला किती प्रेमळ दिसते ती तिच्या मध्ये जर आपण बदल झालेला नव्हता ती जशी होती तशीच आजही आहे आहे......

राधिका त्याच्या जवळ ये तर त्याच्या डोळ्यासमोर एक चुटकी वाजवते....... काय रे स्वप्नील नुसता बघत का बसला आज आपल्याला पुढे जायचं नाही का (हसतच)

स्वप्निल : किती घाई करतेस गं तू .....जरा मन भरून बघू तरी दे तुला आज तुझ रूप किती वेगळ दिसत आहे...... छान दिसतेस तू या साडी मध्ये.....

राधिका  : तिच्या कपाळावर हात मारते अरे अरे तू मला असा बघतोयस पण तू आजूबाजूच्या लोकांना पण बघ ना ती कशी बघते तुझ्याकडे असा जर एकटक बघत राहिला तर काय वाटेल त्यांना

स्वप्नील : तू आजच्या दिवशी पण इतर लोकांचा विचार करतेस..... अगं आज पूर्ण आठ वर्ष झाली आपल्याला जरा आनंद घे आणि त्यात आपण मॅच्युअर्ड पण आहोत त्यामुळे आता तरी आपण आपले निर्णय घेऊ शकतो ना आणि त्याच्याही आधी तुझ्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करणं सोडून दे तुझा आज फक्त आणि फक्त माझ्यावरच लक्ष असले पाहिजे कळलं द्याट्स.... माय ऑर्डर

राधिका हसत हसत त्याच्या गळ्यात पडते हॅपी एट इयर्स ऍनिव्हर्सरी हँडसम..... स्वप्निल सुद्धा त्याचे दोन्ही हात तिच्या  कंबरेभोवती फिरवतो ...... सेम टू यू डार्लिंग

राधिका :  चल मग आता कुठे जायचं ते सांग मला (एक्साईट होऊन बोलते)

स्वप्निल असं कसं मी तुला सांगणार तर माणसं सरप्राईज आहे पण त्याच्या आधी आपण मंदिरात जाऊ या इकडे फायर ब्रिगेड चे सिद्धिविनायक मंदिर आहे ना तिकडे जाऊन पहिले पाया पडून येऊया..... आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी स्टार्ट करूया......

दोघांनी पण पहिलं गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर स्वप्निल तिला घेऊन बीच वर गेला तिकडे थोडा फेरफटका मारला आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या काही जुन्या आठवणी त्याच्या बद्दल विचार केला पुढे काय करायचं त्याच्या भवितव्याबद्दल सुद्धा विचार करत होते

स्वप्निल : ( राधिका चा हात हातात घेत) राधिका मी विचार केला आहे आपलं लग्न  आपण साध्या सोप्या पद्धतीने करायाच...... म्हणजे काय ना जसं कोर्ट मॅरेज कारण .....काय आहे ना जर मोठ लग्न केलं ना तर खूप सारे पैसे वेस्ट होतात ग आणि याच्या मध्ये कसे कोर्ट मध्ये फक्त रजिस्ट्रेशन करा आपण हवे तसे आपले फोटो सुद्धा काढू शकतो...... आणि जे पैसे आपले वाचता ...ते इं फ्युचर आपल्याला कामाला येतील मग तू काय बोलतेस.... माझ्या विचारांवर ....म्हणजे हे माझे विचार आहेत माझे विचार जे आहे तेच तुझे असतील असं मी नाही समजत तुझे विचार काय असतील ते पण मला सांग ना...

राधिका:  बरोबर बोलतोयस तू मलासुद्धा हे हाय फाय लग्न नाही आवडत.....  एवढे आई वडील आपल्यासाठी पैसे जपून ठेवतात त्यांचा जीव मारून मारून ते लोक पैसा जमा करतात आणि त्याला एका दिवसात एवढा खर्च करायचा हे  मला पण नाही पटत..... त्यापेक्षा आपलं कोर्ट मॅरेज बरं

स्वप्निल : अगदी बरोबर बोललीस तू तुला माहितीये मी तर आपल्या मुलांची सुद्धा नाव ठरवली आहे जर आपल्याला मुलगा झाला ना तर त्याचं नाव स्वराज ठेवायचं......आणि मुलगी झाली तर स्वरा.....

आणि या नावांमध्ये खास बात काय आहे माहितीये तुला ही दोन्ही नावं मी आपल्या दोघांची नावे मिळून बनवली आहे

राधिका  : ते कसं काय...?

स्वप्निल हे बघ स्वप्निल चा स्वर आणि राधिका चा रा .... म्हणजे स्वराज आणि स्वरा

राधिका :  हसत  अहो महाशय आधी आपलं लग्न तरी होऊ द्या.... मग पुढचं पुढे बघू तुम्ही तर डायरेक्ट मुलापर्यंत पोचलात

स्वप्निल  :  तू काळजी नको करूस .....लग्न तर आपलं होऊनच राहणार ....100% फक्त मला माझ्या जॉब ला एक वर्ष कम्प्लिट होऊ दे मग बघ घोड्यावरती बसून तुझ्या आई-वडिलांना तुझा हात मागायला येणार(हसत)

बोलता बोलता संध्याकाळ कधी झाली त्या  दोघांना कळलंच नाही.....

स्वप्निल चल आता शेवटचं सरप्राईज

ते दोघेही टॅक्सी करून एका हॉटेल मध्ये जातात..... स्वप्निल ने आधीच राधिकाचे डोळे तिच्या रुमालाने बांधलेले असतात.... कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचं असतं.... राधिकाला काहीच माहीत नसतं पुढे काय होणार ते ....तो हळूच तिला एका हॉटेलमध्ये घेऊन येतो ....तिथे त्याने एक रूम बुक केलेली असते हॉटेलमध्ये शिरल्यानंतर तो हॉटेलचा मॅनेजर कडून रुमची चावी घेतो आणि तिला घेऊन जातो

राधिका  :स्वप्नील आता तरी माझी डोळे खोल ना अरे किती अंधार अंधार दिसत होते

स्वप्निल :  फक्त दोन मिनिटं राधिका बस पोहोचलो आपण

ते दोघे एका रूमच्या बाहेर उभे असतात.... स्वप्निल हळूच चावीने दरवाजा उघडतो आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो .....थोड्यावेळ राधिका तिचे डोळे चोळत असते....

राधिका :  हे काय कुठे आलो आपण????? आणि या रूम मध्ये किती अंधार आहे रे मला तर भीती वाटते

स्वप्निल : मी आहे ना तुझ्या बरोबर चल आत मध्ये

दोघे एक पाऊल पुढे जात असतात राधिका त्याच्या पुढे चालत असते...... तेवढ्यात स्वप्निल स्विच  ओन करतो.... तशी राधिका दचकते.... तिच्यासमोर लाल फुलांनी सजवलेल्या बेडच्या वरती हॅपी ऍनिव्हर्सरी हे फुलांनी कोरलेला असतं पूर्ण बेडरूममध्ये अरोमा कॅण्डल लावलेले असतात त्याच्या सुहासने बेडरूम अगदी सुहासित होतो
..... सगळीकडे पिवळ्या रंगाने लख्ख प्रकाशित कॅन्डल्स असतात जमिनीवरती गुलाबाच्या पाकळ्यांची रांगोळी काढलेली असते हे सगळं बघून राधिका एकदम भाऊक होते

राधिका :  स्वप्नील अरे या सगळ्या गोष्टीची काय गरज होती....

स्वप्निल अजून तर सरप्राईज बाकी आहे थांब मी आलोच तू बस इकडे तो तिला बेडवर बसून फोन करण्यासाठी वळतो.
..
थोड्याच वेळात त्यांचा रूमची बेल वाजते स्वप्निल त्याच्या जागेवरून उठून दरवाजा खोलतो आणि समोर उभ्या असलेल्या माणसाकडुन काही पार्सल घेतो

हे पार्सल दुसरं तिसरं काही नसून हार्ट शेप चा एकेक असतो त्याच्यावरती सुद्धा आय लव यू राधिका असं लिहिलेलं असतं

दोघे मिळून केक कट करतात आणि एकमेकांना भरवतात....
थोड्याच वेळात स्वप्निल एक रोमँटिक म्युझिक लावतात आणि तिच्या पुढे त्याचा हात पुढे करतो तो त्याच्या एका गुडघ्यावर बसलेला असतो राधिका सुद्धा जास्त वेळ न घालवता तिचा हात पुढे करते जशी म्युझिक सुरु होते ते दोघं ताल धरून नाचायला सुरुवात करतात ......आज पहिल्यांदा ते दोघे एवढ्या जवळ आलेले असतात

राधिका तिचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले तसं स्वप्निल त्याचा एक हात तिच्या कंबरेभोवती फिरवतो तशी राधिका शहारते ति लाजुन तिचे डोळे बंद करते......
जसजशी म्युझिक सूर्य असते तसे ते दोघे आपली ताल धरत असतात.... ते दोघेही आता इतके जवळ असतात की त्यांचे उष्ण श्वास सुद्धा त्यांना आता जाणवू लागतात...... आताच राधिका चे ओठ सुद्धा थरथरू लागतात...?

स्वप्नील तसाच त्याचा डावा हात तिच्या माने भोवती घालतो....आणि तिला अजून त्याच्या जवळ ओढतो...…तशी राधिकाची धडधड वाढते.....तीच अंग पूर्ण गरम झालेलं असत.....तिचे श्वास आता तो सुद्धा जाणू लागतो.....तो एकदा तिच्या रुपाकडे बघतो....तिने तिचे डोळे अगदी घट्ट बंद केलेले असतात.....

स्वप्निल हळूच तिच्या मानेवर ती अलगद फुंकर मारतो तशी ती लाजून तिची मान उजवीकडे वळवते.... त्यामुळे अजूनच शहारते तिच्या अंगावर ती रोमांच फिरतो...... स्वप्निल हळुस तिच्या मानेवर ती त्याचे ओठ टेकवतो...... तशी राधिका त्याला घट्ट मिठी मारते तो हळूहळू तिला बेडच्या दिशेने घेऊन जातो...... तिचे सुद्धा पाऊले आपोआपच मागे जात होती..... तसे ते दोघे बेडवर बसतात ..... आज ती रात्र फक्त त्या दोघांच्या मिलनाची  होती....... त्या दोघांनीही एकमेकांना एकमेकांसोबत झोकून दिलेलं असतं

( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)











0

🎭 Series Post

View all