सगळे मित्र ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता मैदानामध्ये उभे राहतात तेवढ्यात स्वप्नील तिकडे तयार होऊन येतो आज त्याने छान पांढराशुभ्र शर्ट आणि त्याच्यावर ती काळी पॅन्ट घातलेली असते तसं त्याला ते शोभूनही दिसत असतो. ....
स्वप्नील : अरे वा सगळे वेळेवर आले चला मग निघूया नाहीतर पुढे खूप गर्दी होते ( आनंदाने बोलतो)
तृप्ती : अरे थांब अजून राधिका यायची बाकी आहे ती बघ आली
( राधिका ला येताना बघून स्वप्निल एकटक तिच्याकडे बघत राहतो तिने सुद्धा आज सफेद रंगाचे अनारकली आणि त्यावर ती लाल रंगाची बांधणी घेतलेली असते...... कानामध्ये मोत्यांची कानातले.....गळ्यामध्ये सुद्धा मोत्याची माळ आणि हातामध्ये ऑक्साईडचा बांगड्या केस एक साईडला पिन अप केलेले...... थोड्या वेळ का होईना पण स्वप्निल मात्र तिच्या ह्या रूपा वरती थोडासा फिदा होतो)
नम्रता : काय राधिका आज पण उशीर केलास तू किती वेळ झाला आम्ही तुझी वाट बघत होतो
तृप्ती :काय पण काय बोलतेस नम्रता उशीर कधी केला तिने आपण पण तर आत्ताच आलोय उगाचच काही बोलायचं (मुद्दाम नम्रताला चिडवत ...... तशी नम्रता तोंड वाकड करते)
संदीप : तुमच्या मुलींच जर झाला असेल तर आपण सगळे मिळून या आपल्याला पुढे जाऊन अजून बरेच काम करायचे आहे संदीपच्या बोलण्याने सगळे निघायला लागतात
सचिन : आपण 2 टॅक्सी करूया एका मध्ये आम्ही सगळे मुल बसतो आणि एका मध्ये तुम्ही सगळ्या मुली बसा......
( सचिनच्या सांगण्यावरुन सगळ्यांनी मिळून दोन टॅक्सी केली आणि आपल्या प्रवासाला निघाले पोचायला जेमतेम एक तास लागणार होते तर पूर्ण तासांमध्ये राधिका आपण कसं त्याला प्रपोज करायचं आपल्या मनामधला बोलून दाखवायचं ह्याचाच विचार करत होती थोड्याच वेळात एका तासाच्या प्रवासाने सगळे जण सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचले सगळ्यांनी मिळून पैसे दिले)
उज्वला : चला आता लाईन लावू या जास्त गर्दी पण दिसत नाही आज
( सगळेजण 11 लाईन मध्ये उभे असतात कोणी गणपती साठी हार घेतला कोणी चाटच घेतलं सगळे जण आनंदामध्ये गप्पा मारत असतात हळूच संधी साधून बाबू राधिकाच्या कानामध्ये बोलतो)
बाबू : राधिका तु तयार आहेस ना म्हणजे आम्ही सगळे तुझ्याबरोबर त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही
राधिका : (थोडी नर्वस होऊन )एवढ्या वेळची मी घाबरले नव्हते पण तू असं बोलून मला घाबरवतोयस
बाबू : अगं मी तुला घाबरतोय कुठे उलट मी तुला स्ट्रॉंग बनवतोय म्हणजे तुझ्या मध्ये तेवढी ताकद येईल ना त्याला बोलून दाखवण्याची आधी हा बोलली असती तर ही वेळ आली नसती जाऊदे जे झालं ते झालं आता या देवाला चांगला नवस बोल आणि एकदाच बोलून टाक
राधिका : पण ऐकणारे बाबू तुझा मित्र किती खडूस आहे एवढा प्रवास केला पण एकदा पण माझ्याकडे बघितलं नाही त्याला आत्ता पण मी आवडते ना रे नाहीतर कळलं मी त्याला प्रपोज केलं आणि त्याने नाही बोलला म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी वरती पाणी पडल
बाबू : तसं काही नाही ग आता एवढा टाईम झाला तो आपल्या बरोबर आहे त्याला एवढंच वाटतं की तुला कोणताच त्याच्याकडून त्रास होऊ नये म्हणून तुझ्याशी बोलत नाही पण तू जर स्वतःहून जरी बोलायला गेलीस ना तर तो नक्की तुझ्याशी बोलेल चल आपला नंबर आला दर्शन घेऊया
सगळे बारी बारी ने गणपती बाप्पांचे दर्शन घेतात दर्शन घेताना नेमकं स्वप्नील आणि राधिका एकत्र बाजूबाजूला उभे राहतात
राधिका : (मनामध्ये देवबाप्पाला) हे बाप्पा तू सुखकर्ता आहेस तू दुःखहर्ता आहेस माझ्या मनामध्ये आता जे चाललं आहे हे तू सध्या ओळखून आहे मला थोडी ताकद दे आणि माझ्या मनामध्ये जे आहे ते आज मला याच्याशी म्हणजेच स्वप्निल बरोबर बोलून जाऊ दे त्याचे उत्तर जे काही असेल पण निदान माझ्या मनातलं हलकं होईल तुझा आशीर्वाद असाच आमच्या वरती राहू द्या आणि त्याला चांगल्या मार्कांनी पास कर
स्वप्निल मनामध्ये हे देवा तू आतापर्यंत मला जशी साथ दिली तशीच पुढेही देत रहा माझे पेपर चांगले गेले पण मला चांगल्या मार्कांनी पास करेल आणि तुझा आशीर्वाद असाच माझ्या होते माझ्या घरादारावर ती माझ्या प्रिय मित्रांनवरती राहू दे पुढे माझ्या आयुष्यात काही लिहिले ते मला सुद्धा माहित नाही पण आज पर्यंत माझं जिच्या वरती खूप प्रेम या माझ्यासोबत आहे पण ती मनापासून नाही जाऊदे जे झालं ते झालं आपल्या नशिबात नव्हतं असं समजायचं तिला कायमचं आनंदी ठेव तिच्या वाट्याला कधीच अडचणी येऊन देऊ नको
(सगळे मित्र का जल्लोषात बोलतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया)
माधुरी : खूप छान दर्शन झालं ना अगदी मनासारखं थँक्यू स्वप्नील आज जे काही शक्य झालं ते फक्त तुझ्यामुळे पण तू दरवेळेस येतोस का इकडे का आज काही खास कारण आहे त्याच्यामुळे तू इकडे आला आहेस(मुद्दामून विचारते)
स्वप्निल : कस आहे ना माधुरी आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये सुद्धा काही दिवस असे असतात जे आपल्यासाठी खूप खास असतात तसंच माझं सुद्धा काही खास दिवस आहे त्यामुळे मी आज इकडे आलोय पण आज जर रिंकि पण आली असती तर बरं वाटलं असतं तीची थोडी कमतरता जाणवते( सगळे होकारार्थी मान हलवतात)
सगळे मंदिराच्या बाहेर येतात चला आता काहीतरी खाऊन घेऊ या नम्रता बोलते
उज्वला : मला ना मेंदू वडा खायचा आहे सकाळी एवढ्या लवकर उठावे लागला ना की नाष्टा पण करून नाही आलो तिथेच बाजूला साउथ इंडियन हॉटेल आहे तिकडे जाऊया तिकडचे साउथ मेनू खूप चांगले आहेत उज्वला च्या सांगण्याने सगळे तिकडे जातात
( सगळे मनसोक्त नाश्ता करतात)
संदीप : चला आता बाहेर आलोच आहे तर बाजूलाच चौपाटी आहे तिकडे थोडा वेळ जाऊ या थोड्या गप्पा मारू या आणि हो तुमच्या मुलींना काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे जरा उशीर झाला तर घरचे ओरडणार नाही ना????
तृप्ती नाही नाही बिलकुल नाही आम्ही आधीच घरी सांगून ठेवलंय आम्हाला यायला उशीर होणार आहे
सचिन बरं झालं आधीच सांगून ठेवले नाही तर टेन्शन येत ना
( ठरल्याप्रमाणे सगळे थोड्यावेळात समुद्र किनाऱ्यावर येतात थोड्यावेळाने बाबू सचिनला आणि संदीपला काही इशारा करतो)
बाबू :हे चला सगळे आपण पाण्यामध्ये जाऊया
माधुरी : अरे वाट काय बघताय चला लवकर मी तर खूप एक्साईटेड आहे पहिल्यांदा आलो आहोत ना आपण ते पण असं एकटा-एकटा
स्वप्निल : तुम्ही सगळे जा मी नाही येत नाही तरी मला जास्त पाण्यामध्ये जायला नाही आवडत( स्वप्निल नाही जाणार म्हणून राधिकाने सुद्धा जाण्यासाठी नकार दिला आणि ते दोघे नाही जाणार म्हणून नम्रता सुद्धा नाही म्हणत होती पण काहीही केलं तरी तृप्ती आणि उज्वला आणि माधुरी या तिघींनी मिळून तिला जबरदस्ती करून पाण्यामध्ये न्हेल )
( तस तर नम्रताला दोघांनाही एकता सोडायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहा करतात ती तोंड वाकडे करत करत निघून गेली)
( आता ही दोघे तिथे उरली होती .....स्वप्नील आणि राधिका त्या दोघांनाही कळत नव्हतं काय बोलावे एकमेकांसोबत.... स्वप्निलच्या मनात चालू होतं की जर आपण राधिका बरोबर बोललो तर परत राग येईल आणि निघून जाण्यासाठी जिद्द करेल आणि इथे राधिका कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही याचाच विचार करत होती..... पण आज काही केलं तरी तिला तिच्या मनातलं बोलून दाखवायचं होतं थोडा वेळ असाच निघून गेला पण दोघे एकमेकांबरोबर बोलत नव्हते शेवटी राधिका ने बोलायला सुरुवात केली)
राधिका: स्वप्निल मला तुझ्या बरोबर थोडं बोलायचं होतं???
स्वप्निल: हा बोल ना (शांत आवाजात)
( राधिका बोलता-बोलता थोडी नर्व्हस होते तिला कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही तिचं तिलाच कळत नव्हतं तिची अशी हालत बघून स्वप्नील सुद्धा कळत नव्हतं)
स्वप्निल: काही प्रॉब्लेम झाला का घरी (काळजीने विचारतो)
राधिका :नाही नाही तसं काही नाही ते मला ते ते कसं बोलू मला मला ते
( आता स्वप्निल ला सुद्धा तिच्या अशा बोलण्याने काळजी वाटायला लागली)
राधिका: स्वप्निल त्यादिवशी साठी सॉरी मला असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे माझ्या अश्या वागण्याने तुला सर्वात जास्त त्रास झाला आणि तसाच बाकीच्यांनाही झाला आणि सॉरी
स्वप्निल राधिका इट्स ओके .....मी कधीच त्या गोष्टीला विसरून गेलेलो आहे .....आता परत परत नको.... ती गोष्ट आठवली तर मलाही त्रास होतो ...कारण तुला झालेला त्रास मला पहावत नाही(काळजीने)
राधिका: किती हा आपली काळजी करतो आणि मी त्याच्याबरोबर अशी वागली( मनामध्ये बोलते)
( राधिका आणि स्वप्नील असे एकमेकांबरोबर बोलत आहे हे बघून नम्रताला कसतरी होत असतो ती सारखी सारखी तिच्या फ्रेंडला मी थकले मी आता नाही खेळत तुम्हीच खेळा असं बोलून तिकडून निघण्याचा प्रयत्न करत होते पण त्या मित्र तिला जाऊन देत नव्हते कारण त्यांना माहिती होतं ही जर तिकडे गेली तर त्या दोघांना काहीच बोलता येणार नाही)
स्वप्निल: (राधीकाकडे बघत )तुला अजून काही बोलायचं का म्हणजे तुझ्याकडे बघून तरी असं मला वाटतंय?????
राधिका: स्वप्निल मला सुद्धा तू आवडायला लागलास राधिकाच्या अशा बोलण्याने स्वप्नील डोळे मोठे करून तिच्याकडे एकटक बघतो
स्वप्निल: हे बघ राधिका माझी तुला काहीच जबरदस्ते नाही उगाच भावनेच्या घरामध्ये नको तो डिसिजन नको घेऊस उगाच माझ्यामुळे तुला परत त्रास होईल आणि मी ते नाही पाहू शकत
राधिका : नाही नाही स्वप्निल असं नाही मी खरच त्या वेळेस विचार नाही केला आणि मनाला येईल ते तुला बोलत गेली मी मी पुढचा सुद्धा विचार केला नाही की माझ्या बोलण्याने तुला किती त्रास होईल मी बोलतच गेले मी बोलतच गेली अडवायचं होतं मला
स्वप्निल : काय मी तुला त्यावेळेस घरी होतीस का मी तुला वेळ पण द्यायला तयार होतो पण तु काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती आणि नाहीतरी तुझी काही चूक नाही प्रेम करण्यासाठी दोघांची पण मते सेम असायला हवी मी प्रेम केलं जरुरी थोडी तुझ्या मनात पण त्याच भावना असतील तज्या माझ्या मनात आहे तुझ्यासाठी
राधिका : तसं नाही स्वप्नील मला आता सगळं समजतं मी त्यादिवशी जे काही बोलली ते सगळं रागात बोलले कारण मला प्रेमाचा अर्थ नव्हता कळल कधी या गोष्टी कडे लक्षच नाही गेलं माझं..... जेव्हापासून तुझ्याबरोबर मी अबोला धरला तेव्हापासून मला प्रेमाचा खरा अर्थ कळत गेला ....मला समजू लागलं की तुझ्यापेक्षा जास्त प्रेम मला कोणीच नाही करू शकत...... जेव्हा पासून तू माझ्याशी बोलत नाही तेव्हापासून माझं कशातच मन लागत नव्हतं मी काय करते काय बोलतोय माझं मलाच कळत नव्हतं माझं कशातच म्हणजे कशातच मन नव्हता लागत प्रत्येक वेळेस फक्त तुझाच विचार येत होता आणि तू तू तर माझ्याशी बोलत सुद्धा नव्हता अरे बोलत काय तू बघत सुद्धा नव्हता मला अजून त्याचा त्रास होतो का पण काय करणार मी बोलून बोलून.... सुद्धा दाखवू शकत नव्हते.... कारण माझ्यामुळे तुला जो त्रास झाला तो मला तुला परत नव्हता द्यायचा पण आज मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे मी वाटलं तर स्वतःची शपथ खाते मला तू खरच आवडतोस मनापासून आवडत मी नाही राहु शकत तुझ्याशिवाय....
( राधिका च्या बोलण्याने स्वप्निल ला काहीच सुचत नव्हतं कि जे बोलते ते सगळं स्वप्न आहे का असेच त्याला वाटत होते पण ते स्वप्न नव्हतं ती सगळी हकीगत होती ती त्याच्या समोर आहे आज त्याची राधिका स्वतःहून त्याला जायची तिच्या मनातल्या गोष्टी सांगत होती त्याला तर आधी विश्वासच बसत नव्हता पण तिने ज्या पद्धतीने तिची प्रेमाची कबुली दिली त्यावरून त्याला नक्कीच कळालं की खरंच ही सुद्धा आपल्यावर मनापासून प्रेम करते)
राधिका:( तिचा एक हात पुढे करत )स्वप्निल माझ्या प्रेमाला कबूल करशील मला एक चान्स देशील
आता तर स्वप्नील पूर्णच गोंधळून गेला त्याला काय बोलू काही नाही त्याला सुचतच नव्हतं तो सुद्धा एक हात पुढे करुन तिला होकार देतो हे सगळे त्याचे मित्र लांबून बघत होते आता त्यांना सुद्धा खात्री पटली की या दोघांनी एकमेकांना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.... पण नम्रताला काहीतरी गडबड वाटली म्हणून ती जास्तच घाई करत होती त्यांच्याजवळ जाण्याची
स्वप्नील: राधिका तू खरच माझ्यावर प्रेम करतेस ना कारण मला अजून पण विश्वास होत नाहीये
राधिका त्याच्या हाताला एक चिमटा काढते तसा तो ओरडतो.... आऊच किती जोरात काढतेस ग चिमटा
राधिका : मग काय करणार तुला तर माझ्यावर विश्वासच नाही बसत आता इथे मंदिरातून जाऊन आलोय मी खोटं बोलेल का
स्वप्निल : नाही तसं नाही मला बोलायचं ते मला विश्वास बसत नव्हता ना म्हणून सहज ठीक आहे ते सगळ आता सोड
राधिका :( स्वप्निल त्याच्या डोळ्यात बघत )वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वप्निल :म्हणजे तुला माहीत होतं आज माझा वाढदिवस आहे ते
राधिका मानेनेच हो बोलते आता ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पूर्ण गुंतून गेलेले असतात...... त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय याचा सुद्धा त्यांना विसर पडतो तसाच स्वप्नील राधिका च्या जवळ जातो आणि तिचा हात त्याच्या हातात असतो त्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल प्रामाणिक प्रेम असतं असं वाटत असतं आज सारे जग जिंकले त्या दोघांनी
Jo pehle hua naa.. Ab hone laga hai..
Dil humko jaga kar Kyun sone laga hai..
Ye ishq hai yaa kuch aur hai Ya bas khaali khaali shor hai
Ye ishq hai yaa kuch aur hai Ya bas khaali khaali shor hai
Ho isko main kya kahun Tu hi bata.. Tu hi bata..
Iss pyaar ko kya naam doon
Iss pyaar ko kya naam doon..
Iss pyaar ko kya naam doon Iss pyaar ko kya naam doon..
तृप्ती: हो हो लव बर्ड्स झाला का तुमचा रोमान्स काय मग स्वप्नील कसा वाटतोय आजचा दिवस तोपण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी( हसत बोलते)
स्वप्निल म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टीचा प्लेन आधीच केला होता (आश्चर्यचकित होत)
सचिन : काय रे हिरो प्लेन काय तूच करू शकतोस का काय..... अरे हे सगळे आम्ही ठरवून केलं नाही तर तुमच्याशी बोलत नव्हतास आणि तिला सुद्धा प्रश्न पडला होता कसं बोलणार म्हणून तुझ्याबरोबर म्हणून हे सगळं ठरवून गेलो नाही तर आज तुझी एवढ्या चांगल्या दिवशी तुला चांगली बातमी मिळाली याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे
नम्रता : अरे पण झालं काय मला कोणी सांगेल का मला तर काहीच कळत नाहीये (थोडी नाराज होत)
तृप्ती :थांबा थांबा थांबा तिला सुद्धा आता स्वप्निल आवडतो त्यामुळे हे दोघी झाले आता लव बर्ड्स काय मग आहे की नाही आनंदाची बातमी
नम्रता: थोडी आश्चर्य चकित होत म्हणजे राधिका आणि स्वप्नील हे दोघे आता कपल (थोडी नाराज होत बोलते)
संदीप : अगं हो म्हणून तर आपण सगळे तिकडे पाण्यात खेळायचं नाटक करत होतो ज्याच्यामुळे राधिकाला तिच्या मनातलं बोलता यावं म्हणून चला मग आता आपण केक कट करू या बाबू जा तू तेवढा केक घेऊन ये त्या दुकानात ठेवलास ना जा लवकर जा आमचा आनंद गगनात मावत नाहीये
( तिकडे सगळे आनंदात होते पण नंबर तर मात्र थोडी नाराजच होती)
बाबू आणि सचिन केक आणायला गेले आणि थोड्याच वेळात ते ते घेऊन आले सगळ्यांनी मिळून एका जागी ठेवला आणि एका सुरात वाढदिवसाचे गाणे गाऊ लागलं हॅपी बर्थ डे टू यु हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे डिअर स्वप्नील हॅपी बर्थडे टू यू
स्वप्नील ने सर्वात आधी राधिकाला केक भरवला त्याला प्रेमाने तिला केक भरवताना बघून नम्रताला थोडा रागच आला होता तेव्हा सगळे मित्र मिळून जल्लोषात बोलले अरे वा
सचिन : आता तू आम्हाला विसरणार आता फक्त राधिका तुझी हो ना (मुद्दामून त्याला चिडवत)
स्वप्निल : काही पण सचिन अरे आज तुमच्या सगळ्यामुळे मला राधिका मिळाले नाही तर मी स्वतःला खूपच कमजोर समजत होतो पण नाही आज खरच मला माझा वाढदिवसाचा खूप छान भेटण्याला थँक यु सो मच अशेच माझ्यासोबत राहा कायमचे थँक्यू वन्स अगेन
( सगळेजण थोडीशी पार्टीकडून आपापल्या घरी निघून जातात तिथे स्वप्निल अजून सुद्धा विश्वास नसतो की राधिका आत्तापासून त्याच्या जीवनात असणारा तो तर आज वेगळ्याच जगात होता...... तिकडे राधिकाची काही वेगळी परिस्थिती नव्हती ती सुद्धा सारखी स्वप्नील ची आठवण काढून काढून हसत होती कधी लाजत होती तिलाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता की खरच आज ती आणि स्वप्नील दोघे हीएकत्र झाले)
( काय मग वाचकाहो कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा